इजिप्तमधील (Egypt) पिरॅमिड प्रसिद्ध आहेत. इजिप्तमध्ये दगडांनी बांधलेले असे 118 पिरॅमिड आहेत. इजिप्तचे फारो, म्हणजेच सम्राट आणि त्याच्या पत्नीसाठी बांधलेले हे पिरॅमिड बघण्यासाठी आज जगभरातून लाखो पर्यटक इजिप्तला भेट देतात. पिरॅमिड आणि त्याच्या सभोवतालचे संकुल हे जगातील सर्वात जुने दगडी बांधकाम मानले जाते. या पिरॅमिडच्या बांधणीसाठी लाखो टन दगड या भागात आणला गेला. इजिप्तच्या रुक्ष भागात असे दगड कोठेही आढळत नाहीत. मग असे लाखो टन एकदम या भागात कसे आले ? हे कोडे अद्यापही उलगडले नाही. पिरॅमिड आणि त्याची बांधणी, त्यामध्ये असलेल्या सम्राटांच्या ममी यावर गेली अनेक वर्ष संशोधन चालू आहे. अतिशय आधुनिक सामुग्रीच्या सहाय्यानं हे संशोधन चालू आहेत. यातून अनेक आश्चर्यकारक खुलासे झाले आहेत. या अभ्यासकांना पिरॅमिडच्या अंतर्भागात जाता आले आहे. पण एवढे भव्य बांधकाम करण्यासाठी आणि व्यवस्थित कापलेले दगड कुठून आणि कसे आणले हे कोडे अभ्यासकांना सुटले नव्हते. मात्र आता त्याबाबतही एक खुलासा झाला आहे. हे भव्य दगड कुठल्याही मानवानं नाही तर परग्रहींनी या पिरॅमिडसाठी आणल्याचे एक संशोधकांनी स्पष्ट केले आहे. परग्रहींनी थोडे थोडके नव्हे तर 2.3 दशलक्ष मोठे दगड पिरॅमिडच्या बांधणीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे.
इजिप्तच्या (Egypt) पिरॅमिडला बघण्यासाठी लाखो पर्यटक भेट देतात. दगडी बांधकाम असलेल्या या पिरॅमिडच्या बांधकामासाठी वापरलेले दगड कुठून आणले होते, याचा शोध गेली अनेक वर्ष अभ्यासक घेत होते. पिरॅमिडमध्ये 2.3 दशलक्ष इतके मोठे दगड आहेत. एवढे मोठ्या संख्येनं आणि वजनदार दगड नेमके कसे आणले, हा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर शास्त्रज्ञासह सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. या दगडांचा प्रवास कसा आणि कुठून झाला यावर शोध घेतल्यावर शास्त्रज्ञांनी हे एक महत्त्वाचे रहस्य शोधले असल्याचा दावा केला आहे.
गिझाचा ग्रेट पिरॅमिड 2.3 दशलक्ष चुनखडी आणि ग्रॅनाइट ब्लॉक्सपासून बनलेला आहे. प्रत्येकाचे वजन सुमारे दोन टन आहे. क्रेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय हे शक्य कसे झाले हे कोडे होते आणि जर हे सर्व काम क्रेनच्या सहाय्यानं झालं असेल तर त्या क्रेन आता कुठे आहेत, हा प्रश्नही अभ्यासकांना पडला होता. त्यामुळेच काही अभ्यासक हे पिरॅमिड परग्रहींनी बांधल्याचा निष्कर्ष काढत होते. आता त्याच्यावरच आधारीत अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार इजिप्शियन (Egypt) नागरिकांनी महाकाय खडक गिझापर्यंत नेण्यासाठी नाईल नदीची उपनदी वापरली. हा दावा भक्कम करण्यासाठी या पिरॅमिडवर संशोधन करणा-या गटानं गिझा पूरक्षेत्रातून घेतलेले पाच जीवाश्म मातीचे नमुने फ्रान्समधील प्रयोगशाळेत पाठवले. त्यामध्ये परागकण आणि वनस्पतींचे जीवाश्म सापडले, असेच जीवाश्म नाईल नदीच्या काठावर आढळतात. या अभ्यासकांच्या गटानं नऊ मीटरपर्यंत खोदकाम केले. नदीच्या पात्रात केलेल्या या खोदकामातून त्यांना यश मिळाले. तिथे त्यांना नदीचा एक भाग मिळाला.
========
हे देखील वाचा : रहस्याने भरलेले भोजेश्वर मंदिर
========
आता जमिनीखाली गेलेल्या याच भागातून पिरॅमिड बांधणीसाठी दगड काढल्याचा अहवाल अभ्यासकांनी दिला आहे. पिरॅमिड बांधल्यानंतर 2000 वर्षांनंतर 600 बीसीईच्या आसपास ही नदी कोरडी पडली. या बांधणीसाठी नदीच्या पात्रातून दगड काढण्यात आले. हे दगड आत्ताही जसेच्या तसे आहेत. त्यावरुनच त्याची निवड अत्यंत चोखंदळरित्या करण्यात आल्याचे मतही या अहवालात नोंदवण्यात आले आहे. शिवाय हे दगड नदीपात्रातच कापण्यात आले. त्यासाठी तशा आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. हे सर्व मानवी शक्तीच्या पलिकडे होते. त्यामुळेच या दगडांच्या निवड प्रक्रीयेपासून ते त्यांची वाहतूक करण्यापर्यंत अन्य कोणाची तरी मदत झाल्याची नोंदही या अभ्यासकांनी आपल्या अहवालात केली आहे. त्यामुळे इजिप्तचे पिरॅमिड बांधण्यासाठी परग्रहींनी मदत केल्याचा दावा पुन्हा एकदा पक्का झाला आहे. इजिप्तमधील (Egypt) पिरॅमिज हे जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. 146.6 मीटर म्हणजेच 481 फूट वर उभा असलेला, ग्रेट पिरॅमिड हा आजही हजारो वर्षापूर्वीसारखाच आहे. पिरॅमिडच्या बांधकामासाठी प्रामुख्याने गिझा पठारावरील स्थानिक चुनखडीचा वापर करण्यात आला. या ग्रेट पिरॅमिडच्या आत तीन कक्ष आहेत. शिवाय त्याच्या आतही काही कक्ष असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
सई बने