चीनमध्ये कोरोनाचा धोका किती वाढला आहे याचा अंदाज चीनच्या सिचुआन प्रांतातील कोरोना (Coronavirus) बाधितांच्या आकडेवारीवरुन येत आहे. या भागात सुमारे सात कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या एका भागातच एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली असेल तर एकूण चीनमध्ये कोरोनाची (Coronavirus)आकडेवारी नक्की किती असेल याचा अंदाज आपण करु शकतो. मात्र चीननं आपल्याकडील कोरोनाबाधितांची आकडेवारी गुप्त ठेवली आहे. कोरोनाबाधितांचा खरा आकडा द्यावा असा आग्रह जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे, मात्र चीननं त्याकडे दुर्लक्ष करीत ज्या देशांनी चीनच्या नागरिकांना बंदी घातली आहे, त्यानाच उलट दम दिला आहे. चीनमधील नागरिकांवर जगातील अनेक देशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातली आहे. तसेच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला पाहिजे अशी अट ठेवली आहे. चीनच्या सरकारनं या सर्वांवर आक्षेप घेत, या देशांवर टीका केली आहे. दुसरीकडे चीनमध्येच काय पण अमेरिकेतही कोरोना XBB.1.5 चा नवीन उप-प्रकार सापडला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हायरस आधीच्या व्हेरियंटपेक्षा 104 पट जास्त आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा चीन हा अवघ्या जगासाठी डोकेदुखी ठरला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा (Coronavirus) फैलाव सर्वत्र झाला आहे. त्याबाबत चीन खरा आकडा देत नसले तरी एका सर्वेक्षणाचा अहवाल सार्वत्रिक झाला आहे. त्यात सिचुआन प्रांतात सुमारे सात कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाने किती कहर केला आहे, हे यावरुन स्पष्ट होते. हा अहवाल चुकीचा असल्याचा आता दावा होत आहे. चीनने जगाला कोरोनाची आकडेवारी देणे बंद केले आहे. चीनमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्राझीलमध्येही कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जपानमध्ये गेल्या 7 दिवसांत 2188 लोकांचा मृत्यू झाला आहे. जपाननंतर दक्षिण कोरियातही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. द. कोरियामध्ये 457,745 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 429 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अमेरिकेतही कोरोनामुळे गेल्या 7 दिवसात 1239 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेची डोकेदुखी आणखी वाढली आहे, कारण त्यांच्याकडे कोरोनाचा नवा व्हेरिअंटही आढळला आहे. अमेरिकेत सापडलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) नवीन प्रकाराला XBB.1.5 असे नाव देण्यात आले आहे. हा व्हेरिअंट अत्यंत घातक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा प्रकार इतका धोकादायक आहे की लसीकरण आणि नैसर्गिकरित्या बनवलेल्या अँटीबॉडीजलाही मारक ठरु शकतो आणि त्यातूतन शरीरात संसर्ग पसरवतो. इतकेच नाही तर हा संसर्ग आपल्या शरीरात आतापर्यंतच्या सर्व प्रकारांपेक्षा 104 पट वेगाने पसरतो. त्यामुळेच अमेरिकेतील आरोग्य संस्था धास्तावल्या आहेत.
या सर्व विषाणूंचा संसर्ग पहाता आता जगभरात चीनमधील नागरिकांवर निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यावरही चीननं नाराजी व्यक्त केली आहे. जगातील कोणत्याही देशांनी चीनी नागरिकांवर बंदी घातली तर चीनमध्येही त्या देशातील नागरिकांवर बंदी घालण्यात येईल असा इशाराच चीननं दिला आहे. भारत आणि ब्रिटननेही चिनी नागरिकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्टसह येण्याची सूचना केली आहे. चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतातील कोणत्याही विमानतळावर येणार्या प्रवाशांसाठी निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. कॅनडाने चीनमधून जाणाऱ्या प्रवाशांना 48 तासांच्या आत कोविडचा निगेटिव्ह अहवाल आणण्यास सांगितले आहे. युरोपियन युनियननेही चीनच्या नागरिकांवर काही अटी आणि नियम लादले आहेत.
=====
हे देखील वाचा : Zomato चे को-फाउंडर गुंजर पाटीदार यांचा राजीनामा
=====
चीनमध्ये अत्यंत वेगानं पसरलेला कोरोना आता पुन्हा जगामध्ये हातपाय पसरु पाहत आहे. एकीकडे चीनची भयानक परिस्थिती समोर येत आहे. तिथे मृतदेह ठेवण्यासाठीही जागा नसल्याची बातमी आहे. आता नव्या व्हेरिअंटमुळे कोरोनाची भीती अधिक गडद झाली आहे. जगातील बहुतेक लसी कोरोनाच्या पहिल्या प्रकारातील अल्फा विषाणूपासून वाचवण्यासाठी बनवण्यात आल्या होत्या. परंतु तेव्हापासून कोरोना विषाणूने अनेक वेळा त्याचे स्वरूप बदलले आहे. अशा बदलत्या स्वरुपातील कोरोनाच्या (Coronavirus) विषाणूंना सामोरे जाण्यासाठी शरीरातील प्रतिकार शक्ती हाच एकमेव उपाय सांगण्यात येतो. कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही. त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे. प्रत्येक नवीन प्रकारासह नवीन लस किंवा बूस्टर डोस हा उपाय नाही हे जाणले पाहिजे हेच खरे. त्यामुळेच प्रत्येकानं काळजी घेणे, गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर करणे, हाच सोपा उपाय असल्याचे सध्यातरी सांगण्यात येते.
सई बने