चीनमधील हाय-स्पीड रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वात लांब आणि सर्वाधिक वापरले जाणारे नेटवर्क आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये ४५००० किलोमीटर अंतरावर स्पीडरेल्वे आहे. या नेटवर्कमध्ये २००–३८० किमी/तास च्या गतीसह धावणा-या रेल्वे मार्गांचा समावेश आहे. जगातील एकूण हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कपैकी दोन तृतीयांश स्पीड रेल्वे चीनमध्ये आहेत. (China Bullet Train)
चायना रेल्वे हाय-स्पीड ब्रँड अंतर्गत चायना रेल्वे कॉर्पोरेशनच्या मालकीच्या चालवण्यात येणा-या स्पीड ट्रेनची मर्यादा वर्षानुवर्षे वाढवण्यात येत आहे. जगात सर्वाधिक वेगवान रेल्वे गाड्या चालवण्याचा ताज आपल्याच देशाकडे असावा, असा आग्रह चीनचा आहे.
मात्र चीनचा हा अट्टहास आता चीनच्या विनाशाचं एक कारण ठरणार आहे. कारण स्पीड रेल्वेच्या अट्टहासापोटी चीन सरकारनं काढलेलं कर्ज एवढं मोठं झालं आहे की, चीनला काही रेल्वे स्टेशन बंद करावे लागले आहेत. बुलेट ट्रेनच्या स्पिडपुढे हा कर्जाचा डोंगर अधिक वर चढला आहे. त्यामुळे चिनला त्याच्या अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्पांना थांबवावे लागले आहे. (China Bullet Train)
विकास आणि आधुनिकता या दोन शब्दांच्या मागे धावता धावता चीन स्वतः कर्जाच्या मोठ्या डोंगराखाली दबत चालला आहे. चीनमध्ये हाय स्पीड ट्रेनचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात आहे. चीनमध्येच जगातील सर्वाधिक वेगाची ट्रेन आहे. याशिवाय चीनच्या सर्वच ट्रेन या आता हायस्पिड करण्यावर भर देत आहे. या हायस्पीड ट्रेनसाठी त्यांचे रेल्वेस्थानकही आधुनिक सोयी सुविधांनी युक्त बांधण्यात येत आहे.
त्यासाठी चीन सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र आता हिच कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेली स्टेशन्स रिकामी पडलेली दिसत आहेत. कारण ही रेल्वे स्टेशन जिथे बांधली आहेत, तिथे नागरी वस्ती अगदी विरळ आहे. त्या नागरिकांनाही रेल्वेवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
वाहतुकीसाठी हे नागरिक अन्य साधनांचा वापर करतात. फक्त हाय स्पीड रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरवण्याच्या नादात चीनने अशी दूरवरची रेल्वेस्थानके बांधली आहेत. त्या भागात हाय स्पीड रेल्वे पोहचवली आहे. पण या रेल्वे स्थानकात क्वचिक एखादा व्यक्ती फिरकत आहे. प्रवाशांविना ही रेल्वे स्थानके मोकळी पडली आहेत.
चीनमध्ये अशी अनेक स्थानके आहेत जिथून एकही प्रवासी चढत नाही. अनेक प्रमुख स्थानके रिकामी असल्याची चित्र प्रसिद्ध होत आहेत. या रेल्वे स्थानकांसाठी खर्च झालेली करोडो रुपयांची रक्कम ही बुडीतात जमा झाल्यासारखी आहे. अशा स्थानकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
त्यामुळे चीनचे (China Bullet Train) आर्थिक नुकसान होत आहे. चायना बिझनेस जर्नलने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, चीनमधील किमान २६ हायस्पीड रेल्वे स्टेशन त्यांच्या दुर्गमतेमुळे, बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी चीनमधील अशाच एका रेल्वे स्थानकाचा आणि हाय स्पीड रेल्वेच्या मार्गाचा फोटो आला होता. त्या भागात दूर दरपर्यंत लोकवस्ती नाही. मग येथे प्रवाशी कुठून येतील असा प्रश्न विचारण्यात आला होता. अशीच रेल्वे स्थानके अन्य भागातही आहेत, जिथे कोणीच जात नाहीत. त्यामुळे अशी भव्यदिव्य, खर्चिक स्थानके बांधण्यापूर्वी कुठलाही पाहणी का केली नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
============
हे देखील वाचा : चला महाकुंभ मेळ्याची तयारी करु या..!
============
चीन सरकारने अनेक हायस्पीड रेल्वे मार्गांच्या निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. येथील हेनान डॅनझोउ हाय-स्पीड रेल्वे स्टेशन हे २०१० मध्ये US$5.61 दशलक्ष पेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आले होते. मात्र त्याचा आत्तापर्यंत एकदाही वापर करण्यात आला नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार फक्त ५० प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. त्याची क्षमाता ५ लाखांहून अधिक प्रवाशी क्षमतेची आहे. त्यामुळे हे सर्वच स्थानक प्रवाशांविना मोकळे वाटत आहे. या सर्व स्थानकांसाठी मोठे कर्ज घेण्यात आले आहे.(China Bullet Train)
नंतर प्रवाशी संख्या वाढल्यावर त्यांच्याकडून येणा-या तिकीटांमधून हे कर्ज फेडण्याचा सरकारचा निर्णय होता. मात्र आता रोजचे ५० प्रवासी येत असतील तर त्यांच्यांकडून येणा-या तिकीटांच्या पैशात करोडोंचे कर्ज कसे फेडणार हा प्रश्न विचारण्यात येत आहे. चीनने गेल्या 40 वर्षांत पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यात चीनच्या कर्जाचा डोंगर वाढला आहे. आता याच डोंगराच्या ओझ्याखाली चीन दबल्याचे चित्र आहे.
सई बने