१५ ऑगस्टला लाल किल्ल्यवरुन देशाला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले होते की आपल्याला गुलामीच्या मानसिकतेपासूनच्या मुक्तीचा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे. आजकाल प्रत्येक क्षेत्रात भारतात जगातील महाशक्तींसोबत पावले टाकत पुढे जात आहे. परंतु भारतीय नौसेनेच्या झेंड्यामध्ये आतापर्यंत गुलामीचे एक प्रतीक जोडले गेले होते. आता हे हटवण्यात आले आहे. आज भारतीय नौदलाला त्यांचा नवा झेंडा मिळणार आहे.(Indian Navy Flag)
नौदलाची निशाणी असलेला त्यांचा झेंडा आता नव्या रुपात आल्याने तो सर्व वॉरशिप, ग्राउंड स्टेशन आणि नेवल एअरबेसवर फडकवला जाणार आहे. यापूर्वी सुद्धा भारतीय नौदलाच्या झेंड्यात बदल करण्यात आला होता. याआधी चार वेळा झेंड्याच्या निशाणीत बदल केला आहे. तर जाणून घेऊयात कधी-कसे बदल झाले आहेत त्याबद्दल आधिक आणि त्या संदर्भातील त्याचे महत्व काय आहे.
भारतीय नौदलाचा नवा झेंडा
भारतीय नौदलाच्या झेंड्यामध्ये जो क्रॉस होता तो हटवण्यात आला आहे. तो ब्रिटिश काळाचा प्रतीक होता. क्रॉस हटवल्यानंतर इंडियन नेव्हीच्या क्रेस्टच्या या निशाणीला सहभागी करुन घेण्यात आले आहे. जो एंकरचे प्रतीक आहे. विक्रांतच्या कमिशनिंग कार्यक्रमादरम्यान नौदलाला नवी निशाणी मिळाली आहे.
आतापर्यंत असा होता झेंडा
कधी-कशी बदलली नौदलाची ओळख?
-१९५० मध्ये नौदलाच्या निशाणीमध्ये युनियन जॅक हटवून तिरंगा जोडण्यात आला.
-२००२ मध्ये नौदलाच्या झेंड्यामधून सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आला.
-२००४ नौदलाच्या निशाणीमध्ये सेंट जॉर्ज यांच्या रेड क्रॉस पुन्हा आला.
-२०१४ मध्ये अशोक चिन्ह्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिण्यात आले होते.
-२०२२ मध्ये क्रॉस हटवून आणि क्रेस्टचा सहभाग करण्यात आला.
नव्या झेंड्याचे महत्व
नौदलाच्या या झेंड्यामधील बदलावामुले एक संदेश असा स्पष्ट होते की, आपण गुलामीचे प्रतीक हटवले आहे. जसे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन आपल्या संबोधनात म्हटले होते. आतापर्यंत चालत आलेल्या झेंड्याकडे पाहिल्यास त्यामध्ये जो क्रॉस होता तो ब्रिटेनच्या राष्ट्रीय झेंड्याशी मिळताजुळता होता. सफदे रंगावर लाल क्रॉसला सेंट जॉर्ज क्रॉस रुपात मानले जाते. सेंट जॉर्ज क्रॉस ईसाई संत नावावरुन ठेवण्यात आले. जे तिसऱ्या धर्मयुद्धातील योद्धा मानले जातात. इंग्लंडच्या नॅशनल फ्लॅगवर सुद्धा त्यांचांच सेंट जॉर्ज क्रॉसची निशाणी आहे.(Indian Navy Flag)
आता सर्व वॉरशिप, ग्राउंड स्टेशन आणि नौदलाच्या एअरबेसवर नौदलाचा नवा झेंडा फडकताना दिसून येणार आहे.नव्या झेंड्यामुळे भारताच्या समुद्राचे हेरिटेज अधिक वाढणार आहे.
हे देखील वाचा- मेड इन इंडिया हॉवित्झर तोफेमुळे भारतीय सेना अधिक सशक्त; काय आहेत याची वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित नौदलाचा नवा झेंडा
नौदलाच्या नव्या झेंड्यावर एका कोपऱ्यात भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. तर अर्ध्या भागात नौदलाचा क्रिस्ट आहे. निळ्या रंगाचा हा प्रतीक अष्टकोनाकृतीमध्ये आहे. जो चारही दिशा आणि चार कोन म्हणजेच आठ ही दिशांमध्ये भारतीय नौदलाची निशाणी दाखवतो. या अष्टकोनी प्रतीकाच्या खाली देवनागरीत नौसेनेचे घोषवाक्य ‘शं नो वरुण:’ असे लिहिण्यात आले आहे. या सूत्रवाक्याचा अर्थ आहे की, पाण्याचे देवता वरुण आमच्यासाठी मंगलकारी आहे. भारतीय सनातन परंपरेत वरुणला जल देवता मानले गेले आहे.
किनाऱ्याला दोन गोल्डन रंगाची बॉर्डर असणारा अष्टकोनाकृती प्रतीक देशातील महान मराठी योद्धे छत्रपती सिवाजी महाराज यांच्या आरमार दलापासून प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे. खरंतर शिवाजी महाराज यांना भारताच्या नौदलाचे जनक असे म्हटले जाते. याचे श्रेय सुद्धा शिवाजी महाराजांना दिले जाते. तर शिवाजी महाराजांचा नौदलाचा दूरदृष्टीकोन पाहता त्याची स्थापना केली. ६० फाइटिंग शिप आणि ५ हजार सेनेसह त्यांनी समुद्रातून घुसखोरी करण्याऱ्यांना आव्हान दिले होते.