Home » आषाढी एकादशीला निघते पंढरपूरची दिंडी यात्रा, जाणून घ्या याच्याशी संबंधित रंजक गोष्टी

आषाढी एकादशीला निघते पंढरपूरची दिंडी यात्रा, जाणून घ्या याच्याशी संबंधित रंजक गोष्टी

0 comment
Share

दरवर्षी आषाढ महिन्यातील एकादशी संपूर्ण भारतात ‘देवशयनी’ किंवा ‘आषाढी एकादशी’ या नावाने साजरी केली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगळाच थाट पाहायला मिळतो. या उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दिंडी यात्रेत सहभागी होऊन, विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला पोहोचतात. या यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची (भक्ताची) इच्छा असते की, त्यांना मोक्ष मिळू नये आणि विठ्ठलाची आराधना करता यावी म्हणून त्यांनी मानवी जीवनातच या पृथ्वीतलावर परत यावे. तर चला या पंढरपूर यात्रेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. (interesting facts of pandharpur yatra)

तब्बल ८०० वर्षांपासून केलं जातंय या यात्रेचं आयोजन

भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी रुक्मणी, यांचा अवतार असलेल्या विठोबाच्या स्मरणार्थ दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरला येतात. या ठिकाणी वर्षातून चार वेळा भाविकांचा मेळा भरतो. सर्वात जास्त भाविक आषाढ महिन्यात, तर नंतर कार्तिक, माघ आणि श्रावण महिन्यात वारकरी येते जमतात. सोलापूर शहरातील भीमा नदीच्या तीरावर असलेल्या विठोबा मंदिरात तब्बल ८०० वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन केले जाते, असे मानले जाते.

भक्ताने दिलेल्या विटेला श्रीकृष्णाने बनवले होते आपले आसन

पुंडलिक हा आपल्या आई-वडिलांचा परम सेवक आणि भगवान श्रीकृष्णाचा महान भक्त होता. प्रचलित आख्यायिकेनुसार, एके दिवशी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना, भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले. पण भक्त पुंडलिक वडिलांचे पाय दाबतच राहिला. त्यावेळी पुंडलिक उभा राहिला नाही आणि परमेश्वराला उभे राहण्यासाठी वीट पुढे सरकवली. त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण आपला भक्त पुंडलिकाच्या पितृभक्तीवर खूप प्रसन्न झाले आणि त्याने दिलेली वीट स्वीकारली. यावेळी ते कंबरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले. त्यामुळेच येथील मंदिरात देवाची मूर्ती कमरेवर हात ठेवून, विटेवर उभी आहे. कृष्णाने आनंदाने ती वीट आपले आसन म्हणून स्वीकारली, त्यामुळे कृष्ण विठोबा म्हणून प्रसिद्ध झाले. (interesting facts of pandharpur yatra)

राजा कृष्णदेवाने नेली होती विठोबाची मूर्ती

विजयनगर साम्राज्याचा महान राजा कृष्णदेव याने पंढरपुरात असलेली विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, असे म्हणतात. पण नंतर देवाच्या एका भक्ताने त्यांची मूर्ती पुन्हा या ठिकाणी आणली आणि ती पुन्हा स्थापित करण्यात आली.

दरवर्षी पंढरपूरच्या दिंडी यात्रेची वाट पाहतात वारकरी

पंढरपूरच्या यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला वारकरी म्हणतात, जो विठूचा भक्त असतो. महाराष्ट्र ही अनेक थोर संतांची कर्मभूमी आहे आणि दरवर्षी आषाढी एकादशीला या संतांच्या जन्मस्थानावरून किंवा समाधीस्थळांवरून पालख्या आणि दिंड्या निघतात. कितीतरी किलोमीटर लांबचा प्रवास करून, हे वारकरी पंढरपूरला पोहचतात. (interesting facts of pandharpur yatra)

======

हे देखील वाचा: गोकर्ण मधील धार्मिक महत्व असलेली ‘ही’ प्राचीन मंदिर

======

आजही लोकांचा आहे एकमेकांवर विश्वास

या यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला एक प्रमुख असतो आणि वारकरी त्याच्याकडे खर्चासाठी पैसे जमा करतात. सामान वाहतुकीसाठी भाड्याच्या वाहनाचीही व्यवस्था केली जाते. गटाचा प्रमुख या गोष्टीची काळजी घेतो की, एका जागी थांबण्यापूर्वी तो त्याच्या गटाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकेल. गटाचा प्रमुख कधीच तो पैसा स्वत:वर खर्च करत नाही किंवा त्या पैशाबद्दल त्याची मानसिकता बिघडत नाही. या यात्रेने लोकांना एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकवले आहे. (interesting facts of pandharpur yatra)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलाय या यात्रेचा उल्लेख

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आषाढी एकादशी आणि चातुर्मासाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच आषाढी एकादशीचे आणि पंढरपूरचे खास नातेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. (interesting facts of pandharpur yatra)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.