प्रसिद्ध कंपनी ब्रिटानिया संबंधित अशी एक गोष्ट आहे ती खरंच ऐकण्यासारखी आहे. जसे ही भारतातील पहिली आणि १३० वर्ष जुनी अशी बिस्किट कंपनी आहे. याची सुरुवात फर्त २९५ रुपयांनी सुरु झाली होती पण आज १२ हजार कोटी रुपयांची झाली आहे. ब्रिटानियाचा आतापर्यंतचा प्रवास हा नेहमीच आव्हानात्मक होता. या कंपनीची सुरुवात १८९२ मध्ये ब्रिटिश व्यावसायिकांच्या एका ग्रुपने कोलकातामधून केली होती. अवघ्या २९५ रुपयांनी या कंपनीचा पाया रचला गेला होता. (Britannia Industries)
ब्रिटानियाची सुरुवात बिस्किटांपासून सुरु झाली होती. कोलकाता येथील एका लहान घरातून याचा पाया रचला गेला होता. काही काळानंतर ती गुप्ता ब्रदर्स यांनी खरेदी केली. ज्यामध्ये नलिन चंद्र गुप्ता प्रमुख होते. वेळेसह बिस्किट बनवण्याच्या प्रक्रियेत बदल झाले. याला मॅन्युअल पद्धतीने बनवण्याचे काम बंद करण्यात आले. ९१० मध्ये विजेवर चालणाऱ्या मशीनच्या माध्यमातून बिस्किट बनवण्यास सुरुवात करण्यात आली.
बिस्किटच्या व्यवसायाला यश येऊ लागले
बिस्किटच्या व्यवसायाला यश येऊ लागले होते. १९१८ मध्ये गुप्ता ब्रदर्स यांनी आपला दबदबा वाढवत कोलाताचे व्यापारी सीएच होम्स पार्टनर यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि ब्रिटानिया कंपनी लिमिडेट ही लॉन्च करण्यात आली. १९२१ मध्ये कंपनीने प्रोडक्डशन वाढवण्यासाठी परदेशातून गॅस ओवन मागवण्यास सुरुवात केली. १९२४ मध्ये मुंबईत फॅक्ट्री सुरु केली आणि हळूहळू देशात ब्रिटानियाची बिस्किट प्रसिद्ध होऊ लागली.
दुसऱ्या महायुद्धात कंपनीने कमाई वाढवली
दुसऱ्या महायुद्धाच्या कारणास्तव काही कंपन्या ठप्प झाल्या. तर काही कंपन्यांचा फायदा सुद्धा झाला. ब्रिटानिया त्याच कंपन्यांपैकी एक होती. युद्धादरम्यान, भारतातील मित्र देशांच्या सैन्याला बिस्किटचा पुरवठा करण्याची सर्वाधिक मोठी ऑर्डर ब्रिटानियाला मिळाली. या ऑर्डरमुळे कंपनीची वार्षिक कमाई ८ टक्क्यांनी वाढून १.३६ कोटींपर्यंत पोहचली.(Britannia Industries)
कंपनीने सातत्याने एक्सपेरिमेंट करणे सुरु ठेवले. स्लाइस आणि रॅप्ड ब्रेड लॉन्च केला. १९५५ मध्ये बॉरबन बिस्किट आणि १९६३ मध्ये ब्रिटानिया केक सुरु केला. वर्ष १९८३ पर्यंत कंपनी देशभरात प्रसिद्ध झाली होती. कंपनीच्या वर्षभराच्या कमाईचा आकडा १०० कोटींच्या पलीकडे गेला होता.
गुड डे ब्रेड लॉन्च
१९८६ मध्ये कंपनीने आपला नवा ब्रँन्ड लॉन्च केला आणि गुड डे असे त्याला नाव दिले. त्यानंतर कंपनीने लिटिल हार्ट्स आणि ५०-५- बिस्किट सुद्धा आणले. ज्याला खुप पसंद केले गेले. २००४ मध्ये कंपनीला सुपरब्रँन्डचा दर्जा मिळाला. २०१६ मध्ये कंपनीने एक्सपेरिमेंट केला. केक आणि कुकीजला मिळून नवे प्रोडक्ट तयार केले.
हे देखील वाचा- कोणत्या स्टार्टअप्सला युनिकॉर्न, डेकाकॉर्न आणि हेक्टोकॉर्नचा दर्जा दिला जातो?
६० देशांमध्ये पसरला गेला आहे व्यवसाय
२०१७ मध्ये ब्रिटानियातील ग्रीक कंपनी चिपिता एसएसोबत रेटू टू ईट प्रोडक्ट्स बनवण्यास सुरुवत केली. वर्षानुवर्ष पुढे जात हा १२ हजार कोटी मार्केट वॅल्यूची कंपनी झाली. ब्रिटानियाचे सध्याचे चेयरमॅन नुस्ली वाडिया आहे आणि एमडी वरुण बेरी आहे. जगातील ६० हून अधिक देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय पसरला गेला आहे. भारतात कंपनीचे ५० लाखांहून अधिक आउटलेट्स आणि १३ फॅक्ट्री आहेत.