बर्फाचा देश म्हणून अलास्काला ओळखले जाते. अलास्का हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, वन्यजीवांसाठी आणि नॉर्दर्न लाईट्ससाठी प्रसिद्ध आहे. अलास्कामध्ये मुबलक सोन्याच्या खाणी आणि नैसर्गिक संसाधने आहेत. अमेरिकेतील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असलेले टोंगास राष्ट्रीय वन उद्यान देखील अलास्कामध्ये आहे. बर्फाचे शहर असले, तरी अलास्कामध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः येथील नॉर्दर्न लाईट्सचा करिष्मा पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक अलास्कामध्ये येतात आणि या मनमोहक नैसर्गिक घटनेचा आनंद घेतात. आणखी एका नैसर्गिक आश्चर्यासाठी अलास्काला ओळखले जाते, ते म्हणजे, या अलास्कातून आता पुढचे ६५ दिवस सूर्यदेव गायब होणार आहेत. हो, पुढचे ६५ दिवस अलास्कामधून सूर्याचे दर्शन होणार नाही. (Alaska)

अलास्कामध्ये ध्रुवीय रात्र सुरु झाली असून त्यामुळे ६५ दिवसांनंतर सूर्योदय होणार आहे. या दरम्यान या अमेरिकेच्या बर्फाच्या शहरात तापमानचा पारा कमालीचा खालावणार आहे. अलास्कामध्ये रहात असलेले नागरिक या दरम्यान आपला बचाव कसा करतात, हेही जाणण्यासारखे आहे. अमेरिकेतील अलास्कामध्ये ध्रुवीय रात्र सुरू झाली आहे. १८ नोव्हेंबर रोजी या शहरात अन्य शहरांसारखा सूर्य मावळला. मात्र जगभरात मावळलेला सूर्य, दुस-या दिवशी उगवला. पण अलास्कामध्ये मात्र हा सूर्य आता २२ जानेवारी रोजी उगवणार आहे. अलास्कामध्ये दरवर्षी हा चमत्कार घडतो. या दरम्यान येथील तापमान प्रचंड खालावते, आणि आधिच सर्वत्र बर्फ असलेले हे शहर बर्फाच्या जाड चादरीखाली गुडूप होते. (International News)
दरवर्षी हा नैसर्गिक चमत्कार होत असल्यामुळे अलास्काच्या उटकियाग्विक शहरात सूर्यास्त पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. २०२५ मधील हा शेवटचा सूर्यास्त असल्यानं हे दृष्य कॅमेरात साठवून ठेवण्यासाठी अनेक पर्यटक आणि अभ्यासकही येथे आले होते. त्यानंतर अलास्का शहरानं “ध्रुवीय रात्री” मध्ये प्रवेश केला आहे. उटकियाग्विकमध्ये पुढील सूर्योदय २२ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. तोपर्यंत ४,६०० लोकसंख्या असलेले हे शहर सूर्याशिवायच जीवन जगणार आहे. या नैसर्गिक चमत्कारामागे एक सूत्र सांगण्यात येते, त्यानुसार सप्टेंबर आणि मार्च विषुववृत्त दरम्यान, पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर झुकतो. यामुळे उत्तर अक्षांशांमध्ये दिवसाचा प्रकाश हळूहळू कमी होतो आणि डिसेंबर महिन्याच्या आसपास शिखरावर पोहोचतो. या संपूर्ण काळात, दक्षिण क्षितिजाच्या जवळ फक्त एक मंद मंद प्रकाश दिसतो. या सर्वात येथील हवामान अत्यंत कठीण असते. तापमान अनेकदा शून्य फॅरेनहाइटपेक्षा खूपच खाली जाते. (Alaska)

सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांचे आयुष्य खडतर होते. येथील ४,६०० रहिवाशांच्या आयुष्यातील हे सर्वात कठीण दिवस असतात. रोजचा दिनक्रम करतांनाही खूप सावधानता बाळगावी लागते. खाद्यपदार्थ म्हणून येथे फ्रोझन फूडचावापर केला जातो. वसंत ऋतू जवळ येताच, अलास्कामधील जीवन पून्हा पूर्वपदावर येते. पण मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही परिस्थिती पूर्णपणे उलट होते. मे ते ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत, सूर्य अलास्कामधून कधीही मावळत नाही. म्हणजेच सूर्यदेव कायम या अलास्कामध्ये दिसतात. रात्र येथे होतच नाही. अलास्कामधील दिवस आणि रात्रीचा हा खेळ तेथील नागरिकांना नित्याचा झाला असला तरी अलास्कामध्ये येणा-या पर्यटकांना त्याचे मोठे आश्चर्य वाटते. किंबहुना सततची रात्र किंवा सततचा दिवस अनुभवण्यासाठी आता या अलास्कामध्ये येणा-या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. अलास्का हे अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य आहे. (International News)
=========
Country : ‘या’ अनोख्या देशात लग्न करण्यावर आणि मुलं जन्माला घालण्यावर आहे बंदी
=========
अलास्का हा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा उप-राष्ट्रीय प्रदेश आहे. शिवाय तिसरे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य असून सर्वात कमी लोकसंख्या घनता या भागात आहे. अलास्काच्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या अँकरेज महानगर क्षेत्रात राहते. अलास्काची अर्थव्यवस्था मासेमारी आणि नैसर्गिक वायू यांच्यामुळे अमेरिकेत १०व्या स्थानावर आहे. येथेच सर्वात मोठा अमेरिकन लष्करी तळ आहे. अलिकडच्या वर्षात अलास्कामध्ये पर्यटनता मोठी वाढ झाल्यामुळे येथील नागरिकांच्या रोजगारातही वाढ झाली आहे. अलास्कामध्ये राष्ट्रीय जंगले, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव आश्रयस्थाने अनेक असून त्यात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे संवर्धन करण्यात येते. (Alaska)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
