आपल्या देशाचे ह्दय म्हणून ज्या मध्यप्रदेशचा उल्लेख केला जातो, त्या मध्यप्रदेशमध्ये अनेक किल्ले आहेत. यातील अनेक किल्ल्यांचा स्वतंत्र इतिहास आहे आणि त्याच बरीच रहस्य दडली आहेत.(Mysterious story) अनेक वर्षानंतरही या रहस्यांचा शोध घेता आला नाही. मध्यप्रदेशमध्ये असाच एक राजवाडा आहे, की जो फक्त एका रात्रीसाठी वापरण्यात आला. गेल्या 400 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा राजवाडा म्हणजे, दतियाचा सातखंड राजवाडा. अद्वितीय कलेचे प्रतीक असलेला हा राजवाडा, 7 मजली असून कोणत्याही आधाराशिवाय उभा आहे. याव्यतिरिक्तही दतिया राजवाड्याभोवती अनेक रहस्ये आहेत. या राजवाड्याची वैशिष्यपूर्ण बांधणी आणि येथील कोरीव कामही खास आहे. त्यामुळे येथे हजारो पर्यटकांची ये-जा असते. (Mysterious story)
मध्यप्रदेशच्या ग्वालेरपासून 75 किमी अंतरावर हा राजवाडा आहे. दतिया महलला बीर सिंग महल म्हणूनही ओळखतात. हा राजवाडा सात मजली आहे(Mysterious story). बुंदेलखंडमधील दतिया राज्याचे संस्थापक महाराज बिरसिंह देव यांनी देशभरात अशी 52 स्मारके बांधली होती. दतिया महाल किंवा सत्खंड महालाला दतिया महाल, तसेच पुराण महाल किंवा जुना राजवाडा अशाही नावांनी स्थानिक ओळखतात. चारशे वर्षापूर्वी बांधलेला हा राजवाडा अद्यापही हा अतिशय सुंदर आणि मजबूत आहे(Mysterious story).
हा महाल बनवण्यासाठी नऊ वर्षे लागली. तर सुमारे 35 लाख रुपये खर्च झाल्याचे लेखी दस्तऐवज आहेत. हा राजवाडा दतिया शहराच्या पश्चिमेला एका खडकावर बांधण्यात आला आहे. हा राजवाडा म्हणजे, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा नमुना आहे. राजा बिरिसिंग देव यांनी बांधलेल्या सर्व 52 राजवाड्यांपैकी हा सर्वात मोठा राजवाडा आहे. मुख्य म्हणजे 1620 मध्ये बांधण्यात आलेल्या या राजवाड्यासाठी लाकूड किंवा लोखंडाचा वापर केलेला नाही. सात मजली सातखंडा केवळ विटा आणि दगडांनी बांधण्यात आला आहे. तरीही ही वास्तू अद्यापही भक्कम आहे. सातखंडा वाड्यात सुमारे ४४० खोल्या असून सर्वत्र मोठी अंगणे आहेत. या राजवाड्यात अनेक सुंदर आणि अप्रतिम चित्रेही आहेत, ती रंगवण्यासाठी सेंद्रीय रंगांचा वापर करण्यात आला आहे. या महालाच्या आवारात गणपती आणि माँ दुर्गा यांच्या मंदिरासोबतच एक दर्गाही आहे. यासोबतच या राजवाड्याशी अनेक रंजक गोष्टीही जोडल्या गेल्या आहेत. हा सुंदर फक्त एका रात्रीसाठी वापरण्यात आला होता. म्हणजे एका दिवसाशिवाय यात कोणीही राहिले नाही(Mysterious story).
या राजवाड्याबाबत सांगण्यात आलेली कथा मुघल साम्राज्याबरोबर जोडण्यात आली आहे. ग्वाल्हेरवर सिंधियांच्या राजवटीच्या खूप आधी हा भाग मुघल साम्राज्याखाली होता. अकबरचा मोठा मुलगा सलीमने आपल्या वडिलांविरुद्ध बंड केले आणि न्यायालय स्थापन केले. जे आता अलाहाबाद न्यायालय म्हणून ओळखले जाते. सलीमने असे पाऊल उचलल्यानंतर अकबराने पंतप्रधान अबुल फजल यांना त्याचे मन वळवण्यासाठी दिल्लीला पाठवले. मात्र अबुल फजलला राजकुमार सलीमला गादीवर बसवायचे नव्हते, त्याने सलीमला मारण्याचा डाव आखला. सलीमला ही बातमी समजली तेव्हा तो त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज झाला. त्याचवेळी बीरसिंह देव त्याच्याकडे आला आणि फजलला मारण्याचा सल्ला त्यांनी दिला. बीरसिंह हा सल्ला देऊनच थांबले नाहीत तर युद्धात त्यांनी फजलला धाराशाही केले. यामुळे बीरसिंहचे वजन सलीमच्या दरबारात वाढले. त्याचवेळी अकबरला त्याच्या या कृत्याचा राग आला आणि त्याने बीरसिंह देव याला पकडण्याचे आदेश दिले.(Mysterious story)
======
हे देखील वाचा : जागतिक युद्धात जेव्हा कंपन्या डबघाईला जात होत्या तेव्हाच Nikon ने रचला इतिहास
======
यामुळे बीरसिंह आणि अकबरच्या सैन्यात लढया होऊ लागल्या. दरम्यान अकबराचा मृत्यू झाला. तोपर्यंत सलीमने आपल्या वडिलांशी समेट केला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर तो युवराजातून राजा बनला. त्याने नाव बदलून जहांगीर नाव ठेवले. सलीम मुघल सम्राट झाल्यावर त्यांनी बीरसिंह देव यांना ओरछाच्या गादीवर बसवून त्यांचा मान वाढवला. तसेच बीरसिंह यांना साम्राज्यात 52 इमारती बांधण्यासाठी परवानगी दिली. यापैकी एक ठिकाण दतिया राजवाडा आहे. म्हणूनच दतिया महलला ‘बीर सिंह देव महल’ आणि ‘सातखंडा महाल’ असेही म्हणतात. या राजवाड्यात फक्त एक रात्र ओरछाला जाण्यापूर्वी बीरसिंह यांनी घालवली. त्यानंतर बीर सिंग देव किंवा त्यांच्या कुटुंबाने कधीही त्याचा वापर केला नाही. यामुळेच दातिया पॅलेस 400 वर्षांपासून ओसाड पडून असून आजपर्यंत कोणीही त्याचा वापर केलेला नाही. पण तरीही अत्यंत भक्कम अवस्थेत हा राजवाडा आहे. हा राजवाडा बघण्यासाठी आता पर्यटक मोठी गर्दी करतात.
सई बने