जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर परिवारात प्रॉपर्टी संदर्भात खुप वाद निर्माण होतो. काही वेळेस प्रॉपर्टी नसेल तर त्या व्यक्तीवरील कर्ज किंवा बँक लोन संदर्भात वाद होतो. त्याचसोबत जेव्हा प्रॉपर्टी बद्दल बोलले जाते की, बहुतांश लोक येतात. पण जेव्हा कर्ज फेडायचे असते तेव्हा माणसं ही पुढे येत नाहीत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की, वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला कर्ज फेडावे लागते त्याबद्दल. तर जाणून घेऊयात याबद्दलच अधिक. कर्ज फेडण्यासंदर्भात काही नियम आहेत. त्यानुसार खरंच मुलाला कर्ज फेडावे लागते की तो कर्जाशिवाय सुद्धा राहू शकतो या संदर्भात ही बघुयात.(Father debts rules)
काय सांगतो कायदा?
संविधानातील आर्टिकल ५२ आणि ५३ असे सांगतो की, वडिल किंवा त्यांच्या वडिलांचे सुद्धा कर्ज असेल आणि त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची परतफेड ही संपत्तीचा उत्तराधिकारी जो कोणीही असेल त्याला करावी लागते. तज्ञांकडून असे सांगितले जाते की, उत्तराधिकारी कोण आहे किंवा कर्ज कोणत्या स्वरुपाचे आहे हे निर्भर करते. त्याचसोबत यामध्ये काही अटी सुद्धा आणि त्यावरुन निर्णय घेतला जातो. जसे की व्यर्तीचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीने कोणती संपत्ती किंवा धन मागे सोडले आहे का.
त्याचसोबत मुलाची संपत्ती आपल्या हिंमतीवर तयार केली असेल तर गोष्ट वेगळी असते. पण वडिलांची संपत्ती ही वेगळी असते. या स्थितीत जेवढ्या संपत्तीचा मालक असेल तेवढीच कर्जाची जबाबदारी घेतली जाते. उदाहरणार्थ, समजा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मालमत्ता चार लोकांमध्ये विभागली गेली, तर कर्जाचे दायित्व त्याच प्रमाणात असेल.
या व्यतिरिक्त काही गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात. जसे की आणखी कोणाची जबाबदारी आहे की नाही. त्याचसोबत काही परिस्थितीत आणि अन्य कायदे लक्षात घेता योग्य तो निर्णय घेतला जातो.या व्यतिरिक्त विविध कर्ज हे सुद्धा कोण कसे भरणार हे सुद्धा निर्भर करते.(Father debts rules)
हे देखील वाचा- भाडेकरुंना सुद्धा भरावा लागणार १८ टक्के जीएसटी, जाणून घ्या नियम
-गृहकर्जाच्या बाबतीत, वारसदाराला मालमत्तेवर हक्क मिळतो, अशा परिस्थितीत त्याला कर्ज द्यावे लागेल.
-कार कर्जाच्या बाबतीत, एखादी व्यक्ती कार विकून पैसे मिळवू शकते.
पर्सनल लोनच्या बाबतीत बँकेच्या नॉमिनीची जबाबदारी असते आणि विमा असेल तर ती वेगळी बाब आहे.
-व्यवसाय कर्जामध्ये, मालमत्तेच्या आधारावर कर्ज आकारले जाते.
-क्रेडिट कार्डमध्ये देखील मालमत्तेच्या आधारावर पैसे आकारले जातात.