Home » CBI चे नवे चीफ प्रवीण सूद नक्की कोण?

CBI चे नवे चीफ प्रवीण सूद नक्की कोण?

by Team Gajawaja
0 comment
Praveen Sood
Share

कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी निवडणूका होणार आहे. त्याचसोबत नवे सरकार ही स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे सध्याचे डीजीपी प्रवीण सूद यांना दोन वर्षांसाठी सीबीआयचे नवे चीफ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रवीण सूद सध्याचे सीबीआय चीफ सुबोध जायसवाल यांच्या जागी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचा कार्यकाळ हा २५ मे रोजी समाप्त होणार आहे. (CBI New Chief)

प्रवीण सूद यांच्या नावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड सिंह आणि विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्या हाय लेवल कमेटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु अधीर रंजन चौधरी यांनी प्रवीण चौधरी यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे.

कोण आहेत आयपीएस प्रवीण सूद?
प्रवीण सूद सध्या कर्नाटक पोलीसांच्या डीजीपी पदावर कार्यरत आहेत. आयआयटी दिल्लीतून ते पदवीधर झाले आहेत. १९८६
मध्ये भारतीय पोलीस सेवा (IPS) मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर १९८९ मध्ये मैसूर मध्ये सहायय्क पोलीस अधिकक्षकाच्या रुपात आपल्या करियरची सुरुवात केली होती. तसेच बंगळुरुत त्यांनी पोलीस उपायुक्तचा पदभार सांभाळण्यापूर्वी ते पोलीस अधिक्षक, बेल्लारी आणि रायचूर मध्ये कार्यरत होते.

प्रवीण सूद २००४ ते २००७ पर्यंत मैसूर शहाराच्या पोलीस आयुक्त पदावर होते. आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क के च्या विरोधात ऑपरेशन पार पाडले होते. २०११ मध्ये त्यांनी बंगळुरुत ट्राफिक पोलीसांच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम ही केले.

प्रवीण सूद यांना 1996 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्ण पदक, 2002 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक आणि 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले. गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि टर्नओवर वाढवण्यात त्यांचे महत्वाचे योगदान राहिले होते. (CBI New Chief)

हेही वाचा- लादेनला ठार करण्यासाठी ओबामांनी असा बनवला होता सिक्रेट प्लॅन

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी डीजीपी प्रवीण सूद यांना नालायक असे म्हटले होते. त्यांचापक्ष सत्तेत आल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करावी असे ही म्हटले होते. डीके शिवकुमार यांनी प्रवीणसूद यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप लावला होता. त्यांनी असे म्हटले होते की, सूद यांच्या शासनकाळादरम्यान काँग्रेस नेत्यांच्या विरोधात २५ प्रकरणे दाखल केली गेली.पण भाजपच्या विरोधात एक ही प्रकरण दाखल करण्यात आलेले नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.