भारतातील कफ सिरप (Cough Syrup) बद्दल खुप चर्चा केली जात आहे. कारण गांबिया मध्ये ६६ मुलांचा यामुळे मृत्यू झाला आहे. खरंतर गांबियात ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे कनेक्शन कफ सिरप सोबत असल्याचे सांगितले जात आहे. खास गोष्ट अशी की, हे कफ सिरपभ भारताचे असल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल आता डब्लूएचओने अलर्ट जाहीर केला आङे. त्याचसोबत कफ सिरपचा तपास केला जाणार आहे. अशाच प्रश्न उपस्थितीत होतो की, अखेर कफ सिरपमध्ये असे काय होते ज्यामुळे ऐवढ्या मुलांचा मृत्यू झाला आहे. तर जाणून घेऊयात कफ सिरपमध्ये काय मिळाले आणि भारतीय कफ सिरप बद्दल काय माहिती समोर आली आहे त्याबद्दल अधिक.
काय आहे गांबिया प्रकरण?
डब्लूएचओने भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स कडून तयार करण्यात आलेल्या कफ आणि कोल्ड सिरप संदर्भात अलर्ट जाहीर केला आहे. खरंतर चार सिरपचे सॅम्पल तपासून पाहिले असता त्यात भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिडेट द्वारे तयार करण्यात येणाऱ्या कफ सिरपचा समावेश आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये गांबियामध्ये ६० मुलांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, मुलांनी कोणतेतरी कफ सिरप प्यायले होते आणि त्यामुळे त्यांच्या मूत्रपिंशी संबंधित समस्या येऊ लागली. त्यानंतर सरकार आता या मृत्यूमागील कारणांचा तपास करत आहे.
कफ सिरपमध्ये काय मिळाले होते?
डब्लूएचओ कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेडेन फार्मास्युटिकल्सच्या कफ आणि कोल्ड सिरपमध्ये प्रमाणापेक्षा अधिक डायथिलीन ग्लाइकॉल आणि एथिलीन ग्लाइकॉल आढळून आले. असे सांगितले जात आहे की, हेच सिरप गांबियातील मुलं प्यायली होती.
काय होतो या प्रोडक्टचा परिणाम?
डायथिलीन ग्लाइकोल एक प्रकारचे केमिकल आहे. जे काही औषधांसह अन्य प्रोडक्ट्समध्ये सुद्धा वापरले जाते. त्याचे योग्य प्रमाण नसेल तर ते विषासारखे काम करते. यामध्ये इम्युन सिस्टिम ते किडनीवर खुप परिणाम होतो. यामुळे पॉइंजिनिंगचा धोका वाढतो. याच्या सेवनामुळे पोटात दुखणे, उलटी होणे, मानसिकता बिघडणे अशा समस्या उद्भवू शकतात. याचा सर्वाधिक परिणाम किडनीवर होतो आणि काही वेळेस मृत्यू ही होऊ शकतो. (Cough Syrup)
एथलीन ग्लाइकोलचा समावेश विषारी पदार्थांमध्ये केला जातो. तो गाड्यांमध्ये एंटीफ्रीजच्या रुपात सुद्धा वापरला जातो. याचा सर्वाधिक वापर फ्रिजिंगसाठी केला जातो. मात्र अधिक प्रमाणात त्याचे सेवन केल्यास मृत्यू होऊ शकतो. हे एथिलीन ऑक्साइडमुळे प्राप्त होते जे एथिलीन पासून येते.
हे देखील वाचा- Tomato Fever आजार नक्की काय आहे? जाणून घ्या लक्षणांसह अधिक
पहिल्यांदाच चर्चेत नाहीय कफ सिरप
गेल्या वर्षात दिल्लीत खोकल्याच्या कारणास्तव सिपर प्यायल्यानंतर १६ मुलांची प्रकृती बिघडली होती. तपासात असे समोर आले होते की, डिस्ट्रोमेथोर्फन कफ सिरपचे परिणाम झाल्याने मुलांचा मृत्यू झाला होता. याआधी जम्मू-कश्मीर मधील उधमपूर मध्ये सुद्धा एक सिरप प्यायल्याने ९ मुलांचा मृत्यू झाला होता. रिपोर्टमध्ये समोर आले की, सिरपमध्ये असलेले विषारी कपाउंड Diethylene Glycol च्या कारणास्तव मुलांचा मृत्यू झाला होता.