इस्लामिक धर्मासाठी त्यांच्या नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याला ‘मोहर्रम’ असे म्हटले जाते. तर १४०० वर्षांपूर्वी जुलै महिन्याच्या १० तारखेला अल्लाहाचे पैंगबंर हजरत मोहम्मद (स:अ:व:व) यांचा लहान मुलगा इमाम हुसैन यांचा परिवार आणि ७२ अनुयांना ठार मारण्यात आले होते. इमान हुसैन यांच्यावर हा अत्याचार १४०० वर्षांपूर्वी करबला (ईराक मधील शहर) येथे झाला होता. मुहर्रमच्या महिन्यात प्रत्येक वर्षी त्याच शहीदांचे मातम साजरे केले जाते. (Islamic new year calendar)
इस्लामचा उदय मदीन (सौदी अरेबियातील शहर) येथून झाला होता. मदिनापासून दूर शाम (सीरियातील शहर) मध्ये मुआविया नावाच्या शासकाचे शासन होते. मुआवियाच्या मृत्यूनंतर शाही वारसदाराच्या रुपात यजीम, शाम हा गादीवर बसला. यजीदला असे हवे होते की, त्याच्या गादीवर इमाम हुसैन याने बसावे. कारण तो मोहम्मद साहब यांचा मुलगा आहे आणि त्याचा लोकांवर उत्तम प्रभाव सुद्धा आहे. तर यजीदला इस्लामांचा शासक मानण्यास मोहम्मदच्या घराण्याने विरोध केला. कारण यजीदसाठी इस्लामिक मुल्यांचा आदर करत नव्हता. यजीदच्या नकारासह हुसैन यांनी निर्णय घेतला की, तो आपल्या नानांचे शहर मदीना सोडणार, कारण तेथे अमन कायम राहिल.
असे सुरु झाले युद्ध
ही गोष्ट स्पष्ट होती की, हुसैन हा युद्धाच्या उद्देशाने निघून गेले नव्हते. त्यांच्या ताफ्यात फक्त ७२ लोकच होती. त्यामध्ये सहा महिन्याच्या मुलासह त्यांच्या परिवारातील लोक सुद्धा सहभागी होती. म्हणजेच त्यांचे युद्ध करण्याचे कोणतेही उद्दिष्ट नव्हते. सात मुहर्रम पर्यंत इमान हुसैन यांच्याकडे असलेले सर्व खाणं-पिणं संपलेले होते. इमाम यांनी अगदी शांतपणाने सर्वकाही घेत होते जेणेकरुन युद्ध टळले जाईल. ७ ते १० मुहर्रम पर्यंत (तीन दिवस) इमाम हुसैन यांच्या परिवारातील सदस्य आणि त्यांच्यासोबतची मंडळी उपाशी राहिली. १० मुहर्रम पर्यंत जेव्हा त्यांच्या ताफ्यातील मुलं हे उपाशी राहिल्याने विव्हळत असल्याने त्यांना जबरदस्तीने युद्धसाठी तयार व्हावे लागले.
इमाम हुसैन यांचे याजीद सोबत मतभेद होते
१० मुहर्रमला हुसैन यांच्या ७२ लोकांच्या फौजेमधील प्रत्येक जण हा मैदान-ए-दंगमध्ये लढू लागला होता. जेव्हा हुसैन यांचे सर्व साथीदार मारले गेले होते तेव्हा दुपारच्या नमाजानंतर हुसैन हे स्वत: युद्धात लढण्यास गेले आणि त्यांना सुद्धा ठार करण्यात आले. या युद्धात त्यांचा एक मुलगा जैनुल आबेदीन हा जीवंत राहिला. १० मुहर्रमला ते आजारी होता, मुहम्मद साहब यांच्या परिवारातील नवी पीढीतील ते एकटे पुरुष होते जे जीवंत राहिले. याच बलिदानास्तव मुहर्रमच्या महिन्यात दु:ख साजरे केले जाते.
हे देखील वाचा- तलाक-ए-हसन काय आहे? मुस्लिम महिलांकडून का केली जातेय रद्द करण्याची मागणी
करबलाची ही घटना मोहम्मद कुटुंबीयांनी दिलेले बलिदान मानले जाते. हुसैन आणि त्यांच्या पुरुष साथिदार व नातेवाईकांची हत्या केल्यानंतर यजीद याने हुसैन यांच्या परिवारातील महिलांना अटक केली होती.(Islamic new year calendar)
इस्लाम हुसैन यांच्या मृत्यूनंतर
यजीदने स्वत:ला आपण विजय झाल्याचे सांगत हुसैन यांच्या लुटलेल्या ताफ्याला पाहणाऱ्या लोकांना असे सांगितले की, ही लोक ती आहेत जी यजीदच्या शासनाच्या विरोधात गेली. यजीदने मोहम्मद यांच्या घरातील महिलांना कैदखान्यात ठेवले आहे. तेथे हुसैन याची लहान मुलगी सकीना हिचा कैदखान्यात मृत्यू झाला..मात्र, या घटनेला 1400 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असे म्हटले जाते की, ‘इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद’.