आधी चोर रात्रीच्या अंधारात घरात कोणी नसताना घरात घुसून चोरी करत होते. नंतर ते गॅंग बनवून घरात चोरी करायला लागले. जेव्हा विविध बँका अस्तित्वात आल्या, तेव्हा चोर बँकेत दरोडा टाकायला लागेल एटीएम चोरी करायला लागले. मग बँकांची सेक्युर्टी अधिक वाढली आणि पेमेंट्स डिजिटल झाले. मग याबाबतीत चोर का मागे रहावे, त्यांनी सुद्धा मोबाइलवर लिंक आणि OTP पाठवून लोकांना ठगण्यास सुरुवात केली. हळू हळू तीही ट्रिक जुनी झाली. त्यामुळे आता चोरांनी स्वत:साठी नवी स्कीम आणि तुमच्यासाठी नवा स्कॅम आणलाय. ज्याचं नाव आहे डिजिटल अरेस्ट, आणि हा स्कॅम फक्त ज्याला जास्त डिजिटल नॉलेज नाहीये अशा माणसासोबत होतं नाही. तर चांगलं ज्ञान असलेल्या माणसांसोबत सुद्धा हा स्कॅम होतोय. आतापर्यंत या स्कॅममुळे १२० कोटी रुपयांचा चुना भारतीयांना लागला आहे. त्यामुळे काय आहे हे डिजिटल अरेस्ट, आणि लोक या स्कॅमला बळी का पडतायेत, हे जाणून घेऊया. (Digital Arrest)
भारतात सायबर क्राइम हे एक गंभीर संकट बनत चाललं आहे. त्यात आता या स्कॅमर्सने लोकांना लुटण्यासाठी डिजिटल अरेस्ट ही आयडिया शोधून काढली आहे. हे डिजिटल अरेस्ट काय आहे तर, तर या स्कॅमर्सने या स्कॅमला दिलेलं नाव आहे. कायद्याच्या भाषेत असा शब्द अजून तरी अस्तित्वात आलेला नाही. एखाद्या व्यक्तीला फसवण्यासाठी हे स्कॅमर्स त्याला कॉल करून, तुम्ही पाठवलेल्या किंवा मागवलेल्या कुरिअरमध्ये अवैध सामान किंवा ड्रग्स असल्याचं सांगतात, किंवा तुमच्या बँक खात्यातून एक असं ट्रांजैक्शन झालं आहे जे Financial फ्रॉडशी रीलेटेड होतं. असे दोन्ही काराणं सांगून तुम्ही आता कायदेशीर रित्या फसू शकता असं हे स्कॅमर्स तुम्हाला सांगतात, थोडक्यात घाबरवतात. मुळात म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हे फ्रॉड वाटेलच कारण ते कॉलवर सुरू असतं. (Social News)
पण जेव्हा हे स्कॅमर्स तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात, तेव्हा व्हिडिओ कॉल वर समोर तुमच्या सोबत बोलणारा व्यक्ती एक सीआयडी ऑफिसर किंवा कोणीतरी मोठा पोलिस अधिकारी असतो. त्या सीआयडी किंवा पोलिस अधिकाऱ्याने वर्दी घातलेली असते. तो त्याच्या ऑफिसमधून, म्हणजेच पोलिस स्टेशनमधून तुमच्याशी बोलत असतो. त्यामुळे हा खरंच सीआयडी ऑफिसर आहे असं तुम्हाला वाटू शकतं. ते व्हिडिओ कॉलवर तुम्हाला तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेले आहात असं सांगतात.इतकंच नाही तुमचा विश्वास बसावा म्हणून ते तुम्हाला अरेस्ट वॉरेंट सुद्धा दाखवतात. (Digital Arrest)
त्यांच्या फसवण्याच्या टेक्निकचं एक उदाहरण द्यायचं झालं तर, इंडिया टूडेच्या इन्वेस्टिगेशन टीम ने डिजिटल अरेस्ट संदर्भात एक स्टींग ऑपरेशन केलं. ज्यामध्ये इंडिया टूडेच्या एका पत्रकाराला एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीच्या नावाने कॉल आला. त्या कॉल करणाऱ्या स्कॅमरने पत्रकाराला तुमचं एक पार्सल मुंबईमध्ये अडकल्याचं सांगितलं. ते पार्सल मुंबईवरून बीजिंगला पाठवत होतात असंही स्कॅमर म्हणाला. पत्रकारचं नाव, आयडी प्रूफ आणि फोन नंबर देखील सांगितला, ज्याचा वापर पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी करण्यात आला होता. त्या स्कॅमरने पार्सल Costum ऑफिसर्सने पकडलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर या स्कॅमरने मुंबईच्या एका कथित पोलिस अधिकाऱ्याला म्हणजे स्कॅमरलाचं कॉलवर अॅड केलं. बनावट अधिकाऱ्याने अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत चिंता व्यक्त करताना पत्रकाराला पार्सलबाबत चौकशी केली. (Social News)
खोट्या पोलीस अधिकाऱ्याने पत्रकाराला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. त्याने पत्रकाराला सांगितलं की, १० ग्राम ड्रग्स सापडलं तर ३ ते ७ वर्षांची शिक्षा होते. तुमच्या पार्सलममध्ये ४०० ग्राम ड्रग्स सापडलं आहे. तो बनवाटी पोलिस अधिकारी एवढ्या वर थांबला नाही त्याने पत्रकराला आणखी एक धमकी दिली. “पुढच्या तासाभरात तुमच्या नावावर शस्त्र किंवा मृतदेह सापडला तर? असा प्रश्न सुद्धा विचारला. आता स्कॅमर एका पत्रकाराशी बोलत होता म्हणून नशीब. एखाद्या सामान्य नागरिकाशी बोलत असता तर तो सामान्य व्यक्ती घाबरलाच असता. डिजिटल अरेस्ट केल्यानंतर हे स्कॅमर त्या व्यक्तीचे सगळे कागदपत्र आणि बँकेचे सुद्धा डॉक्युमेंटस दाखवण्यास सांगतात, आणि मग तुमच्या मेहनतीच्या कमाईवर डल्ला मारतात. हे स्कॅमर खासकरून वयस्क किंवा रीटायर व्यक्तीलाच फसवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या स्कॅम पासून लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले आहेत की,“डिजिटल अरेस्टच्या शिकार झालेल्या लोकांमध्ये प्रत्येक वर्ग, प्रत्येक वयाचे लोक आहेत. (Digital Arrest)
======
हे देखील वाचा : वेंगाबाबा भविष्यवाणी रिटर्न !
====
भीतीमुळे लोकांनी आपल्या मेहनतीने कमावलेले लाखो रुपये गमावले आहेत. तुम्हाला कधीही असा फोन आला, तर तुम्हाला घाबरायचं नाही. कोणतीही सरकारी एजन्सी फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर अशा प्रकारे चौकशी करत नाही. फोन आल्यानंतर थांबा, घाबरू नका, शांत रहा. तडकाफडकी तुम्ही कोणतीही पाऊल उचलू नका. कोणालाही तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि तक्रार करा.” आताही तक्रार तुम्ही कुठे करू शकता तर, राष्ट्रीय सायबर क्राइमच्या हेल्पलाइन नंबरवर १९३० असा आहे, किंवा त्यांच्या cybercrime.gov.in या वेबसाईटवर करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला म्हणजे तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट या स्कॅम बद्दल समजलं असेलच. तर याबद्दल आणखी लोकांना जागरूक करण्यासाठी, तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता. (Social News)