समाज आणि देशाच्या विकासात जेवढे योगदान पुरुषांचे आहे तेवढेच महिलांचे सुद्धा. सध्याच्या बदलत्या काळात महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. खेळ जगत असो, मनोरंजन क्षेत्र, राजकरण अथवा सैन्य मंत्रालयात त्या ही कार्यरत आहेत. महिलांच्या भागीदारीला प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासह त्यांना आपल्या अधिकारांबद्दल जागृक करण्यासाठी प्रत्येक वर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामागील एकच उद्देश म्हणजे महिलांना त्यांचे हक्क मिळावेत, समाजात पुरुषांप्रमाणेच सन्मान, कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळावी. अशातच जाणून घेऊयात महिला दिन कधी आणि केव्हापासून साजरा करण्यास सुरुवात झाली त्याच बद्दल अधिक. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची सुरुवात १९०९ मध्ये झाली होती. (International Womens Day)
महिला दिनाचा इतिहास
खरंतर १९०८ मध्ये अमेरिकेत मजूरांचे आंदोलन झाले. या आंदोलनात जवळजवळ १५ हजार महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर आपल्या अधिकारांची मागणी केली. काम करणाऱ्या महिलांनी अशी मागणी केली होती की, त्यांचे कामाचे तास कमी करावेत आणि वेतन वाढवावे. या व्यतिरिक्त या आंदोलनात महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी ही मागणी केली गेली. जेव्हा सरकारला महिलांच्या या आंदोलनाबद्दल कळले तेव्हा एका वर्षानंतर १९०९ मध्ये अमेरिकेतील सोशलिस्ट पार्टीने महिला दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
८ मार्चलाच का आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होतो?
महिला दिवस ८ मार्चला साजरा करण्यामागे खास कारण आहे. अमेरिकेतील कामकाज करणाऱ्या महिलांनी ८ मार्चला आपल्या अधिकारांबद्दल आंदोलन करत मोर्चा काढला होता. त्यानंतर सोशलिस्ट पार्टीने या दिवशी महिला दिन साजरा करण्याचे जाहीर केले. त्यानंतर १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान, रशियातील महिलांनी ब्रेड आणि पीससाठी आंदोलन केले. त्यानंतर सम्राट निकोलसने आपल्या पदाचा त्याग केला आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हेच पाहता युरोपातील महिलांनी सुद्धा काही दिवसानंतर ८ मार्टला पीस अॅक्टिव्हिस्ट्सचे समर्थन करत मोर्चे काढले. याच कारणास्तव ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला दिवसासाठी मान्यता दिली. (International Womens Day)
हे देखील वाचा- वेळेआधीच आलेल्या मेनोपॉजमुळे महिलांच्या शारिरीक-मानसिक आरोग्याला धोका
महिला दिवस २०२३ ची थीम
यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची थीम ‘एब्रेम्स इक्विटी’ अशी आहे. याचा अर्थ असा की, लैंगिक समानतेवर लक्ष देणे. तर महिला दिवस २०२२ रोजीची थीम ही ‘जेंडर इक्वालिटी टुडे फॉर ए सस्टेनेबल टुमारो’ अशी होती.