मध्य प्रदेश राज्यातील नर्मदा नदीच्या काठावर अनेक पुरातन मंदिरे आहेत. या मंदिरांपैकीच भगवान शंकराच्या एका मंदिराबाबत भक्तांमध्ये खास आस्था आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना धनाची देवता म्हणून ज्यांची पूजा केली जाते, त्या कुबेरानं केल्याची मान्यता आहे. हरदा जिल्ह्यातील हंडिया गावात नर्मदेच्या काठावर असलेल्या या भगवान शंकराच्या मंदिराला भगवान रिद्धनाथ मंदिर (Riddhanath Temple) म्हणून ओळखले जाते. कुबेराची सर्व संपत्ती रावणानं घेतल्यावर त्यांनी येथे येऊन शंकराची आराधना केली. त्यावर भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन कुबेराला हि-यांची खाण दिली, अशी मान्यता आहे. यावेळी कुबेरानं हे भगवान रिद्धनाथाचे मंदिर (Riddhanath Temple) उभारल्याचे सांगण्यात येते. महाशिवरात्रीच्या निमित्तानं येथे भाविकांची मोठी गर्दी होते. या मंदिराच्या शिखरावर 12 घुमट आहेत. हे घुमट म्हणजे देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांची प्रतीके मानण्यात येतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात आल्यावर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे.
नर्मदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर रामायण काळातील असल्याचे मानले जाते. भगवान कुबेर यांची संपत्ती गेल्यावर ते या ठिकाणी आले, त्यांनी येथे तपश्चर्या केली. यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना पुन्हा धनवान केले. कुबेराला ज्याप्रमाणे संपत्ती मिळाली, तशीच धनसंपदा येथे येणा-या प्रत्येक भक्ताला मिळते अशी मान्यता आहे. या मंदिरात भाविकांची कायम गर्दी असते. मंदिराची अनेक वैशिष्ट्यही आहेत. अन्य मंदिरांप्रमाणे हे मंदिर आयताकृती किंवा गोलाकार आकारात नाही. तर मंदिर कासवाच्या आकारासारखे आहे. कासव हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच या मंदिराचा आकार कासवासारखा असल्याचे सांगितले जाते. येथे भगवान रिद्धनाथाची (Riddhanath Temple), संपत्तीचा देव म्हणून पूजा केली जाते. या मंदिराचा उल्लेख नर्मदा पुराणातही आढळतो. येथे पूजा अभिषेक केल्यावर भाविकांना धन, संपत्ती आणि संपन्नता प्राप्त होते, असे सांगण्यात येते. याशिवाय भगवान रिद्धनाथाचे हे प्राचीन मंदिर (Riddhanath Temple) भारतीय पौराणिक वास्तुकलेसाठीही ओळखले जाते. मंदिरावर एकच कळस असतो. मात्र हे मंदिर त्यासाठी अपवाद आहे. या मंदिरावर 12 घुमट आहेत. हे सर्व घुमट म्हणजे देशभरात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचे प्रतीक असल्याचे मानण्यात येते. या मंदिरात गेल्यावर 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य लाभते, असा विश्वास भाविकांना आहे. मंदिरातील शिवलिंगाची रोज वेगळी-वेगळी सजावट करण्यात येते.
याशिवाय या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका सांगण्यात येते, ती म्हणजे, भगवन शंकरानी कुबेराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना हिऱ्याची खाण दिली. ते ठिकाण म्हणजे हरदा जिल्ह्यातील हिरापूर हे गाव आहे. या गावात हिऱ्याची खाण पुरातन काळी होत्या, असे सांगण्यात येते. त्यामुळे आजही भगवान रिद्धनाथांच्या (Riddhanath Temple) कृपेने येथे येणाऱ्या भाविकांना धन-संपत्ती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. काही स्थानिक हे मंदिर रामायण काळातील असून यातील शिवलिंगाची स्थापना धनाची देवता कुबेर यंनी केल्याचे सांगतात.
========
हे देखील वाचा : जगातील सर्वाधिक मोठा हत्ती ‘थेचिकोट्टुकावु रामचंद्रन’ राहिलाय वादग्रस्त
========
म्हणूनच प्राचीन शैलीतील या मंदिरात भगवान शिवाची पूजा धन-संपत्तीची देवता म्हणूनही केली जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, येथे माता पार्वतीची मुर्ती नाही. या शिवलिंगासमोर नंदीच्या वर 9 देवींची स्थाने आहेत. असे मानले जाते की मंदिरात देवी माया विराजमान आहे. तिच्या परवानगीशिवाय येथे कोणताही भक्त शिवलिंग पाहू शकत नाही. त्यामुळे काही भक्त मंदिरात आल्यावर देवी माया हिचीही पुजा करतात. येथील नर्मदेच्या कुंडालाही आध्यात्मिक महत्त्व आहे. देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पाणी कधीच संपत नाही. नर्मदेच्या उत्तर तीरावर भगवान सिद्धनाथाचे मंदिर आहे. तर भगवान रिद्धनाथाचे मंदिर दक्षिण दिशेला आहे. येथे येणाऱ्या भाविकांना प्रथम नर्मदा स्नानाचे पुण्य लाभते. त्यानंतर नर्मदेच्या पाण्याने भगवान रिद्धनाथाची पूजा भक्त करतात. आता महाशिवरात्रीच्या निमित्तानं या मंदिराचे रुप पालटले आहे. महाशिवरात्रीच्या आधीपासूनच येथे भाविक गर्दी करतात. साधारण आठवाभर हा भक्तांचा ओघ असाच चालू असतो. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात.
सई बने