भारतातील गावांमध्ये आजही गायीच्या शेणाच्या (Cow Dung) शेण्या या चुलीमध्ये वापरल्या जातात. या शेण्यांवर जेवण होतं. जिथे होम, हवन, यज्ञ होतात, तिथे गायीच्या शेणापासून तयार झालेल्या शेण्यांना मोठी मागणी आहे. भारतीमध्ये अगदी काही रुपयांना मिळणा-या या गायीच्या शेण्यांना परदेशात मोठी मागणी आहे, हे ऐकलं तर आश्चर्य वाटले. परदेशात शेण्यांना मोठा मागणी आहे, असे नाही तर या शेण्यांना सोन्याचा दर मिळत आहे. गायीच्या शेणापासून झालेल्या शेण्यांचा उपयोग खतापासून ते अन्न बनवण्यापर्यंत केला जात आहे. अगदी आपले पंतप्रधान नुकतेच ज्या कुवेत दौ-याहून परतले आहेत, त्या कुवेत (Kuwait) आणि अरब (Arab) देशांपासून ते युरोपमधील देशांमध्ये भारतातील गायींच्या शेण्यांची मोठी मागणी आहे. अनेक देश भारताकडून मोठ्या दरात या शेण्यांची खरेदी करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची मोठी संधीही उपलब्ध झाली आहे. भारतात गायीच्या शेणापासून बनवलेल्या शेण्यांना कायम मागणी असते. ग्रामीण भागात या शेण्यांचा वापर स्वयंपाकघरात इंधन म्हणून करण्यात येतो. तसेच अनेक मंदिरांमध्ये होम-हवन करण्यासाठी गायीच्या शेण्यांना मोठी मागणी असते. मात्र यासोबत परदेशातूनही या गायीच्या शेण्यांची मागणी वाढली आहे. (Cow Dung)
कुवेतसह अरब देशांमध्ये या शेण्यांना अलिकडच्या काळात मोठी मागणी आहे. गेल्या दोन वर्षात ही मागणी प्रचंड वाढली असून शेण्यांना सोन्याचा भाव देण्यासाठी हे अरब देश तयार आहेत. यामागचे कारण म्हणजे गायीच्या शेणातील पोषक घटक. गायीच्या शेणात पोषक घटक असतात. हे शेण सुकवून त्यापासून शेण्या तयार करण्यात येतात. या शेण्यांची पावडकर करुन त्याचा वापर अबर देशांमध्ये खजूराच्या झाडांना टाकण्यात येत आहे. खजूर पिकामध्ये शेणाची भुकटी वापरल्याने खजूराच्या फळांचा आकार मोठा झाल्याचे येथील उत्पादकांच्या लक्षात आले आहे. शिवाय खजूराच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे खजुराचे उत्पादन वाढवण्यासाठी कुवेत आणि अरब देश भारतातून मोठ्या प्रमाणात या गायीच्या शेण्या मागवत आहेत. ही मागणी एवढी आहे की सांगेल त्या किंमतील शेण्या विकत घेण्यात येत आहेत. एकट्या कुवेतमधूनच भारताला 192 मेट्रिक टन शेण्यांची ऑर्डर मिळाली आहे. कुवेतची कंपनी लामोर ही भारतामधून मोठ्या प्रमाणात गायीचे शेण आणि शेण्याही खरेदी करत आहे. राजस्थानच्या जयपूरमधून मोठ्या प्रमाणात देशी गायीचे शेण कुवेतला पाठवले जात आहे. (Marathi News)
जयपूरमधील टोंक रोडवरील पिंजरापोल गोशाळेच्या सनराईज ऑरगॅनिक पार्कमध्ये कंटेनरमधून शेण पॅकिंग करुन कुवेतला पाठवले जाते. गायीच्या शेणाला अशीच मागणी अन्य अरब देशांमधूनही होत आहे. भारतातून 50 रुपये आणि त्याहून जास्त रुपये दरानं या शेण्यांना अरब देशात पाठवण्यात येत आहे. मागणी जास्त असल्यावर या शेण्यांच्या दरातही वाढ होत आहे. यासोबत मालदीव, अमेरिका, सिंगापूर, चीन, नेपाळ, ब्राझील या देशांमध्येही गायीच्या शेणापासून बनवलेल्या शेण्या मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत. शेण्यांच्या निर्यातीत भारत प्रथम क्रमांकावर असून व्हिएतनाम दुसऱ्या क्रमांकावर तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशातही या शेण्यांचा वापर खतासाठी अधिक करण्यात येत आहे. गायीच्या शेण्यांचा वापर अगदी घरगुती बागेसाठी सेंद्रिय खत म्हणून होत आहे. तसाच हा वापर धान्यपिकाच्या शेतीमध्येही मोठ्याप्रमाणात होत आहे. (Cow Dung)
=======
हे देखील वाचा : Shyam Benegal : प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन
Dinga Dinga : आता काय तर डिंगा डिंगा आला !
=======
गायीच्या शेणाचा आणि ते शेण सुकवून त्यापासून तयार झालेल्या शेण्यांचाही वापर खतासाठी भारतात होतो. उत्तम सेंद्रिय खत म्हणून त्याकडे बघितले जाते. मात्र आता गायीच्या शेणावर परदेशातही मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. त्यातील गुणवत्ता समजल्यावर येथील कृषीतज्ञांनी गायीच्या शेणाला सर्वोत्तम सेंद्रीय खत असा दर्जा दिला आहे. त्यामुळे गायीच्या शेणाची मागणी सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या शेणावरील संशोधनात असे आढळून आले की, शेणापासून उत्पादित केलेल्या उत्पादनांमुळे अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. शेतीमध्ये याचा वापर केल्यावर उत्पादनाचा दर्जा वाढतो, तसेच जमिनीमधील पोषक तत्वांमध्येही वाढ होते. उलट रासायनिक खतांचा वापर केल्यास त्या पिकांना जास्त पाण्याची गरज भासत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. या सर्वात गायीच्या शेणाला आणि ते शेण सुकवून तयार झालेल्या शेण्यांनाही सोन्याचा भाव आला आहे. (Marathi News)
सई बने