Home » इंटरनॅशनल बिग कॅट्स एलायंस म्हणजे काय आहे? जे पीएम मोदींनी सुरु केलयं

इंटरनॅशनल बिग कॅट्स एलायंस म्हणजे काय आहे? जे पीएम मोदींनी सुरु केलयं

by Team Gajawaja
0 comment
IBCA
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल बिग कॅट्स एलांयसचा शुभारंभ केला आहे. हे एलांयस जगातील सर्वाधिक मोठ्या मांजरीच्या प्रजातींना वैश्विक संरक्षण देणार आहे. पीएम मोदी यांनी याची घोषणा एलायंस टाइगर प्रोजेक्टच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात केली. मोदी यांनी नुकत्याच बांदीपुर नॅशनल पार्कची साफारी केली. या एकूणच कार्यक्रमादरम्यान त्यांनी वाघांच्या संख्येबद्दलचा एक रिपोर्ट जारी केला. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले की, सध्या देशात ३१६७ वाघ आहेत. इंटरनॅशनल बिग कॅट्स एलांयसमध्ये वाघ, सिंह, लेपर्ड, हिम लेपर्ड, प्युमा, जॅग्वार आणि चित्त्याच्या संरक्षणासाठी लक्ष केंद्रित करणार आहेत.(IBCA)

IBCA चे पाऊल भारताने उचलले आहे. हे एलांयस जगभरातील सात मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संरक्षण करण्याकडे अधिक भर देणार आहे. त्याचसोबत यासर्व प्रजातींची अनधिकृत शिकार आणि अनधिकृत वन्य जीवन व्यापारावर अंकुश घालण्यासाठी प्रभावी पाऊले उचलम्यासाह हे एलांयस हे सुद्धा सुनिश्चित करणार आहे की, त्यांची संख्या वाढली जाईल. अशा एलायंसमध्ये जवळजवळ ९७ देशांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. हे सर्व देश एक कायदा तयार करती आणि एका ई-पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्यावर वैश्विक स्तरावर लक्ष ठेवले जाईल.

आयबीसीएला यशस्वी बनवण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये भारत १०० मिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक फंड देणार आहे. पाच वर्षानंतर जो कोणताही देश सदस्य असेल त्यांना सदस्यता शुल्क द्यावा लागेल. तसेच यामध्ये कॉन्ट्रिब्युशन ही करावे लागेल. यामध्ये एक महासभा जी एलायंसला लीड करण्यासाठी एक सात सदस्यांच्या टीमचे गठन ही केले जाईल. हे परिषद महासचिवांची निवड करतील जे आयबीसीएचा प्रमुख असेल.

भारतात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. आकडेवारीनुसार २०१४ मध्ये देशांत २२२६ वाघ होते, २०१८ मध्ये हा आकडा वाढून २९६९ झाला होता. या व्यतिरिक्त लेपर्डच्या संख्येत ही वाढ झाली. २०१४ मध्ये देशात ७९१० चित्ते होते. २०१८ मध्ये त्यांचा आकडा वाढून १२८५२ झाला होता. अशा प्रकारे गुजरात मध्ये सिंहांची संख्या सुद्धा वाढली आहे. २०१५ मध्ये ते ५२३ होते जे २०२० मध्ये वाढून ६७४ ऐवढे झाले.(IBCA)

हे देखील वाचा- जनतेसाठी खुले होणार शिमला मधील १७३ वर्ष जुने राष्ट्रपती भवन

खरंतर टाइगर प्रोजेक्टला ५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे पीएम मोदी यांनी नुकताच बांदीपुर नॅशनल पार्कची सफारी केली. दक्षिण भारतातील हे राष्ट्रीय उद्यान काही प्रकारे खास आहे. येथे असे काही प्राणी, वनस्पती आहेत ज्या ऐकेकाळी विलुप्त झाल्या होत्या. हे नॅशनल पार्क देशातील सर्वाधिक मोठ्या नॅशनल पार्कपैकी एक आहे. स्थापनेच्या वेळी याचे क्षेत्रफळ ९० वर्ग किमी होते. मात्र नंतर ते ८७३ वर्ग किमी झाले. हे नॅशनल पार्क तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.