Home » जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेणाऱ्या तरुणाला होणार शिक्षा

जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेणाऱ्या तरुणाला होणार शिक्षा

by Team Gajawaja
0 comment
Jallianwala Bagh
Share

पंजाबच्या अमृतसर येथून जवळच असलेल्या जालियनवाला बागेमध्ये 13 एप्रिल 1919 रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील अतिशय ह्दयद्रावक घटना झाली. जनरल डायर नावाच्या इंग्रज अधिका-याच्या इशा-यावर अनेकांची हत्या करण्यात आली.  नि:शस्त्र भारतीयांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हत्याकांडाला 104 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. या हत्याकांडासाठी ब्रिटीश राजसत्तेलाही दोषी मानण्यात येते.  ब्रिटनमध्ये तेव्हा राणी द्वितीय एलिझाबेथ हिची सत्ता होती. या सर्वांच्या हत्येचा दोष राणीच्या माथ्यावर असून तिची हत्या करण्याचा प्रयत्न एका भारतीय वंशाच्या तरुणानं केला होता.  जालियनवाला बागेचा बदला घेण्यासाठी हा तरुण 2 वर्षांपूर्वी राणी एलिझाबेथच्या राजवाड्यात घुसला होता.  त्याला अटक करण्यात आली आणि आता त्याच तरुणाला 9 वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे.  त्यामुळे सोशल मिडियावर जालियनवाला हत्याकांड, राणी एलिझाबेथ दवितीय आणि जसवंत सिंग चहल यांची चर्चा रंगली आहे. (Jallianwala Bagh)

ब्रिटनची महाराणी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेऊन भारतीय वंशाच्या जसवंत सिंग चहल या तरुणाला नुकतीच 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. जसवंत सिंग चहल या तरुणानं 2021 मध्ये विंडसर पॅलेसमध्ये प्रवेश केला होता.  तेव्हा या राजवाड्यात राणीचे वास्तव्य होते. त्याची चौकशी केल्यावर त्यानं जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केला.  त्यावर चहल याला अटक करण्यात आली.  त्याचावर खटला चालवण्यात आला.  त्यात दोषी आढळलेल्या जसवंत सिंग याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला आणि त्याला 9 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.  (Jallianwala Bagh)

जसवंत सिंग यानं ख्रिसमसच्या दिवशी विंडसर पॅलेसमध्ये प्रवेश केला.  या पॅलेसच्या खाजगी भागात राणीचा वावर असल्यामुळे तिथे कडक सुरक्षा होती.  ही सुरक्षा भंग करुन जसवंत सिंग पॅलेसच्या खाजगी भागात गेला.  नायलॉनच्या शिडीचा वापर करून तो राजवाड्याच्या भिंतीवरुन आतल्या भागात पोहोचला.  त्याला सुरक्षा अधिका-यांनी पाहिले. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्यानं थेट मला जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी राणीला मारायचे आहे, अशी कबुली दिली.  त्याच्याकडे एक छोटेखानी धनुष्यबाण होते.  याच आधारानं तो राणीला मारणार होता.  

अटक केल्यावर जसवंत सिंगच्या बॅगेतही काही संशयास्पद कागद आढऴून आले.  त्याच्या बॅगेत हाताने लिहिलेली चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते  कृपया माझे कपडे, शूज आणि मास्क काढू नका, मला पोस्टमार्टम करायचे नाही. धन्यवाद आणि क्षमस्व.  त्याच्या गुन्ह्याचे स्वरुन पाहून देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.  विशेष म्हणजे, ब्रिटनमध्ये तब्बल 42 वर्षांनंतर कुणा नागरिकावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.  जसवंत सिंग याच्या आधी 1981 मध्ये मार्कस सार्जंट यांना देशद्रोहाच्या खटल्यात 5 वर्षांची शिक्षा झाली होती. लंडनमधील कालका परेड दरम्यान त्याने राणीवर गोळ्या झाडल्या होत्या. ब्रिटनचा राजद्रोह कायदा 1842 या नुसार, राणीला कोणत्याही प्रकारे इजा करण्याचा प्रयत्न करणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो.

9 वर्षाची शिक्षा झालेला जसवंत सिंग अवघ्या 21 वर्षाचा आहे.  त्याच्या वयामुळे त्याला कमी शिक्षा झाल्याचा अनुमान आहे.  कारण त्याच्याकडे आढळलेले धनुष्यबाण हे घातक असल्याचा निष्कर्ष त्याच्यावर चाललेल्या खटल्याच्यावेळी काढण्यात आला होता.  लंडनमधील ओल्ड बेली कोर्टात जसवंत सिंगवर सुनावणी झाली.  शिक्षेच्या कालावधी दरम्यान जसवंत सिंगला मानसिक उपचारांसाठी ब्रॉडमूर हॉस्पिटलमध्ये ठेवावे असेही सुचवण्यात आले आहे.  त्याची मानसिक अवस्था बघूनच त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.  (Jallianwala Bagh) 

===========

हे देखील वाचा : पाकिस्तानातील ‘या’ पंतप्रधानांनी भारतात सादर केले होते हिंदू विरोधी बजेट

===========

जसवंत सिंगला पकडल्यावर तो नेमका कोण आहे, हे जाणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. त्याचे कोणी नातेवाईक जालियनवाला हत्याकांडात मारले होते का, हेही जाणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.  मात्र जसवंत सिंगचे कोणीही नातेवाईक या हत्याकांडाचे बळी पडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  2018 मध्ये जसवंत सिंग याचे कुटुंब अमृतसरला गेले होते.  तिथे या कुटुंबानं जालियनवाला (Jallianwala Bagh) हत्याकांड जिथे झाले होते, तिथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.  त्याचवेळी तो या हत्याकांडातील क्रुरतेनं हादरला होता आणि त्याने राणी एलिझाबेथ द्वितीयला यासाठी जबाबदार ठरवून हत्या करण्याचा विचार केला.   

सप्टेंबर 2022 मध्ये राणीचे निधन झाले.  त्यानंतर जसवंत सिंगनं एका पत्राद्वारे राजघराणे आणि राजा चार्ल्स तिसरा यांची माफी मागितली होती.  जसवंत सिंगचे त्याचे वडील एरोस्पेसमध्ये सॉफ्टवेअर सल्लागार आहेत.  तर त्याची आई शिक्षिका आहे. ही पार्श्वभूमी पाहता जसवंत सिंगला कमी शिक्षा झाल्याचे सांगण्यात येते.  

सई बने 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.