Healthy Habits : आजकाल धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजणांना आपल्या आरोग्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी थकवा आणि आजारपण मागे लागते. पण दैनंदिन सवयींमध्ये काही बदल केल्यास तुम्ही हेल्थी राहू शकताच. पण दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक देखील वाटू शकते. जाणून घेऊया अशा कोणत्या चार सवयी आहेत ज्या सकाळ ते संध्याकाळपर्यंत फॉलो केल्या पाहिजेत.
-पुरेशा प्रमाणात पाणी प्या
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरिर हाइड्रेट राहण्यास मदत होते. शरिरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यासही मदत होते. याशिवाय शरिराला हाइड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर थोडाथोडा वेळाने पाणी प्या. यामुळे थकवा दूर होईल.
-व्यायाम करा
प्रत्येक दिवशी कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करा. यामध्ये वेगवेगळ्या वर्कआउट एक्सरसाइज करू शकता. एक्सरसाइज केल्याने शरिरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होण्यासह स्नायू मजबूत होतात. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता.
-हेल्दी पदार्थांचे सेवन
नाश्तामध्ये पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. जसे की, फळं, अंडी, शेंगदाणे अथवा ड्राय फ्रुट्स, याशिवाय भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबरचे प्रमाण भरपूर असावे, जे आरोग्यासाठी हेल्दी असतील. जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये कॅलरी आणि वसाचे प्रमाण अत्याधिक असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशातच बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. (Healthy Habits)
-पुरेशी झोप घ्या
दररोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी. यामुळे आपले शरिर आणि मेंदू दोन्हीही तंदुरुस्त राहण्यास मदत होते. याशिवाय काही आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.