Home » Bunker : गर्भश्रीमंतांसाठी समुद्राच्या पोटात अवाढव्य बंकर

Bunker : गर्भश्रीमंतांसाठी समुद्राच्या पोटात अवाढव्य बंकर

by Team Gajawaja
0 comment
Bunker
Share

गर्भश्रीमंतांसाठी समुद्राच्या पोटात अवाढव्य बंकरहॉलिवूड चित्रपटांची मोहिनी अवघ्या जगावर आहे. अशा चित्रपटांमध्ये पृथ्वीचा अंत होत आला आहे, आणि त्यातून माणसांना वाचवण्यासाठी एखादी बोट तयार करण्यात येते, किंवा एखादं विमान तयार होतं किंवा अगदी एखाद्या टोकाच्या बेटावर एक घर बनवण्यात येतं. अशा परिस्थितीत अवघ्या पृथ्वीवर पाण्याचे साम्राज्य निर्माण होते, किंवा सर्व पृथ्वी बर्फाच्या आवरणाखाली झाकली जाते. काही चित्रपटांमध्ये तर पृथ्वीवर परग्रहींचे आक्रमण झालेले दाखवले आहे. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मग मानवाची केविलवाणी धडपड या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. ही चित्रपटापूरती कथा नाही. कारण सध्या सर्वशक्तीमान अशा देशातही पृथ्वीवर मोठी आपत्ती कोसळली तर त्यातून वाचण्यासाठी अगणित अशा पैशांचा वापर करुन बंकर तयार करण्यात आले आहेत. हा देश अर्थात अमेरिका आहे. अमेरिकेच्या एका माजी वरिष्ठ अधिका-यांनी या बंकरचा खुलासा केला आहे. (Bunker)

या माहितीनं खळबळ उडाली. पण हे बंकर कुणासाठी आहेत, हे कळल्यावर त्यावर संताप व्यक्त होत आहे. कारण अरबो, खरबो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले हे निवडक बंकर फक्त अमेरिकेतील गर्भश्रीमतांना वाचवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. जर अमेरिकेवर भविष्यात अणुहल्ला झाला किंवा अगदी परग्रहींनी आक्रमण केले, तर अमेरिकेतील गर्भश्रीमंत या बंकरमध्ये आश्रयाला जाणार आहेत. या बंकरमध्ये हे श्रीमंत कितीही दिवस सर्व सुखसुविधांसह आरामात राहू शकणार आहेत. हा खुलासा ऐकल्यावर अमेरिकेत अधिक खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या आधारावर गोल्डन ग्लोब तयार होणार असल्याचे जाहीर केले आहे. अशात आता अमेरिकेत आधीच गर्भश्रीमंतांसाठी संरक्षणाची व्यवस्था झालेली आहे, हे स्पष्ट झाल्यावर सर्वसामान्यांच्या पैशाचा हा गैरवापर आहे, अशी भावनाही व्यक्त होत आहे. (International News)

माजी अमेरिकन अधिकारी कॅथरीन ऑस्टिन फिट्स यांनी केलेल्या दाव्यानं अमेरिकेत खळबळ निर्माण झाली आहे. फिट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार 1998 ते 2015 दरम्यान 170 भूमीगत बंकर बांधण्यात आले आहेत. हे बंकर समुद्राखाली हजारो फूट खोलवर बांधण्यात आले असून त्यावर थोडेथोडके नसून चक्क 21 ट्रिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. हे 21 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये किती आहेत, हे जाणलं की डोळेच गरगरणार आहेत. भारतीय रुपयांत ही रक्कम अंदाजे 1,743,00,00,00,000 रुपये एवढी आहे. या बंकरमुळे पृथ्वीवर कुठलिही आपत्ती आली तरी अमेरिकेतील गर्भश्रीमंत सुरक्षित राहतील असा दावा करण्यात आला आहे. (Bunker)

समुद्राच्या खोल पोटात बांधलेल्या या बंकरचे रहस्य अमेरिकेच्या सर्व राष्ट्राध्यक्षांसह अन्य मान्यवरांना माहित असल्याचेही फिट्स यांनी सांगितले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांच्या प्रशासनात काम करणा-या फिट्स यांनीच ही माहिती दिल्यामुळे याची पडताळणी गरजेची नाही, हे वास्तव आहे, अशी चर्चा आता अमेरिकेतील सोशल मिडियामध्ये सुरु झाली आहे. हे बंकर त्सुनामी, भूकंप, अग्नितांडव, चक्रीवादळासह अणुहल्ल्यामुळे पसरणारे रेडिएशन यापासूनही सुरक्षा प्रदान करणार आहेत. हे सर्व बंकर एका गुप्त ट्रान्झिट सिस्टमद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत. यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह लष्करी अधिकारी, मान्यवर नेते मंडळी आणि अमेरिकेतील निवडक गर्भश्रीमंत रहाणार आहेत. (International News)

अर्थशास्त्रज्ञ मार्क स्किडमोर यांनी 2017 मध्ये यासंदर्भात एक अहवाल जाहीर केल्याचेही फिट्स यांनी सांगितले. हे सर्व बंकर एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षाही अधिक सुरक्षा आणि सुविधा देणारे आहेत. यात वैद्यकीय सेवा, वेलनेस प्रोग्राम, बॉलिंग अ‍ॅली, इनडोअर स्विमिंग पूलसह अगदी आयव्ही थेरपी रूमचा समावेश आहे. हे बंकर जेव्हा तयार करण्यात आले, तेव्हा त्यात रहाण्यासाठी अमेरिकेसह जगभरातील लाखो गर्भश्रीमंतांनी अर्ज केल्याचीही माहिती आहे. यामुळे समुद्राच्या पोटात अशाच प्रकारचे अन्य बंकर तयार करण्यात येत असल्याचेही फिट्स यांनी सांगितले. हे बंकर बांधण्यासाठी अमेरिकन सरकारनं आपल्या बजेटमध्ये हेराफेरी केल्याचाही आरोप फिट्स यांनी केला आहे. संरक्षण आणि शहरी गृहनिर्माण मंत्रालयाच्या बजेटमधून मोठी रक्कम गहाळ करुन, तो पैसा या भूमिकत बंकर बांधणीसाठी वापरला गेल्याचे त्यांनी सांगितले. (Bunker)

=========== 

हे देखील वाचा : Jonas Masetti : कोण आहेत, पद्मश्री जोनास मासेट्टी !

Kim Jong Un : किमची युद्धनौका फुस्स !

===========

2018 मध्येही अशाच प्रकारे गर्भश्रीमंतांसाठी तयार होणा-या बंकरची माहिती ब्लूमबर्गच्या अहवालात देण्यात आली होती. त्यात सात अब्जाधीशांनी न्यूझीलंडमध्ये बंकर खरेदी केल्याची माहिती होती. शिवाय मार्क झुकरबर्ग यांनी एका हवाई बेटावर एक भव्य महाल बांधला असून त्याच्याखाली बंकर असल्याचेही सांगण्यात आले होते. हे बंकर बांधणा-या कामगारांनी यासंदर्भात माहिती दिली होती. एकूण जगभर जी युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याला ब-याचशी अमेरिकेचे धोरण जबाबदार आहे. जगाला युद्धाच्या खायीत लोटून अमेरिकेचे नेते आणि श्रीमंत मंडळी या अलिशान बंकरमध्ये बसून युद्धाची मजा घेणार आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.