इजिप्तची राणी क्लियोपेट्रा तिच्या काळात सर्वाधिक सुदंर महिला असल्याचे म्हटले होते. इजिप्शियन संस्कृतीमध्ये अखेर सर्वाधिक चर्चेत राहिलेली राणी क्लियोपेट्रा हिला २ हजार वर्षांपूर्वी तिचा प्रियकर मार्क एंटनी हिच्यासोबत तिच्या मकबरात दफन करण्यात आले होते. त्या दरम्यानच्या लेखकांनी संपूर्ण घटना लिहिली. असे लिहिले की, क्लियोपेट्रा हिचा मकबरा इजिप्तच्या देवी मंदिराच्या जवळच होता. क्लियोपेट्रा हिचा मकबरा अशा कारणासाठी चर्चेचा विषय ठरला आहे कारण त्यामध्ये सोन, चांदी, मोती, हस्तीदंत आणि अमूल्य रत्न असल्याचे लिहिले गेलेय.(Ceopatra tomb and treasure)
दीर्घकाळ बहुतांश लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने तो शोधून काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. २०२१० मध्ये इजिप्शियन संस्कृती पूर्व पुरावशेष मंत्री जाही हवास यांनी याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु केले.
अशा ठिकाणी खोदकाम केले जेथे ऐतिहासिक कब्री होत्या
लाइव सायन्स यांच्या रिपोर्ट्सनुसार, बहुतांश ऐतिहासिक प्रमाण पाहिले आणि समजून घेतल्यानंतर त्यांनी अलेक्जेंड्रियाच्या जवळ एका साइटवर खोदकाम केले, ज्याला आतापर्यंत मपोसिरिस मॅग्ना असे म्हटले जाते. येथे त्या युगातील काही कब्री आहेत जेव्हा क्लियोपेट्रा चतुर्थने इजिप्शियनवर शासन केले होते. खोदकामादरम्यान तेथे त्या काळातील अशा काही गोष्टी मिळाल्या ज्या हैराण करणाऱ्या होत्या. परंतु क्लियोपेट्रा हिचा मकबरा मिळाला नाही. तेथे दोन ममी मिळाल्या. असे म्हटले गेले की, २ हजार वर्षांपूर्वी क्लियोपेट्रा हिला येथेच दफन करण्यात आले होते.
भव्य मकबरा जमिनीत कसा गेला?
असे म्हटले जाते की, इजिप्शियशनच्या काळात 365AD मध्ये एक जोरदार भुकंपाच्या कारणास्तव क्लियापेट्राचा मकबरा जमिनदोस्त झाला. यावर संशोधक कॅथलीन मार्टिनेज यांचे असे म्हणणे होते की, एलेक्जेंड्रिया शहरापासून ४८ किमी अंतर दूरवर असे काही पुरावे मिळाले ज्यामुळे पुष्टी होते की, किलयोपेट्राचा मकबरा होता.
इतिहासात इजिप्शियन ज्या आइसिस देवीचा उल्लेख केला आहे तेथे सुद्धा खोदकाम झाले. कॅथलीन अशा म्हणतात की, मंदिराजवळ झालेल्या खोदकामात २०० शाही नाणी मिळाली. त्या नाण्यांवर क्लियोपेट्राचा चेहरा बनवण्यात आला होता.
खरंच खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणी क्लियोपेट्राशी काही संबंध होता का? यावर संशोधक डॉ. ग्लेन गॉडेन्हो यांच्या मते नाणी असे पुरावे आहत जे इतिहासातील काही रहस्यमय माहिती देते. खोदकामादरम्यान मिळालेल्या नाण्यांमधून असे कळते की, त्या काळात क्लियोपेट्रा हिचे शासन होते. मंदिरात देवी आइसिसची पूजा केली जात असावी. दरम्यान, क्लिपयोपेट्रा आइसिस देवीशी किती भावनिक होती हे स्पष्ट होणे बाकी आहे. नाण्यांच्या एका बाजूला क्लियोपेट्राचा चेहरा आहे तर दुसऱ्या बाजूला ग्रीक भाषेत क्लियोपेट्राचे नाव कोरलेले होते.(Ceopatra tomb and treasure)
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून दिले जाते नॉन-वेज
अशा गोष्टी ज्या रहस्यात्मकच राहिल्या
खोदकामादरम्यान क्लियोपेट्राच्या शासनाची पुष्टी झाली पण नियमानुसार तिच्यावर अंतिम संस्कार झाले की नाहीत याची सुद्धा स्पष्टपणे माहिती समोर आली नाही. या व्यतिरिक्त इतिहासातील कागदपत्रांमध्ये मकबरातील खजिन्या बद्दल काही सांगण्यात आले पण त्याची सुद्धा पुष्टी झालेली नाही. खोदकामात मंदिराजवळ मिळालेल्या नाण्यांच्या आधारावर असे म्हटले गेले की, त्या काळात महाराणीच्या नावाची नाणी पुजाऱ्याला दिली जायची किंवा देवीला अर्पण केली जात असल्याची परंपरा होती.