Home » जनरल तिकिटावर किती ट्रेन बदलता येतात?

जनरल तिकिटावर किती ट्रेन बदलता येतात?

ट्रेनच्या माध्यमातून बहुतांश लोक दररोज प्रवास करतात. प्रवासी आपल्या शिखाला परवडणाऱ्या तिकिटानुसार एसी, स्लीपर आणि जनरल म्हणजेच अनारक्षित कोचची तिकिट काढतात.

by Team Gajawaja
0 comment
Indian Railway
Share

ट्रेनच्या माध्यमातून बहुतांश लोक दररोज प्रवास करतात. प्रवासी आपल्या शिखाला परवडणाऱ्या तिकिटानुसार एसी, स्लीपर आणि जनरल म्हणजेच अनारक्षित कोचची तिकिट काढतात. रेल्वेने या सर्व कोचच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. त्या बद्दल बहुतांश जणांना फारसे माहिती नसते. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. खरंतर जनरल कोचचे भाडे सर्वाधिक कमी आणि एसीचे सर्वाधिक असते. जनरल बोगीमध्ये बसण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकिट आरक्षित करावे लागत नाही. तुम्ही तिकिट विंडोवर जाऊन त्यासाठी तिकिट काढून सहज प्रवास करू शकता. बहुतांशवेळा कमी अंतराच्या प्रवासासाठी लोक जनरल तिकिटाच्या माध्यमातून प्रवास करतात. (Indian railway)

काही लोक तिकिटवर दोन किंवा दोन पेक्षा अधिक ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करत आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहचतात. परंतु तुम्हाला माहितेय का, एका ट्रेनच्या जनरल कोचचमधून उतरून तुम्ही किती ट्रेनच्या जनरल कोचचा प्रवास करू शकता? जर तुम्हाला हे माहिती नसेल तर त्यासाठी सुद्धा एक नियम असतो. याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

जनरल तिकिटाचा नियम
प्रवासादरम्यान खुप लोक एकाच ट्रेनच्या माध्यमातून ठरवलेल्या स्थानकापर्यंत जातात. त्यानंतर ते तेथे उतरून मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये बसतात. असे करण्यामागे काही कारणे असू शकतात. याचे एक कारण म्हणजे ट्रेन पुढे जात नाही किंवा एखादा मागून येत असेल अथवा गर्दी अधिक असणे. मात्र तुम्हाला माहितेय का, अधिनियमानुसार हे मान्य नाही. तुम्ही ज्या ट्रेनचे तिकिट घेतले आहे त्याच ट्रेनच्या माध्यमातून तुम्हाला प्रवास करावा लागतो. भले ती तिकिट जनरल बोगीची असेल. (Indian railway)

जेव्हा तु्म्ही तिकिट घेता त्यावर स्थानकाचे नाव आणि वेळ ही लिहिलेली असते. त्याच्या आधारावर टीटीई तुम्हाला पकडू शकतो. त्यानंतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. यामुळे असा सल्ला दिला जातो की, जनरल तिकिटाची अदलाबदली करू नये.

हेही वाचा- रेल्वे स्थानकात ठेवलेल्या काळ्या रंगांच्या डब्ब्यांचा ‘हा’ आहे अर्थ

त्याचसोबत जनरल तिकिटाची एक मर्यादा असते आणि त्यानंतर ती तिकिट वापरता येत नाही. जर तु्म्ही एखाद्या मेट्रो सिटी जसे की, दिल्ली मुंबई स्थानकातील जनरल तिकिट खरेदी करत असाल तर त्याची वॅलिडिटी केवळ १ तासांचीच असते. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही एका तासाच्या आत कोणताही ट्रेन पकडून तेथून जाऊ शकता. मात्र जर तुम्ही लहान शहरातील स्थानकात जात असेल आणि जनरल तिकिट खरेदी केले असेल तर स्थानक सोडण्यासाठी तुमच्याकडे ३ तास असतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.