Home » Dawood Ibrahim : दाऊदची धावाधाव !

Dawood Ibrahim : दाऊदची धावाधाव !

by Team Gajawaja
0 comment
Dawood Ibrahim
Share

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमधील लपलेल्या दहशतवाद्यांना कापरे भरले आहे. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचाही समावेश आहे. दाऊद गेली अनेक वर्ष पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. मात्र याच पाकिस्तानवर होणारे भारतीय हल्ले बघितल्यावर तो आणि त्याचे साथीदार घाबरले आहेत. त्यांनी स्वतःच्या सुरक्षितेसाठी पाकिस्तानमधून पळ काढल्याची बातमी आहे. भारताच्या हवाई हल्ल्यांना घाबरलेला हा डॉन जीव वाचवण्यासाठी कराचीहून पळून गेला आहे. पाकिस्तान सोडून दुबई किंवा तुर्कीसारख्या देशांमध्ये आता दाऊद लपून बसल्याची माहिती पुढे आली आहे. (Dawood Ibrahim)

भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे कराचीमध्ये लपलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झोप उडाली आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दाऊद आणि अनीस, छोटा शकील या त्याच्या साथीदारांनी कराची शहर सोडले आहे. भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे दाऊदला भीती वाटू लागली होती. भारत सरकारच्या गुन्हेगारांच्या लिस्टमध्ये दाऊदचा पहिला नंबर आहे. त्यामुळे भारत सरकार आपल्यावरही असाच हवाई हल्ला करेल अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे 7 मे रोजी भारतीय लष्करानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर दाऊदने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. 1993 मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटातील दाऊद इब्राहिम हा मुख्य आरोपी आहे. याशिवाय भारातातील अन्यही दहशतवादी हल्ल्यांच्या मागे हाच दाऊद सहभागी आहे. भारतातून पळाल्यावर दाऊद काही काळ दुबईमध्ये रहात असल्याची माहिती आहे. मात्र पाकिस्तान हे कायम त्याच्यासाठी सुरक्षित ठरले. त्यामुळे त्यानं आपल्या कुटुंबासह पाकिस्तानमध्ये बस्तान बसवले. (Latest News)

कराचीमधील मोक्याच्या ठिकाणी दाऊदचे व्हाईट हाऊस नावाचे घर आहे. हे घर म्हणजे, मोठ्या राजवाड्यासारखे आहे. या दाऊदच्या ठिकाणाला पाकिस्तान सैन्य आणि पोलीसांनीही सुरक्षा दिली आहे. दाऊदच्या घराच्या आसपासही कोणी नवखा दिसला तरी त्याची चौकशी करण्यात येते. दाऊदच्या घरात काय पण तो रहात असलेल्या भागातही जाण्यासाठी पोलीस, सैन्य आणि दाऊदचे स्वतःचे सुरक्षा रक्षक यांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. कराचीमध्ये मोठ्या बंदोबस्तात रहाणा-या याच दाऊदला भारतीय लष्कराची किती भीती वाटते, हे पुन्हा उघड झाले आहे. पाकिस्तानवर भारताचे हवाई हल्ले सुरु झाल्यावर पहिल्यांदा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला आहे. दाऊद आता पाकिस्ताननंतर दुबईमध्ये लपून बसल्याचा अंदाज आहे. 1993 पासून तो पाकिस्तान आणि दुबई याच दोन देशांमध्ये प्रवास करत असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये दाऊद आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाच मोठ्या मालमत्ता असल्याची माहिती आहे. शिवाय दुबईमध्येही दाऊदच्या अनेक मालमत्ता आहेत. त्यामुळेच दाऊद दुबईमध्ये गेल्याची माहिती पुढे येत आहे. (Dawood Ibrahim)

दुबई आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, ब्राझील, फिलीपिन्स, हाँगकाँग या देशातही दाऊद आणि त्याचे साथीदार आश्रयास गेल्याची शक्यता आहे. हे देश गुन्हेगारांसाठी सर्वात सुरक्षित देश म्हणून ओळखले जातात. गुन्हे केल्यानंतर भारतातून पळून जाणारे गुन्हेगार अनेकवेळा पाकिस्तान, नेपाळ, दुबई, कॅनडा आणि युएई सारख्या देशांमध्ये आश्रय घेतात. या देशांसोबत भारताचा प्रत्यार्पण करार आहे. मात्र गुन्हेगारांना या देशातील सरकारचा राजाश्रय मिळतो, त्यामुळे ते अशा करारापासूनही स्वतःचे रक्षण करु शकतात. त्यातही पाकिस्तान, दुबई आणि युएई हे भारतीय गुन्हेगारांसाठी सर्वात सुरक्षित मानले जातात. या देशांसोबत भारताची गुन्हेगार प्रत्यार्पण प्रक्रिया कमकुवत आहे. गेली अनेक वर्षा याच कमकुवतपणाचा आधार घेत दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची स्थिती पहाता तो आणि त्याचे साथीदार कुटुंबासह सुरक्षित स्थळी पळाले आहेत. (Latest News)

==============

हे देखील वाचा : War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

INS Vikrant : म्हणून INS विक्रांत समोर पाकिस्तानची तंतरते !

==============

दाऊदवर भारतात, मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्या व्यतिरिक्त खून, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद यासारखे अनेक गंभीर गुन्हे आहेत. अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले असून त्याच्यावर 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस आहे. शिवाय यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने जगातील 10 मोस्ट वॉन्टेड फरारी गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश केला आहे. हाच फरारी गुन्हेगार आणि हजारो निरपराध नागरिकांना मारणारा आंतरराष्ट्रीय डॉन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता एका देशातून दुस-या देशात पळत आहे. (Dawood Ibrahim)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.