जगात विविध घटना अशा घडतात ज्यावर सहज विश्वास ठेवणे अशक्य असते. तर एखादी रहस्यमय वस्तू सापडल्यास त्याबद्दल तर जोरदार चर्चा सुरु होते. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी छट पूजा झाल्यानंतर नागपूरातील अंबाझरी तलावासह परिसराची स्वच्छता करण्यात आली. तेव्हा तेथे पाण्यावर तरंगणारा पाच किलोचा दगडं आढळून आला. या दगडामुळे आता जोरदार चर्चा सुद्धा सुरु झली आहे. याचे व्हिडिओ ही सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत. याबद्दलची अधिक माहिती जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यांनी दिली. (Floating Stone)
संजय बाटवे यांनी याबद्दल सांगताना असे म्हटले की, अंबाझरी तलावाच्या काठावर हा दगड तरंगताना दिसून आला. तेव्हा आधी काही कळेलच नाही. कारण खरंतर दगडं हे वजनाने जड असल्याने पाण्यात बुडतात. म्हणून त्यांनी तो दगड घेतला आणि पुन्हा पाण्यात टाकला. तेव्हा तो दगड बुडण्याऐवजी तरंगत होता. याचा व्हिडिओ काढल्यानंतर जेव्हा तो सोशल मीडियात अधिक व्हायरल करण्यात आला तेव्हा अधिकच त्याबद्दल चर्चा सुरु झाली.

नक्की कुठे मिळाला हा दगड आणि कसा?
खरंतर छठपूजेच्या आधी अंबाझरी तलावासह परिसराची स्वच्छता करण्यात येत होती. तेव्हाच हा दडग तेथे सापडला. हा दगड मिळाल्यानंतर तो तरंगतोय यामुळे विविध तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. त्यावेळी पौराणिक कथा ते शास्रीय कारण या दगडामागे काय असू शकतात यावर ही बोलले गेले.पण बटवे असे म्हणतात की, या दगडात कोणताही जादू नसून त्याच्या आतील भागात पोकळी निर्माण झाल्याने तो तरंगत असावा.
हे देखील वाचा- इस्रोकडून २०३५ पर्यंत बनवण्यात येणार स्वत:चे स्पेस स्टेशन
शास्रीय कारण यामागील काय असू शकत?
जमिनीच्या भूगर्भातील लावारस मधून काही पदार्थ बाहेर पडतात. त्यामधून राख, फेस किंवा लावा ही बाहेर पडतो. जेव्हा याचा रस थंड होतो तेव्हा पोकळ आणि हलके दगड निर्माण होतात. त्यांनाच प्युमिस दगड असे ही म्हटले जाते. असे दगड पाण्यात न बुडता तरंगतात. अशा पद्धतीचे दगड आपल्याला श्रीरामाने बांधलेल्या सेतुसाठी सुद्धा आढळून येतात. (Floating Stone)
दरम्यान, छठ पूजा ही गेल्या महिन्याच्या अखेरीस झाली. ती साजरी करण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ बहुसंख्येने भाविक येतात. तर भाविकांना त्यावेळी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून याची काळजी महापालिकेकडून सुद्धा घेण्यात आली होती.