इस्रायलची आर्यन डोम प्रणाली ही आत्तापर्यंत जगातील सर्वाधिक प्रगत सुरक्षा प्रणाली म्हणून ओळखली जाते. यामुळे हवेत रॉकेट आणि मोर्टार हल्ले नष्ट करण्यात येतात. इस्रायलची ही प्रणाली 20 इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. दिवस असो वा रात्र किंवा कितीही बदलणारे वातावरण असो, ही आर्यन डोम प्रणाली सक्षम ठरली आहे. आता या आर्यन डोम प्रणालीसारखीच सुरक्षा अमेरिकेच्या आकाशात उभारण्यात येणार आहे. (Donald Trump)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची माहिती देत, अमेरिकेला गोल्डन डोमची सुरक्षा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेला सध्या चीन, इराण, उत्तर कोरिया या देशांपासून वाढता धोका आहे. उत्तर कोरियासारखा देश तर अमेरिकेला कायम क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी देत आहे. त्यामुळे या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एक मजबूत सुरक्षा कवच अमेरिकेवर असणे गरजेचे ठरले आहे. इस्रायलकडे असलेल्या आयर्न डोम, या हवाई संरक्षण प्रणालीसारखीच त्याची रचना आहे. मात्र ट्रम्प इस्रायलपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान या आर्यन डोम प्रणालीमध्ये वापरणार आहेत. त्याला गोल्डन डोम हे नाव देण्यात आले आहे. हे गोल्डन डोम पूर्ण झाल्यावर जगातील कुठल्याही देशातूनच काय पण अंतराळालून सोडल्या जाणा-या क्षेपणास्त्रांपासून अमेरिकेचे संरक्षण होणार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी योजना जाहीर केली आहे. 175 अब्ज डॉलर्स किंमतीची ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अमेरिकेतील नागरिकांना सुरक्षा देण्यात तत्पर ठरणार आहे. सध्या अमेरिकेला चीन, इराण, उत्तर कोरियासह रशियासारख्या देशांकडूनही हल्ल्याची भीती आहे. (International News)
या गोल्डन डोमसाठी भारतीय चलनात सुमारे 2.05 लाख कोटी रुपयांची तरतूद कऱण्यात आली असली तरी यासाठी यापेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. मात्र अमेरिकेच्या सुरक्षतेसाठी कुठलिही तडजोड कऱण्यात येणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी गोल्डन डोमची जबाबदारी अंतराळ दलाचे जनरल मायकेल गुएटलिन यांना दिली आहे. गुएटलिन हे ट्रम्प यांच्या विश्वासू लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. या गोल्डन डोम प्रणालीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागेल अशी शक्यता आहे. ही प्रणाली अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असेल. यामुळे अमेरिकेकडे झेपावणा-या कुठल्याही बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा प्रतिकार करता येणार आहे. अमेरिकेवर भविष्यात होणा-या संभाव्य हल्ल्यांबाबत 2023 मध्ये एक अभ्यास समिती काम करत होती. या समितीच्या अहवालानुसार अमेरिकेला चीन, रशिया आणि उत्तर कोरियाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रापासून धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Donald Trump)
हा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अमेरिकेच्या सुरक्षितेसाठी आर्यन डोम प्रणाली कार्यान्वित करण्याची मागणी होती. त्यातच उत्तर कोरियासारखा देश सातत्यानं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करत अमेरिकेला आव्हान देत आहे. या सर्वांपासून बचाव करण्यासाठी ट्रम्प यांनी आर्यन डोमच्या धर्तीवर गोल्डन डोम संरक्षण प्रणालीची घोषणा केली. यामुळे अमेरिकेवर जमिन, समुद्र, अतंराळातूनही हल्ला झाल्यास तो रोखण्यात यश मिळणार आहे. यात अंतराळ-आधारित सेन्सर्स आणि इंटरसेप्टर्सचा समावेश आहे. यामुळे क्रूझ क्षेपणास्त्रे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि सर्व प्रकारच्या ड्रोन पासून अमेरिकेचे संरक्षण होणार आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज येथील मिसाईल डिफेन्स प्रोजेक्टचे संचालक टॉम काराको यांनी गोल्डन डोमसाठी कितीही खर्च झाला, तरी ही अमेरिकेच्या भविष्याची ही गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे. (International News)
==============
हे देखील वाचा : Miyazaki Mango : जगातला महाग आंबा होतोय बिहारमध्ये !
Raw : रॉ एजंट म्हणून काम करायचे जाणून घ्या संपूर्ण प्रोसिजर
=============
युनियन ऑफ कन्सर्न्ड सायंटिस्ट्सच्या भौतिकशास्त्रज्ञ लॉरा ग्रेगो यांनी भविष्यातील युद्धे अंतराळातून होणार आहेत, त्यामुळे गोल्डन डोम हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 1983 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अशाच प्रकारची हवाई संरक्षण प्रणाली उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेगन यांना तेव्हा ही प्रणाली उभारण्यात यश आले नाही. आता ट्रम्प यांनी गोल्डन डोमची घोषणा केल्यामुळे रोनाल्ड रेगन यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. अर्थात या गोल्डन डोम प्रणालीला विरोधही सुरु झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर वॉरेन एलिझाबेथ यांनी गोल्डन डोम, एलॉन मस्क साठीच उभारण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत त्यांनी पेंटागॉनला पत्र लिहून या गोल्डन डोममधील खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Donald Trump)
सई बने