स्मार्टफोन आणि टॅबच्या जगाने जगातील प्रत्येकालाच बदलले आहे. आता ऑनलाईन खरेदी आणि सब्सक्रिप्शनच्या ट्रेंन्डमुळे ई-कॉमर्स कंपन्या आपल्या-आपल्या वेबसाईटवर डार्क पॅटर्नचा अंदाधुंदपणे वापर करू लागल्या आहेत. मात्र ग्राहकांसमोर याचा धोका वाढत चालला आहे. हेच कारण आहे की, केंद्र सरकारने भारतीय ई-कॉमर्स कंपन्यांना डार्क पॅटर्न पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. (Dark Pattern)
ग्राहक प्रकरणाचे सचिव रोहित कुमार यांच्या मते भारतात ७५ लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्स आहेत. त्यापैकी ९७ टक्के कंपन्या डार्क पॅटर्नचा वापर करत आहेत. अशातच ग्राहक त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाळ्यात अडकले जातात. कंपन्यांचे सब्सक्रिप्शन घेतले जाते पण त्यांना ते आता बंद करायचे असेल तर त्यांना लगेच ऑप्शन मिळत नाही. वेबसाइटवर अनसब्सक्राइब करण्याचा ऑप्शन लपवला जातो.
वास्तवात हे एक सब्सक्रिप्शनचे पॅटर्न आहे. त्यामुळे एकदा सब्सक्राइब केल्यानंतर त्यामधून बाहेर पडणे सोप्पे नसते. तुमच्या खात्यातून पैसे कापले जात राहतात. अशातच स्पष्ट आहे की, डार्क पॅटर्न ग्राहकांची जोखिम वाढवते. असे समजा एखाद्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे तुम्ही युजर आहात आणि तुम्ही एक असा पॉप-अप पाहिला ज्यामध्ये तुम्हाला काय हवयं असे विचारले गेले की, तुम्हाला वेबसाइटचा वापर अधिक उत्तम पद्धतीने करायचा आहे का? याच सोबत सेटिंग्सला पर्सनलाइज्ड करण्याचा ऑप्शन सुद्धा दिला गेला असते. याच ऑप्शनमध्ये डार्क पॅटर्न असतो.
सोशल मीडियातील कोणत्याही प्लॅटफॉर्मवर किंवा तुमच्या ईमेलच्या माध्यमातून मार्केटिंगच्या अशा अनेक लिंक आणि ऑफर येत राहतात. त्या पाहिल्यानंतर काही वेळा असे वाटते की, ते फार आकर्षक आणि उपयोगी आहे. वास्तवात त्यांचे डिझाइनिंग आणि प्रोग्रामिंग या ग्राहकांना आपल्या जाळ्यात कसे अडकवता येईल याच पद्धतीने केले जाते. काही वेळेस वेबसाइट्स साइन अप करण्यास ही सांगत राहते. कुकी एक्सेप्ट करण्यासाठी सांगते. मात्र तुम्हाला त्यामधून बाहेर पडायचे असेल तर ते सहज शक्य होत नाही. त्यासंदर्भातील ऑप्शन हा दाखवला जात नाही. कारण तो ऑप्शन डार्क बॉक्समध्ये लपवला जातो, जो ग्राहकांना दिसत नाही. (Dark Pattern)
खरंतर डार्क पॅटर्न हा बेकायदेशीर आहे. याचा वापर ग्राहकांना फसवण्यासाठी केला जातो. भारतापूर्वी युरोपिय देशांनी याच्या विरोधात कठोर पावले उचलली आहेत. भारतात ग्राहकांना जागृक करण्यासाठी सरकारने ९ प्रकारचे डार्क पॅटर्न शोधून काढले आहेत. याच्या वापरामुळे ग्राहकांना ऑफरच्या नावाखाली फसवले जाते. अशातच डार्क पॅटर्नला ई-कॉमर्स कंपन्यांनी हटवावे असे सरकारने सांगितले आहे. केंद्र सरकारने ऑनलाईन फसवणूकीवर आळा घालण्यासाठी अर्जेंसी, बास्केट स्नीकिंग, कंफर्म शेमिंग, फोर्स्ड अॅक्शन, नैगिंग, इंटरफेस इंटरफेरेंस, बेट एंड स्वीच, हिडेन कॉस्ट आणि डिस्गस्ड एड्स असे ९ प्रकारचे डार्क पॅटर्न शोधून काढले आहेत.
डार्क पॅटर्नमधील अर्जेंसी मध्ये बहुतांशवेळा खोट बोलले जाते. खरंतर तुम्हाला असे सांगितले जाते की,फार कमी सामान उपलब्ध आहे, स्टॉक लवकर संपला जाईल. बास्केट स्नीकिंगमध्ये ग्राहकांना न सांगताच त्यांचे एक्स्ट्रा प्रोडक्ट्स दिले जातात आणि मूळ बिलात ते जोडले जातात. कंम्फर्म शेमिंगमध्ये एखाद्या साइटवर गेल्यानंतर बाहेर कसे यायचे पटकन कळत नाही.
हेही वाचा- कोका कोलाच्या गोडव्यात घातक रसायन?
फोर्स्ड अॅक्सनमध्ये ग्राहकांना साइटवर तो पर्यंत एक्सेस दिला जात नाही जो पर्यंत ते एखादा प्रोडक्ट निवडत नाहीत. नॅनिंग अंतर्गत ग्राहकांना एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यास भाग पाडले जाते. तर बेट अॅन्ड स्वीचमध्ये जे प्रोडक्ट खरेदी केले आहे त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू विक्री केली जाते आणि कारणं दिली जातात की, स्टॉक संपल्याने हे प्रोडक्ट दिले गेलेयं. तर हिडेन कॉस्ट अंतर्गत आधीच सांगितलेल्या किंमती पेक्षा अधिक किंमत मिळवून फाइनल बिल दिले जाते.