Home » महाराष्ट्राचा पहिला जिल्हा गडचिरोली

महाराष्ट्राचा पहिला जिल्हा गडचिरोली

by Team Gajawaja
0 comment
Gadchiroli Development
Share

२६ ऑगस्ट १९८२ रोजी महाराष्ट्रातील ३१ वा जिल्हा म्हणून जाहीर झालेला गडचिरोली हा आत्तापर्यंत महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा जिल्हा म्हणून ओळखला जात असे. आदिवासी बहुल जिल्ह्याला नक्षलवादाचे ग्रहण लागले आहे. मात्र या जिल्ह्याला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून ओळख प्राप्त करुन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठीच गडचिरोलीच्या वडलापेठ, अहेरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सूरजागड इस्पात पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. (Gadchiroli Development)

गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड्स मेटल्सनंतर सूरजगड इस्पात हा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या दोन प्रकल्पामुळे गडचिरोलीचा चेहरा बदलणार आहे. या भागातील युवकांना रोजगाराच्या नव्या वाटा मिळणार आहेत. शिवाय या दोन प्रकल्पातून भविष्यात देशातील ३० टक्के पोलाद तयार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामुळे गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा नसून पहिला जिल्हा असल्याची ग्वाही दिली.
एकादशीच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या विकास कार्याची आणखी एक मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. येथे सूरजागड स्टील प्रकल्पाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे या आदिवासी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात ८००० नोक-या निर्माण होणार आहे. शिवाय गडचिरोली जिल्हा हा पोलाद उत्पादनाचा देशातील अग्रगण्य जिल्हा होणार आहे.

त्यामुळे लवकरच गडचिरोली जिल्ह्याची ओळख ही भारताचा स्टील हब अशी होणार आहे. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात लॉयड्स मेटल्स प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्यानंतर आलेल्या सूरजगड इस्पात मुळे भविष्यात देशातील ३० टक्के पोलाद निर्माण होणार आहे. उद्योग आले की त्यापाठोपाठ दळनवळन आणि अन्य सुविधाही येतात. शिवाय जिल्हा देशाबरोबर जोडला जाणार आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये यापुढेही अनेक पुरक उद्योगव्यवसाय येतील अशी आशा आहे. (Gadchiroli Development)

मुख्य म्हणजे, या सूरजगड इस्पात साठी मंत्री धरमरावबाबा आत्राम यांनी आपली वडिलोपार्जित २५० एकर जागा विना मोबदला कारखान्यासाठी दिली आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. ५ हजार कोटीची गुंतवणूक या प्रकल्पात करण्यासाठी अनेक उद्योग समुह उत्सुक आहेत. या प्रकल्पाची भरभराट झाली तर परिसराचीही होईल, आणि या भागातील तरुणांना नोक-या मिळतील. शिक्षण मिळेल, हा व्यापक दृष्टीकोण ठेवत मंत्री धरमरावबाबा आत्राम यांनी ही जमिन प्रकल्पाला दिली आहे.

१९६० पासून खनिज संशोधन संस्थांच्या अहवालात सूरजागडमध्ये उच्च प्रतिचे लोह असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण नक्षलवाद्यांचा वावर असलेल्या या भागात २०१५ पर्यंत साधे १ ग्रॅम लोहही काढता आलेले नाही. या भागात उद्योग आणण्याचे प्रयत्न झाले. पण नक्षलवाद्यांचा या उद्योगांन आणि त्यानंतर येणा-या विकासाला कायम विरोध राहिला आहे. त्यामुळेच २०२१ मध्ये लॉयड्स मेटल्स मधील वरिष्ठ अधिका-यांची नक्षलवाद्यांनी क्रुरपणे हत्या केली आहे. त्यानंतर काही वर्षांनी नक्षलवाद्यांनी कंत्राटदारांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. वारंवार होणा-या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे लॉयड्स मेटल्सने काम थांबवले होते. (Gadchiroli Development)

२०२८ नंतर परत कंपनीनं या लोह उत्खनन करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतरही नक्षलवाद्यांचे हल्ले सहन करावे लागले. अखेर या सर्वांवर मात करत लॉयड्स मेटल्सने उत्पादन सुरु केले आहे. आता सूरजागड पोलाद प्रकल्पामुळे त्याला अधिक बळ मिळणार आहे. वडलापेठ गावातील सूरजगड स्टीलसाठी १०००० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून गडचिरोलीच्या ८० टक्के तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास आहे. सुरजागड हे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत टेकडीवार ठाकूर बाबांचे स्थान आहे.

================

हे देखील वाचा-  संभाजीनगरात दोन गटात झालेल्या वादावरुन हिंसा, संजय राउतांनी दिली अशी प्रतिक्रिया

================

येथील वडिलोपार्जित जागा कारखान्याला दिल्यामुळे धरमरावबाबा आत्राम यांचे मान्यवरांनी कौतुक केले आहे. हा प्रकल्प ३५० एकर परिसरात बांधला जाणार आहे. या प्रकल्पातून आठ दशलक्ष टन पोलाद तर लॉयड्स प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलादचे उत्पादन होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पोलाड आणि गडचिरोलीच्या एकूण उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादन होईल.गडचिरोली जिल्ह्याच्या विकासत यामुळे भर पडणार आहे. जिल्ह्यात विमानतळ आणि रेल्वेचे काम सुरू आहे. यासोबतच येथे टीचिंग हबही तयार करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयला मंजुरी मिळाली आहे. समृद्धी महामार्गाने गडचिरोली जिल्हा मुंबईबरोबर जोडला जाणार आहे. यासोबतच चार्मोशी ते काकीनाडा बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार होत आहे. हा आदिवासी जिल्हा विकासाच्या वाटेवर आहे. (Gadchiroli Development)

सई बने.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.