Chandrayaan-3: २३ ऑगस्टला इस्रोचे मिशन चांद्रयान-३ च्या माध्यमातून आपण चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलो. इस्रोच्या या मिशनकडे भारतासह जगभरातील वैज्ञानिकांसह सामान्य लोकांचे लक्ष लागून होते. अखेर लॉन्चिंग यशस्वीपणे झाल्याने भारताने इतिहास रचला. या कामगिरीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात चांद्रयान-३ आणि चंद्रासंदर्भातील चर्चा जोरदार रंगत होत्या. आपण आज चंद्राबद्दलच्या काही न ऐकलेल्या गोष्टी पाहणार आहोत.
चंद्र हा गोलाकार नाही
पौर्णिमेच्या दिवशी जरी चंद्र आपल्याला पूर्णपणे गोलाकार दिसत असला तरीही तो एका उपग्रहाच्या रुपात गोलाकार नाही. तो खरंतर अंडाकार आहे. जेव्हा तुम्ही चंद्राकडे पाहता तेव्हा त्याचा थोडासाच भाग आपल्याला दररोज पहायला मिळतो. त्याचसोबत चंद्राचे वजन देखील त्याच्या भौमितिक केंद्रात नाही. तो आपल्या भौमितिक केंद्रापासून १.२ मैल दूर आहे.
कधीच पूर्ण दिसत नाही चंद्र
जर तुम्ही दररोज चंद्र पाहत असाल तर त्याचा अधिकाधिक ५९ टक्के हिस्साच दिसतो. चंद्राचा ४१ टक्के हिस्सा हा धरतीवरुन दिसतो. जर तुम्ही आंतराळात गेलात आणि ४१ टक्के क्षेत्रात उभे राहिलात तर तुम्हाला धरती दिसणार नाही.
ज्वालामुखीच्या स्फोटाचा ‘ब्लू मून’ सोबतचा संबंध
असे मानले जाते की, चंद्रासंदर्भातील ब्लू मून शब्द १८८३ मध्ये इंडोनेशियन द्वीप क्राकातोआ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटावेळी वापरला गेला. याला पृथ्वीच्या इतिहासातील सर्वाधिख भीषण ज्वालामुखी विस्फोट मानले जाते. काही बातम्यांच्या मते, याच्या उद्रेकाचे आवाज हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील शहर पर्थ, मॉरीशस पर्यंत ऐकायला गेले होते. या उद्रेकानंतर वातावरणात ऐवढी राख पसरली गेली होती की, रातोरात चंद्र निळ्या रंगाचा दिसून आला होता. त्यानंतरच या टर्मचा वापर करण्यास सुरुवात झाली.
चंद्रावर सीक्रेट प्रोजेक्ट
एक काळ असा आला होता की, जेव्हा अमेरिका चंद्रावर परमाणू हत्यांरांच्या वापरावर गांभीर्याने विचार करत गोता. यामागील उद्देश असा होता की, सोवित संघाला अमेरिकन सैन्याच्या शक्तीप्रदर्शन दाखवयाचे होते. जेणेकरुन त्यांना दबावाखाली आणले जाईळ. या गुप्त योजनेचे नाव ‘ए स्टडी ऑफ लूनर रिसर्च फ्लाइट्स’ आणि प्रोजेक्ट ‘ए११९’असे होते. (Chandrayaan-3
पृथ्वीचा वेग कमी करतोय चंद्र
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्याला पेरिग्री असे म्हटले जाते. या दरम्यान भरतीची पातळी सामान्यपेक्षा अधिक वाढली जाते. या दरम्यान चंद्र हा पृथ्वीची फिरण्याची शक्ती कमी करतो. याच कारणास्तव पृथ्वी प्रत्येक एका शतकात १.५ मिलीसेकंद धीमी होत चालली आहे.
हेही वाचा- Chandrayaan-3: थेट चंद्रावर ‘या’ कारणास्तव जात नाही अंतराळयान
चंद्राचा रहस्यमयी दक्षिण ध्रुव
चंद्राचा दक्षिण ध्रुवीय क्षेत्र अधिक रहस्यमयी मानला जातो. नासाच्या मते, या क्षेत्रात असे काही खोल खड्डे आहे आणि पर्वत आहेत ज्याच्या सावलीच्या जमीनीवर अरबो वर्षांपासून सुर्यप्रकाश पोहचलेला नाही.