अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सध्याच्या दिवसात नव्या स्तरावर पोहचत आहे. सध्या तो १ डॉलरच्या तुलनेत ८२.३६७ रुपये आहे. गेल्याच आठवड्यात तो ०.२४ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता.कोणतेही चलन हे दुसऱ्या देशाच्या चलनाच्या तुलनेत किती मजबूत किंवा कमजोर आहे हे एक्सचेंज रेटमुळे कळते. भारतीय रुपया आणि डॉलरची तुलना केल्यास जर तुम्ही ८२.३६ रुपये हे डॉलरमध्ये कंन्वर्ट केल्यास तर तुम्हाला केवळ १ डॉलर मिळेल. हाच एक्सचेंज रेट आहे. (Exchange rate of Rupees)
आता असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, एक्सचेंज रेट कोण ठरवतो? अशातच सहज उत्तर येते की, आरबीआय, पण असे नाही आहे. खरंतर भारतीय रुपयांचा एक्सचेंज रेट कोणतीही संस्था किंवा संघटना करत नाही. केवळ डॉलरच अन्य परदेशी चलानाच्या तुलनेत सुद्धा भारतीय रुपयाचा एक्सचेंज रेट काही बाजार फॅक्टर्सवर ठरवला जातो. दरम्यान, १९९० पूर्वी हे काम आरबीआयकडून केले जायचे. तेव्हा भारतात एक फिक्स एक्सचेंज रेटला फॉलो केले जायचे. त्यावेळी देशातील करेंसी अमेरिकन डॉलर आणि अन्य मुद्रांच्या एका बास्केटसह पॅग होती. पॅग म्हणजेच दुसऱ्यांच्या चलनाच्या तुलनेत आपल्या चलनाला एक मर्यादित सीमा ठरवली होती आणि त्यानुसारच त्यामध्ये वाढ आणि घट व्हायची. या सिस्टिममध्ये आरबीआय किंवा केंद्र सरकार आपली करेंसीचा एक्सचेंज रेट ठरवतात.
का बंद झाली ती प्रणाली?
जेव्हा एखादा देश आपले चलन दुसऱ्या देशाच्या चलनासोबत पॅग करतो तेव्हा तो आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार स्वायत्त रुपात मौद्रिक निती बनवू शकत नाही. हेच एक मोठे कारण होते की, त्यामुळे जुनी एक्सचेंज रेट प्रणाली बंद करण्यात आली होती. या व्यतिरिक्त १९९२ मध्ये भारतीय रुपयात वेगाने घट दिसू लागल्याने लोकांनी डॉलर खरेदी करण्यास सुरुवात केली होती. यामुळे आरबीआयकडील डॉलर जवळजवळ संपलेच होते आणि त्यांच्यासाठी रुपयाला पॅग करणे अत्यंत मुश्किल झाले होते. याच दरम्यान काही आर्थिक बदल ही झाले आणि भारताने फ्लोटिंग एक्सचेंज रेट निवडला.
आता कशाप्रकारे ठरवला जातो एक्सचेंज रेट?
याचे मोठे कारण मागणी आणि पुरवठा आहे. जसे की, एखाद्या वस्तूची मागणी वाढते तेव्हा स्वाभाविकच त्याचा रेट वाढू लागतो. हिच स्थिती करेंसीची सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारासाठी डॉलरची मागणी जेवढी वाढते तेव्हा त्याचे मूल्य हे अधिक वाढते. यालाच फ्लोटिंग एक्सचेंज रेट असे म्हटले जाते. रुपयाच्या संदर्भात आपण हे अशा पद्धतीने समजून घेऊ शकतो. भारतात जेवढ्या किंमतीचा माल युएसला निर्यात केला जातो त्यापेक्षा अधिक आयात केला जातो. व्यापाऱ्यांसाठी युएस मधून सामान खरेदी करण्यासाठी डॉलरमध्ये पेमेंट करावे लागते आणि ते डॉलरमध्ये खरेदी करतात. यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि त्याचसोबत त्याचे मूल्य ही आणखी वर जाते. या व्यतिरिक्त महागाई, व्याज दर, सोन्याची आयात-निर्यात आणि सार्वजनिक कर्ज यासारख्या कारणांमुळे एक्सचेंज रेट हा प्रभावित होत राहतो. (Exchange rate of Rupees)
हे देखील वाचा- Capital Gains Account Scheme चे फायदे तुम्हाला माहितेयत का?
एकाच देशात बँकांमध्ये विविध एक्सचेंज रेट का?
जेव्हा तु्म्ही एखाद्या परदेशात जायचे असते तेव्हा तु्म्हाला तेथील चलन लागते. तेव्हा तुम्ही ते भारतीय रुपया देऊन तेथील चलन खरेदी करता. येथे बँका किंवा एखादी अन्य आर्थिक संस्था तुम्हाला एक्सजेंच रेटच्या नुसार दुसरे चलन देतात. मात्र ही एका देशात विविध असू शकते. यामागे बँकांची वेगवेगळी निती असतात. ज्यानुसार ते चलन आणि आंतरराष्ट्रीय मार्केटच्या दरांवर खरेदी आणि विक्रीसाठी स्वतंत्र असते. त्याचसोबत बँकांचे सर्विस चार्जेस सुद्धा विविध असतात आणि त्याचा प्रभाव सुद्धा एक्सचेंजनंतर मिळणाऱ्या रक्कमेवर पडतो.