प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. तर बंगाली समुदायातील लोक या दिवसापासून देवी दुर्गेची स्थापना करतात. नवरात्रीच्या ९ दिवसापर्यंत देवीची पूजा केली जाते. तर विजया दशमीच्या दिवशी बंगाली समुदायातील लोक देवीचे विसर्जन करतात. या दिवशी त्यांच्यामध्ये सिंदूर खेला ही विधी केली जाते. तेव्हा विवाहित महिला देवी दुर्वेला सिंदुर अर्पण करतात. देवी दुर्गेसंदर्भात अशी धार्मिक मान्यता आहे की, नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये देवी दुर्गा आपल्या माहेरी येते. अशातच देशभरात काही भागात देवीचे मंडप सजवले जातात.(Durga Puja)
नऊ दिवस देवी दुर्गेची मनोभावे पूजा- अर्चना केली जाते. तर दशमीच्या दिवसी सिंदूरची होळी खेळली जाते. अशाने देवीची पाठवणी केली जाते. पश्चिम बंगाल, बंगाल आणि बांग्लादेशासारख्या ठिकाणी या दरम्यान मोठे सोहळे सुद्धा आयोजित केले जातात. या दिवशी पानांनी देवी दुर्गेला सिंदूर अर्पित केले जाते. अशी मान्यता आहे की, तिची पाठवणी केल्यानंतर ती आपल्या सासरी जाते. त्यावेळी तिच्या भांगामध्ये सिंदूर लावले जाते.
अशा पद्धतीने केली जाते ही प्रथा
सिंदूर खेला या विधी दरम्यान पानांनी देवीच्या गालाला स्पर्श केला जातो. नंतर याच पानांनी तिला सिंदूर लावले जाते त्यानंतर दुर्गेला पान आणि मिठाईचा भोग दाखवला जातो आणि तिचा आशीर्वाद घेतला जातो. त्यानंतर विवाहित महिला एकमेकांना सिंदूर लावतात आणि नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा उत्सव दुर्गा विसर्जनाच्या दिवशी केला जातो.(Durga Puja)
हे देखील वाचा- ज्ञानव्यापी मस्जिदीच्या संदर्भात खास गोष्टी ज्या जुन्या पुस्तकांमध्ये आढळतात
फार जुनी आहे ही प्रथा
विजया दशमीच्या दिवशी देवीला सिंदूर लावण्याची प्रथा ही फार जुनी आहे. बंगाली समुदायात याला विशेष महत्व आहे. ही प्रथा सर्वात प्रथम बंगाल मध्ये सुरु झाली होती. जवळजवळ ४५० वर्षांपूर्वी महिलांनी देवी दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, कार्तिकेय आणि भगवान गणेशाची पूजा करुन विसर्जनापूर्वी त्यांचा श्रृंगार केला होता. असे मानले जाते की, देवाने प्रसन्न होतात आणि त्यांना सौभाग्याचे वरदान देतात.
तर दुर्गा पूजा हिंदू धर्मातील लोकांसाठी एक महत्वपूर्ण पर्व असल्याचे मानले जाते. देवीची कृपा नेहमीच आपल्यावर रहावी त्यासाठी प्रत्येक वर्षी दुर्गा पूजा केली जाते. खरंतर देवी दुर्गा ही दुष्ट शक्तींना नष्ट करते. पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षाचा वध केला होता.