भारत स्वतंत्र झाला, राज्यघटना लागू झाली आणि भारतातील राजेशाही संपुष्टात आली. मात्र जनतेच्या मनात या राजाबाबतची आदराची भावना काही कमी झाली नाही. स्थानिक जनतेनं या राजघराण्याला मनापासून राजेपद दिलं आणि त्या राजांनीही जनतेला कायम आधार दिला आहे. आज भारतात अशी अनेक राजघराणी आहेत, ज्यांच्याबद्दल तेथील स्थानिकांच्या मनात नितांत श्रद्धा आहे. त्यापैकीच एक राजघराणं म्हणजे, हिमाचल प्रदेश मधील कटोच राजघराणे. महाभारत काळापूर्वीपासून या राजघराण्याचा इतिहास सांगितला जातो. या कटोच राजघराण्यात नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली आहे. तब्बल 400 वर्षाच्या अंतरान या कटोच राजघराण्यात पुन्हा एकदा राज्याभिषेक (Coronation) करण्यात आला. कटोच राजघराण्याची कुलदेवी अंबामातेच्या साक्षीनं हा राज्याभिषेक झाला. या सोहळ्याला देशातील अनेक मान्यवर राजघराण्यातील मंडळी उपस्थितीत होत्याच शिवाय, परदेशी पाहुणेही मोठ्या संख्यंने आले होते. हिमाचलच्या ऐतिहासिक कांगडा किल्ल्यात 400 वर्षांनंतर झालेल्या कटोच घराण्याचा हा सोहळा त्यामुळे बराच चर्चेत राहिला आहे.
या राजघराण्याच्या प्रमुख शैलजा कुमारी कटोच यांना राणीची पदवी या समारंभात देण्यात आली. हा राज्याभिषेक (Coronation) महत्त्वाचा ठरला कारण कांगडा किल्ल्यावर शेवटचा राज्याभिषेक (Coronation) 1629 मध्ये झाला होता. त्यानंतर 400 वर्षानंतर हा कांगडा किल्ला राज्याभिषेकासाठी सजवण्यात आला.
कटोच राजघराण्याचा इतिहास हा चंद्रवंशी राजपूत कुळातील असल्याचे सांगण्यात येते. या राजघराण्याचे पारंपारिक निवासस्थान त्रिगर्टा साम्राज्यात होते. भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा किल्ल्यावर असलेल्या या राज्याचा महाभारतातही उल्लेख आहे. त्याकाळी कांगडा किल्ला नागरकोट किंवा कोट कांगडा म्हणूनही ओळखला जात असे. कोटमध्ये राजघराण्याचे वास्तव्य होते, त्यामुळे त्याला नंतर स्थानिक भाषेत कटोच म्हणण्यात येऊ लागले. आता राजा झालेले राजा ऐश्वर्या चंद कटोच हे कटोच वंशाचे 489 वे राजा आहेत. कांगडा किल्ल्यातील कुलदेवी माँ अंबिका मंदिरात त्यांचा राज्याभिषेक (Coronation) झाला. नवमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात देश-विदेशातील मान्यवर घराण्यांचा समावेश होता. कांगडा किल्ल्यात बांधलेले हे माँ अंबिकेचे मंदिर सर्वात प्राचीन मंदिरांप्रमाणे मानले जाते. त्या मंदिराचाही महाभारतात उल्लेख आहे. महाराजा ऐश्वर्या चंद कटोच यांच्या राज्याभिषेकाच्या (Coronation) निमित्ताने आता राजमहल लांबगाव येथे मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात राजे ऐश्वर्या चंद त्याच्या जनतेबरोबर संवाद साधणार आहेत. राणी चंद्रेश कुमारी या कटोच घराण्याची सून तसेच काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. कटोच राजवंश हा जगातील सर्वात जास्त काळ टिकलेल्या राजवंशांपैकी एक असल्याचे सांगण्यात येते. महाभारत काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत कटोच हे कांगड्याचे राज्यकर्ते होते. ब्रिटीश सत्तेनंतर या राजघराण्याची सत्ता संपुष्ठात आली.
========
हे देखील वाचा : वोग मॅगझिनवरील १०६ वर्षीय टॅटू आर्टिस्ट वैंग कोण आहे?
========
कांगडा किल्ला 463 एकरमध्ये पसरलेला आहे. त्रिगत राजाचा उल्लेख महाभारतात आढळतो. त्याने कांगडा किल्ल्यावर राज्य केले तो संपूर्ण पर्वताचा राजा मानला जात असे. 1615 मध्ये मुघल सम्राट अकबराने हा किल्ला जिंकण्यासाठी वेढा घातला, पण त्यात तो अयशस्वी ठरला. यानंतर 1620 च्या दरम्यान सम्राट जहांगीरने कांगडा किल्ला ताब्यात घेतला. यासोबत जहांगीरनं आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपली हुकूमत लागू गेली. मुघल सम्राट जहांगीरने सुरजमलच्या मदतीने आपल्या सैनिकांना या किल्ल्यात प्रवेश मिळवून दिला होता. 1751 ते 1774 या काळात राजा घमंड चंद यांनी मुघलांना दिलेला बहुतांश प्रदेश परत मिळवला. त्यानंतर 1775 ते 1823 या काळात राजा संसारचंद यांनी आजूबाजूच्या सर्व डोंगरी राज्यांवर कांगड्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्या कारकिर्दीत, कांगडा हे कलांचे प्रमुख केंद्र बनले आणि अनेक राजवाडे बांधले या भागात बांधले गेले. या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात राजा संसारचंद यांचे नाव प्रमुख आहे. त्यानंतर आलेल्या राजा संसारचंद द्वितीय यांच्या मृत्यूनंतर, महाराजा रणजित सिंह यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. रणजितसिंगने कांगडा खोऱ्यातील सर्वात सुपीक भाग देखील ताब्यात घेतला. कांगरामधील कटोच तसेच त्याच्या शेजारी असलेल्या छोट्या – छोट्या राजांवरही त्यानं आपला अंकुश ठेवला. 1846 च्या पहिल्या अँग्लो-शीख युद्धानंतर हा सर्व संपन्न भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. मात्र ब्रिटीशांनी या भागावर वर्चस्व ठेऊनही राजघराण्याप्रती असलेली जनतेची भावना काही कमी झाली नाही. आता 400 वर्षानंतर राजा ऐश्वर्या चंद यांचा झालेला राज्याभिषेकही म्हणूनच खास ठरला आहे.