कंबोडियाचा राजा नोरोडोम सिहामोनी हे तीन दिवस भारतीय दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा अत्यंत खास मानला जात आहे. खरंतर दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांना ७० वर्ष पूर्ण झाली आहेत. यापूर्वी कंबोडियातील राजाच्या वडिलांनी ६० वर्षांपूर्वी १९६३ मध्ये भारतात दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात कंबोडियाच्या राजाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही खास मंडळींची भेट घेतली.(Cambodia Indian Temple History)
कंबोडियासह भारताचे राजकीय नाते ७० वर्ष जुने असले तीरीही यांच्यामधील नाते फार प्राचीन आहे. साहित्यिक आणि पुरातत्व तथ्यांच्या आधारावरुन असे कळते की, या दोन्ही देशांमध्ये संबंध ईसवी सनापूर्वीच होता. कंबोडियात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यामध्ये भारतीय देवी-देवतांच्या मुर्ती पहायला मिळतात. येथील शिलालेखांवर ही देवदेवतांबद्दल लिहिले आहे.
खरंतर भारत आणि कंबोडियामधील संबंधांचे मूळ ही भारतातून निघालेल्या हिंदू आणि बौद्ध धर्माच्या सांस्कृति प्रभावामुळे आहे. भारत जगातील पहिला लोकशाही देश होता ज्याने कंबोडियातील नव्या सरकारला मान्यता दिली होती. वर्श ९८१ मध्ये भारताने येथे आपले राजकीय पुन्हा सुरु केले होते. कंबोडियात भारताच्या याच योगदानाचे नेहमीच कौतुक करतो.
पांचजन्यमध्ये छापण्यात आळेल्या एका रिपोर्ट्सनुसार कंबोडियात स्टन क्रॅम्प पासून जे १००३ ईसवी सनातील शिलालेख मिळाले आहेत. त्याच्या के-६९३ वर सुर्य आणि चंद्राचे चिन्ह कोरले आहेत. भारतात शक् संवत् १००३ चे अंनतदेवच्या विहार दगडासारखे काही शिलालेखांवर सुर्य आणि चंद्राची चिन्ह आहेत. कंबोडियातील पुरातत्ववरुन कळते की, ते भारतीय विचार आणि सांस्कृतिचा त्यावर अधिक प्रभाव होता. येथे नवग्रह, नऊ देवी यांच्यासह सूर्याची सुद्धा पूजा केली जायची.
तसेच कंबोडियातील काही शिलालेखांवर महिना, दिवस आणि नक्षत्रांचा सुद्धा उल्लेख केला गेला आहे. यापैकी एक के-८४२ हा ऐवढा दु्र्मिळ आहे की, कारण त्यावर नवग्रहांची स्थिती दर्शवली आहे. भारतीय समाजात आधीपासूनच सुर्याला काही नावांनी ओळखळे जायचे. कबोडियातील ७व्या ते १२ व्या शतकातील अभिलेशात सुद्धा सुर्या संबंधित काही नाव मिळतात. यावरुन कळते की, तेथे सुद्धा सुर्याला फार महत्व दिले जायचे.(Cambodia Indian Temple History)
कंबोडियात काही प्राचीन मंदिर सुद्धा आहेत. यामध्ये अंकोरवाट सर्वाधिक प्रमुख आहे. अंकोरवाट मंदिराच्या परिसरातच ४५ पेक्षा अधिक विविध मंदिर आहेत. ऐवढेच नव्हे तर मंदिरांच्या विशाल भिंतींवर रामायण आणि महाभारतासंबंधित काही प्रसंग लिहिले गेले आहेत. हे मंदिर भारत आणि कंबोडियात मधील सांस्कृतिक वारसा दर्शवतात. तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानेच अंकोरवाट मंदिराची निर्मिती केली आहे. हे जगातील सर्वाधिक मोठे धार्मिक स्थळ असल्याचे मानले जाते.
हेही वाचा- धनुष्यबाणाच्या आकाराचे राममंदिर
असे म्हटले जाते की, खमेर साम्राज्यात याची निर्मिती झाली होती. कंबोडियात अंकोरवाट व्यतिरिक्त ता प्रोहम मंदिर सुद्धा मुख्य हिंदू मंदिर आहे. एसएसआयकडूनच याचे जीर्णोद्वार केले जात असून २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कंबोडियातील अन्य जी प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यामध्ये बंटेय श्रेई, वाट एक नोम, प्रसात बनन मंदिर आण अंकोर थोम आहे.