Home » Sadanand Date : पहिला कसाब आता तहव्वूर राणा !

Sadanand Date : पहिला कसाब आता तहव्वूर राणा !

by Team Gajawaja
0 comment
Share

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबईवर पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. तेव्हा मुंबईतील प्रसिद्ध कामा हॉस्पिटलमध्ये हे दहशतवादी गेले. या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी कामा हॉस्पिटलमध्ये एका निडर अधिकारी दाखल झाला होता. ते होते महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते. 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांशी लढा दिला. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. (Sadanand Date)

पण त्यांनी अजमल कसाब आणि अबू इस्माईलवर गोळ्या झाडल्या आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. आता या हल्याच्या 17 वर्षानंतर हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि पाकिस्तानचा दहशतवादी तहव्वूर राणा भारतात आला आहे. या तहव्वूर राणाला भारतात आणण्यापासून ते त्याच्याकडून या हल्ल्यामागे असलेला मुळ उद्देश जाणून घेण्याचे कामही सदानंद दाते करणार आहेत. दाते आता एनआयए प्रमुख असून या तहव्वूर राणाच्या सर्व चौकशीचे नेतृत्व सदानंद दातेच करणार आहेत. दाते एक निडर अधिकारी म्हणून ओळखले जातात. (Latest News)

तहव्वूर राणा सारख्या दहशतवाद्याला बोलतं कऱण्यासाठी त्यांच्यासारख्याच वरिष्ठ अधिका-याची गरज होती, मात्र भारतानं या सर्वातून आणखी एक संदेश दिला आहे. ज्या अधिका-यानं दहशतवाद्यांना रोखण्यासाठी गोळ्या खाल्या, त्याच अधिका-याच्या हाती सर्व तपासाची सूत्रे देणे म्हणजे, आम्ही कोणालाही माफ करणार नाही, असा संदेश यातून पाकिस्तानी दहशतवाद्यांना देण्यात आला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्काराचेही सहाय्य होते. रेकी करण्यासाठी आलेला तहव्वूर राणा आणि त्याचा मित्र हेडली हे मुंबईमध्ये अनेकांच्या संपर्कात होते, त्यांची या हल्ल्यामागील भूमिका आणि पाकिस्तानमध्ये अजून किती जणांनी या हल्ल्यासाठी सहय्य केले, हे तहव्वूर राणाच्या कडून काढून घेण्याचे कसब सदानंद दाते यांच्याकडे आहे. राष्ट्रपती शौर्य पदक विजेते, एनआयएचे विशेष महासंचालक सदानंद दाते हे अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथून तहव्वूर हुसेन राणाला घेऊन आले, तेव्हाच भारताची भूमिका स्पष्ट झाली होती. कसाबवर गोळी चालवणारे दाते आता राणाला फैलावर घेणार आहेत. (Sadanand Date)

मुंबईवर झालेल्या 26-11 च्या हल्ल्यानंतर आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे प्रकाशझोतात आले होते. कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांशी लढा दिला, त्यात त्यांनाही गोळ्या लागल्या होत्या. आता सदानंद दाते हे एनआयएचे विशेष महासंचालक असून या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी त्यांची भूमिका प्रमुख आहे. शिवाय सदानंद दाते स्वतः तहव्वूर हुसेन राणा याची चौकशी करणार आहेत. अमेरिका आणि कॅनडामधील राणाचे इमिग्रेशन सेंटर ऑफिस कसे काम करत होते, या ऑफिसमधून आतापर्यंत किती ग्राहकांना व्हिसा देण्यात आला आहे, याचा दाते तपास करणार आहेत. तहव्वूर राणा मुंबईवरील हल्ल्यापूर्वी किती वेळा मुंबईत आला, आणि कोणाच्या संपर्कात होता, याची चौकशी दाते आधी चौकशी कऱणार आहेत. मुख्य म्हणजे, मुंबईत राणाला कोणी मदत केली होती का, हे दाते राणाकडून वदवून घेणार आहेत. सदानंद दाते यांची ख्याती पाहता, तहव्वूर राणा त्यांच्यासमोर ही सगळी माहिती खुली करणार यात शंकाच नाही. (Latest News)

सदानंद दाते हे भारतीय पोलिस सेवेच्या 1990 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आयपीएसमध्ये अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी म्हणून सदानंद दाते यांची ओळख होती. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर असलेल्या दाते यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे. लंडनमधील विद्यापीठातही सदानंद दाते यांनी गुन्हेगारीसंदर्भात अभ्यासक्रम केला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. एक अभ्यासू पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. (Sadanand Date)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !

==========

मुंबई हल्ल्याच्यावेळी सदानंत दाते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी दिलेली साक्ष या खटल्याच्यावेळी महत्त्वाची ठरली. आता याच सदानंद दाते यांच्याकडे तहव्वूर राणाला बोलतं करण्याची जबाबदारी आहे. राणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार तो अतिशय थंड डोक्याचा दहशतवादी आहे. मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांना पाकिस्ताननं पुरस्कार द्यावा अशी शिफारस करणा-या या तहव्वूर राणाला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सदानंद दाते यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (Latest News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.