उत्तरप्रदेश ही पर्यटनाची राजधानी होऊ पाहत आहे. उत्तराखंडचे नैसर्गिक सौदर्य आणि येथील प्रसिद्ध मंदिरे यामुळे दरवर्षी येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या पर्यटकांमध्ये उत्तराखंडच्या अल्मोडामधील नंदा देवीचे मंदिरही लोकप्रिय आहे. नंदा देवीला (Nanda Devi) स्थानिकांची देवी म्हणून पुजण्यात येते. दुष्टांचा नाश करणारी देवी म्हणून कुमाऊ समाजात या देवीची पुजा केली जाते. अल्मोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या या नंदा देवीच्या मंदिरात वर्षाचे बाराही महिने भक्तांची गर्दी असते.
स्थानिकांमध्ये देवी शैलपुत्रीचे मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. उत्तराखंडावर राज्य करणा-या चांद घराण्याची देवी असलेल्या या नंदादेवीचे मंदिर 350 वर्षाहूनही अधिक जुने असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक राजांनी देवीची सोन्याची मुर्ती घडवल्याचे सांगण्यात येते. नंदा देवीच्या या मंदिराची महती दूरवर आहे. अनेक भाविक देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला असा अनुभव सांगतात. ज्या भक्तांना दर्शन द्यायचे आहे, त्या भक्तांच्या स्वप्नात देवी जाते, आणि त्यांना मंदिरात येण्याचे आमंत्रण देते, अशी महती या नंदादेवी (Nanda Devi) मंदिराबाबत सांगितली जाते.
कुमाऊँच्या शांत परिसरात देवी दुर्गाचा अवतार मानल्या जाणा-या नंदा देवीचे मंदिर भक्तांनी अहोरात्र भरलेले असते. अल्मोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात स्थानिकांसह भारतभरातील भाविक देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी येतात. उत्तराखंडची रक्षणकर्ती असलेल्या नंदा देवी मंदिराचा पौराणिक इतिहास आहे. अल्मोडा येथील देवीचे मंदिर 350 वर्षांहून अधिक जुने आहे. माता नंदा देवी ही चांद घराण्यातील राजांची कुलदेवता आहे. स्थानिक कुमाऊनी समाजातर्फे देवी नंदादेवीची आपली कन्या म्हणून पुजा केली जाते.
या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे, नंदा देवी (Nanda Devi) 12 वर्षातून होणारी जत्रा. या नंदादेवीच्या जत्रेसाठी भारतासह, परदेशात गेलेले उत्तराखंडवासीही देवीच्या दरबारात हजेरी लावतात. या उत्सवात देवीला विविध रुपात सजवली जाते. अनेक दागिने देवीच्या अंगावर घातले जातात. देवीला त्रिशूल शिखरावर असलेल्या तिच्या दुसऱ्या घरी पाठवणी केली जाते. यावेळी भव्य मिरवणूक निघते. तसेच लोकगीते आणि नृत्यांचा कार्यक्रम होतो. दर बारा वर्षांनी होणारी ही यात्रा आता पर्यटकांनाही आकर्षून घेऊ लागली आहे. या यात्रेदरम्यान या भागात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यांच्यासाठीही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ठेवण्यात येतात.
मुळात हे नंदादेवी मंदिर (Nanda Devi) किती जुने आहे, याबाबत वाद आहेत. काही स्थानिकांच्या मते हे मंदिर 1000 वर्षाहून अधिक जुने असल्याचे सांगितले जाते. नंदादेवी मंदिर ज्या शिवमंदिराच्या प्रांगणात आहे, ते मंदिरही हजार वर्षाहून अधिक जुने आहे. त्यामुळे नंदादेवी मंदिरही तेवढेच जुने असल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यासाठी या मंदिराच्या वास्तुशास्त्राचा दाखला देण्यात येतो. हे मंदिर दगड लॉक पद्धतीनं उभारण्यात आलेले होते. कालंतरानं या मंदिरात बदल करण्यात आले. या मंदिराचे छत हे संपूर्णपणे लाकडे आहे. मंदिराच्या छताची रचना अतिशय आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतींवरही शिल्प कोरलेली आहेत. भिंतींवरील दगडी कोरीव बघण्यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येनं या मंदिरात जातात.
=============
हे देखील वाचा : व्यंकटेश्वरच्या दर्शनाने होतात सर्व मनोकामना पूर्ण…
=============
मंदिरातील देवी नंदादेवीच्या (Nanda Devi) मुर्तीबाबतही अनेक आख्यायिका आहेत. ही मुर्ती चांद वंशीय राजाने बधनगड किल्ल्यावरून आणल्याचे सांगितले जाते. 1670 मध्ये कुमाऊँचे चांद घराण्याचे शासक राजा बाज बहादूर चांद यांनी नंदा देवीची मुर्ती आणली होती. ही मुर्ती सोन्याची होती. त्यांनी या मुर्तीची स्थापना त्यांच्या मल्ल महाल परिसरात केली. तसेच देवीची कुलदैवत म्हणून पूजा करण्यास सुरुवात केली. नंतर येथेच चांदराजांनी देवीचे भव्य मंदिर बांधले. राजसत्ता गेली तरी या मंदिराला मात्र धक्का लागून दिला नाही. आत्ताही या मंदिरात राजवंशीयांनी जी पुजची परंपरा आखून दिली होती, त्याच पद्धतीनं पुजा आणि आरती केली जाते. मंदिरातील सोन्याची मुर्ती वगळता देवीचे दोन मुखवटे पुजेस ठेवण्यात आले आहेत.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, नंदा देवी भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांना मंदिरात येण्याचे आमंत्रण देते. असे अनेक भाविक मंदिरात जातात आणि आपला अनुभव लिहून ठेवतात.
सई बने