पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या कुठे आहे, याची शोधाशोध सुरु झाली आहे. लंडनमध्ये रहात असलेल्या इम्रान खानच्या दोन मुलांनी हा शोध सुरु केला आहे. गेल्या दोन वर्षापासून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इम्रान खानबरोबर या मुलांना संपर्क साधता येत नाही, त्यासाठी त्यांनी आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. आमच्या वडिलांचा शोध घ्या आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या तावडीमधून सोडवा अशी विनंती कासिम आणि सुलेमान या इम्रान खानच्या दोन मुलांनी केली आहे. (Imran Khan)
पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती गंभीर आहे. सैन्यप्रमुख असीम मुनीर याच्याविरोधात नाराजी वाढत असल्यामुळे सैन्यातही विद्रोह होत असल्याची बातमी आहे. अशातच इम्रान खान याच्या जीवाला धोका असल्याची बोलले जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी इम्रान खान यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यानंतर इम्रान खान यांच्याबरोबर कुठलाही संपर्क न झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे. लंडनमध्ये रहात असलेल्या इम्रान खानच्या मुलांनी याबाबत एक मुलाखत दिली असून इम्रान खानला लष्कराच्या तावडीतून सोडवावे, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या कुठे आहे, असा प्रश्न त्याच्या मुलांना पडला आहे. इम्रान खान यांचे पुत्र कासिम आणि सुलेमान यांनी त्यांच्या वडिलांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय समुदयाकडे आवाहन केले आहे. इम्रान खान दोन वर्षांपासून तुरुंगात आहे आणि त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात हलवल्याची बातमी आली. (Latest Updates)
नंतर त्याच्या प्रकृतीबाबत कुठलाही खुलासा आलेला नाही. इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहे. तब्बल 190 दशलक्ष पौंडांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. इम्रान खानच्या सुटकेसाठी 9 मे 2023 पाकिस्तानमध्ये मोठा जनक्षोभ उसळला. इम्रान खान समर्थक रस्तावर उतरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं. या आंदोलनामागे इम्रान खानचे प्रक्षोभक वक्तव्य असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान याच्यावर अनेक अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. मध्यंतरी त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची बातमीही आली होती. काही दिवसांपूर्वी इम्रान खानला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत कुठलीही माहिती कुटुंबियांना मिळालेली नाही. लंडनमध्ये रहात असलेल्या इम्रान खान यांच्या कासिम आणि सुलेमान या दोन मुलांची पत्रकार मारियो नवफल यांनी नुकतीच मुलाखत घेतली. (Imran Khan)
या मुलाखतीमध्ये या मुलांनी आपल्या वडिलांना खोट्या आरोपामध्ये अडकवल्याचा आरोप केला आहे. त्यांना तुरुंगात मुलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी पाकिस्तानी सरकारवर केला आहे. कासिम आणि सुलेमान हे आपली आई, जेमिमा गोल्डस्मिथसोबत लंडनमध्ये रहात आहेत. दोन वर्षापासून आपल्याला वडिलांबरोबर संवादही साधायला परवानगी मिळाली नसल्याच खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाय ही मुलाखत फक्त वडिलांच्या काळजीपोटी देत असून भविष्यात पाकिस्तानच्या राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नसल्याचेही या दोन मुलांनी स्पष्ट केले आहे. ही दोन मुले क्वचित पाकिस्तानमध्ये येतात. इम्रान खान तुरुंगात असल्यापासून त्यांनी पाकिस्तानचा दौरा टाळला आहे. माजी पंतप्रधान आणि क्रिकेट स्टार इम्रान खान यांची मोठी संपत्ती पाकिस्तानमध्ये आहे. इस्लामाबादमधील बानी गाला येथे 181500 चौरस यार्डमध्ये त्यांची हवेली ही अतिशय शानदार आहे. 750 दशलक्ष डॉलर्सची किंमत असलेल्या या हवेलीसमोर इम्रान खानच्या मालकीचे हेलिकॉप्टरही उभे आहे. (Latest Updates)
==============
हे देखील वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
Donald Trump : एडेन अलेक्झांडर आणि हमास !
==============
गेल्या दोन वर्षापासून तुरुंगात असलेल्या इम्रान खानला आपल्या या संपत्तीचीही काळजी आहे. इम्रानची लंडनमध्ये असलेली दोन्ही मुले याच हवेलीवर येत असत. मात्र दोन वर्षापासून तुरुंगात असलेल्या इम्रान खानला भेटण्याची त्यांना परवानगी न मिळाल्यामुळे त्यांनी पाकिस्तानपासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाची धुरा ही मुलं सांभाळतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सध्यातरी या मुलांनी यबाबत नकार दिला आहे. सध्यातरी त्यांना त्यांच्या वडिलांचा ठावठिकाणी शोधायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Imran Khan)
सई बने