नुकतचं ४ऑगस्ट रोजी “जागतिक घुबड जनजागृती दिवस.” झाला.
घुबड म्हटले की सामान्य माणसांच्या मनात भिति निर्माण होते व या भिती पोटी त्याला अशुभ मानले जाते. परंतू , याच घुबडांवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील एक छंद वेड्याने नविन दुनिया तयार केली आहे.
सिन्नर येथील डॉ. प्रशांत वाघ यांच्या कडे घुबडाच्या आकाराच्या विविध कलाकृतींचा संग्रह आहे. या मध्ये : ८१३ विविध घुबडांच्या आकाराचे दागिने, जगातील ११४ देशांनी घुबडांच्या विविध प्रजातीवर प्रकाशीत केलेले ८२९ टपाल टिकिटे, १४ घुबडांच्या छोट्या व मोठ्या मुर्त्या, २१ घुबडांच्या आकाराचे कॉफि मग, ७ दगडा वरील घुबडांचे चित्र, ६ घुबडांचे बुक मार्के इत्यादी वस्तुंचा समावेश आहे.
सदर घुबड (Owls) आकारांच्या विविध दागिन्यांना हैदराबाद येथुन काही पदकांच्या खरेदिने संग्रहास सुरुवात केली. आज डॉ. वाघ यांच्या संग्रहात विविध आकाराचे घुबड दागिने मोठ्या प्रमाणात आहे व त्यात प्रामुख्याने : ५४१ गळ्यातील पदक ( Pendants), १३४ कोटावरील पदक (Brooch), ९२ कानातील डूल (Ear-rings) आाणि ४६ बोटातील अंगठ्या (Finger-ring) यांचा समावेश आहे.
डॉ. वाघ यांच्या कडे जगातील विविध देशांनी प्रकाशीत केलेल्या “घुबड टपाल टिकिंटांचा” सुद्धा मोठा संग्रह आहेत. यात ११४ देशांचे ८२९ विविध टपाल टिकिटे आहेत. या मध्ये भारताने १९९८ आणि २०१० साली अप्रत्यक्षरित्या घुबडावर प्रकाशीत केलेल्या दोन टपाल टिकिटांचा सुद्धा समावेश आहेत.
डॉ. वाघ सांगतात की घुबडांची अनेक वैशिष्टे आहेत जी अन्य पक्षी गणात दिसत नाही. जसे; ते आपली मान २७० अंशात वळवू शकतात, त्यांचे दोन्ही डोळ्यांचे वजन हे मेंदुच्या वजना ऐवढे असते, ते कोणतीही वस्तु माणसां प्रमाणे “थ्री डी एमेज” मध्ये बघू शकतात, ते मोठे भक्ष संबंध गिळतात व पचन न झालेली भक्षाची हाडे, पिसे, केस व इतर पदार्थांचे लहान गोळे बनवून ओकतात.
अशा विविध वैशिष्ट्या मुळे भारतीय समाजात घुबडां बद्दल अनेक गैरसमज आहे, जसे – घुबडांना भुतं काय बोलतात ते ऐकू येते, घुबड हे भुतांचे मांत्रिक आहे, घुबडाचे तोंड बघीतल्यावर त्या व्यक्ती चा मृत्यू होतो इत्यादी. समाजातील घुबडां बद्दलचे हे विविध गैरसमज दुर करणासाठी व या पक्षांविषयी जनजागृती करण्यासाठी डॉ वाघ हे यशवंत शाश्वत ग्राम विकास संस्था, डूबेरे यांच्या मार्फेत शाळा, कॉलेज, विविध संस्थे मध्ये “घुबड – एक रहस्यमय पक्षी; शेतकऱ्यांचा मित्र” या विषयावर व्यास्व्यान देतात.
डॉ. वाघ यांच्या “घुबड संग्रहातून जनजागृती” या कार्याची महाराष्ट्र पक्षी मित्र संघटने सुध्दा दखल घेतली आहे. २०१९ सालचा डॉ. आंबेडकर स्मृती पक्षी मित्र संशोधन व जनजागृती पुरस्कार त्यांना ३३ वे पक्षीमित्र संमेलन रेवदंडा, अलिबाग येथे देण्यात आला.
शेताच्या बांधावर रात्री पहारा देणारे, शेतकर्यांचा मित्र म्हणून ओळख असणारे, भारतीय संस्कृती मध्ये ज्याला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते ते घुबड अपशकूनी कसे असू शकते असा प्रश्न डॉ. वाघ विचारतात.
– डॉ. श्रीकांत वाघ