Setting in iPhone for Email : तुमच्याकडे आयफोन असल्यास एकही ईमेल तुमच्या डोळ्याखालून जाणार नाही असे होणारच नाही. यासाठी फोनमध्ये एक लहान सेटिंग ऑन करावी लागेल. खरंतर, फोनमध्ये ईमेल आल्यानंतर काहीवेळेस कळले जात नाही. 2-3 दिवसानंतर ईमेल तपासून पाहिल्यावर त्याचे महत्व कमी होते. अशातच ईमेल वेळेवर पहायचे असल्यास काय करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया….
या स्टेप्स करा फॉलो
आयफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन सर्चबारमध्ये फेच लिहून सर्च करा. येथे फेट न्यू डेटा ऑप्शनचा पर्याय येईल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर जा. येथेही फेच न्यू डेटा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. हे ऑटोमेटिकली सेट होईल. हीच सेटिंग तुम्हाला बदलायची आहे. ऑटोमेटिकमध्ये जीमेल बॅकग्राउंड तेव्हाच रिफ्रेश होईल ज्यावेळी फोन वायफाय किंवा नेटला कनेक्ट असेल. या सेटिंगला हटवून येथे देण्यात आलेले कोणतेही ऑप्शन बदलू शकता. मॅन्युअली किंवा 30 ते 15 मिनिटांसाठी स्वत:हून रिफ्रेश होण्यासाठी सेट करू शकता. (Setting in iPhone for Email)
Magnifier कॅमेराचा वापर
वरील सेटिंग केल्यानंतर आयफोनमध्ये आणखी एक खास फीचर आहे. आयफोनमध्ये मॅग्नीफायर कॅमेऱ्याचा वापर करून काम अगदी सोपे करू शकता. यासाठी अॅपच्या सेक्शनमध्ये जाऊन मॅग्नीफायर लिहून सर्च करा. यानंतर मॅग्नीफायर कॅमेरा आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंकर कॅमेऱ्याचा वापर करू शकता. हा कॅमेरा सामान्य कॅमेरा प्रमाणेच काम करतो.
आणखी वाचा :