Home » क्रेडिट कार्डसाठीचे हे Hidden Charges माहितेयत का?

क्रेडिट कार्डसाठीचे हे Hidden Charges माहितेयत का?

by Team Gajawaja
0 comment
Credit Card Hidden Charges
Share

सध्या क्रेडिट कार्डचा वापर अधिक केला जात आहे. मार्केटमध्ये आता विविध बँकांचे क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन दिले जातात. काही वेळेस लोकांना एखाद्या बँकेकडून त्यांचे क्रेडिट कार्ड घेण्यास विचारले जाते आणि त्यांना फुकटात ते दिले ही जाते. यावरच विश्वास ठेवत काही लोक कोणताही विचार न करता क्रेडिट कार्ड खरेदी करतात. परंतु तुम्हाला माहितेय का, क्रेडिट कार्ड कधीच फुकटात मिळत नाही. त्यावर काही प्रकारचे शुल्क लावले जातात. याच हिडन शुल्कांबद्दल बँक अथवा एजेंट आपल्याला कधीच सांगत नाहीत. अशातच तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे जरुर वाचा. त्यानंतरच ते खरेदी करण्याचा विचार करा. (Credit Card Hidden Charges)

-जॉइनिंग फी आणि अॅन्युअल चार्ज
क्रेडिट कार्डची सुविधा तुम्हाला सर्वच बँका देतात. परंतु तुम्हाला त्यासाठी जॉइनिंग फी आणि अॅन्युअल चार्ज द्यावा लागतो. खरंतर जॉइनिंग फी तुम्हाला एकदाच द्यावी लागते. पण अॅन्युअल चार्ज हा वर्षातून एकदा द्यावा लागतो. बँकांनुसार अॅन्युअल चार्ज हा वेगवेगळा असतो. काही बँका हा शुल्क घेत नाहीत.

-वेळेत बिलाचे पेमेंट न केल्यास आकारला जातो दंड
जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर बिल वेळीच चुकते केले नाही तर बँकेकडून तुम्हाला पेनेल्टी लावली जाते. त्याचसोबत तुमच्या एकूण रक्कमेवर मोठे व्याज ही द्यावे लागते. क्रेडिट कार्डवच्या एकूण रक्कमेवर लावण्यात आलेला शुल्क हा अधिक असतो. याचे दर काही वेळेस ४०-४२ टक्क्यांपर्यंत असतात. तसेच बिलाच्या पेमेंटची ड्यु डेट पूर्वी काही रक्कमेचे बिल पेमेंट करुन तुम्ही पेनल्टी पासून बचाव करु शकता.

-पेट्रोल पंपावर वापरल्यास अतिरिक्त चार्ज
बहुतांश लोकांना हे माहिती नसते की, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेट्रोल अथवा डिझेल भरल्यास सर्व बँका अतिरिक्त चार्ज वसूल करतात. काही बँका या चार्जला रिफंड किंवा कॅशबॅकच्या रुपात परत देतात. परंतु तुम्ही नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा की, रिफंड हा मर्यादित असते. (Credit Card Hidden Charges)

-पैसे काढल्यास तर शुल्क भरावा लागतो
क्रेडिट कार्ड केवळ ऑनलाईन आणि ऑफलाइन शॉपिंगसाठीच असते. परंतु गरज भासल्यास तुम्ही त्याच्या माध्यमातून एटीमने पैसे काढल्यास तर तुम्हाला शुल्क भरावा लागतो. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँका किंवा एजेंट याबद्दल तु्म्हाला सांगत नाही.

हेही वाचा- ChatGPT चा वापर करणे खरंच सुरक्षित आहे का?

-ओवरसीज ट्रांजेक्शनवर चार्ज
जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे काय आहेत हे सांगितले जाते. तसेच असा ही दावा केला जातो की, या कार्डच्या माध्यमातून तु्म्ही परदेशात ही ट्रांजेक्शन करु शकता. पण तेव्हा असे सांगितले जात नाही की, यासाठी सुद्धा तुम्हाला चार्ज द्यावा लागतो. खरंतर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून परदेशात ट्रांजेक्शन केल्यास तुम्हाला ओवरसीज ट्रांजेक्शन चार्ज द्यावा लागतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.