भारत देश हा तांदूळ उत्पादनामध्ये प्रमुख आहे. भारतीय नागरिकांच्या आहारामध्ये भात हा मुख्य पदार्थ असतो. आपल्याकडे तांदळाच्या अनेक जाती असून त्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. याच तांदळात बासमती तांदूळ हा सर्वात लाडका आहे. आकारानं लांब, सडसडीत आणि सुगंधी असलेला हा बासमती तांदूळ सण समारंभात प्रामुख्यानं वापरला जातो. भारतातील बासमती तांदळाला परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र आता हाच बासमती तांदूळ बनावट तयार होत आहे. बटाटा आणि प्लॅस्टिक यांच्यापासून बासमती तांदूळ तयार होत असल्याची माहिती मिळाली तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. पण यासंदर्भात येणा-या तक्रांरींची पडताळणी करुन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानेही याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. येत्या ऑगस्टपासून बासमती तांदूळ विक्रेत्यांनाही काही नियम आखून दिले आहेत. प्लॅस्टिक पासून तयार केलेला बासमती तांदूळ (Plastic rice) मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. या तांदळामुळे आरोग्याच्या भयंकर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या बनावट बासमती तांदूळाबाबत गंभीर झाले आहे.
प्रगतीचे अनेक टप्पे मानवानं पार केले आहेत. पण जेवढी प्रगती झाली आणि त्याचा चांगल्या कामासाठी वापर झाला, तेवढाच या तंत्रज्ञानाचा वाईट कामांसाठीही वापर होत आहे. आता चक्क प्लॅस्टीकचा वापर करुन बासमती तांदूळ (Plastic rice) तयार होत असल्याची बातमी आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन बनावट अन्नधान्य निर्मितीमुळे मानवाला प्रचंड हानी होणार आहे. या बनावट धान्यामध्ये प्लॅस्टिकच्या बासमतीचे (Plastic rice) प्रमाण वाढल्यानं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानेही चिंता व्यक्त केली आहे. मुळात बासमती तांदूळ खरा आहे, की बनावट…हे शोधणेही खूप कठीण झाले आहे. आपल्या देशात आणि जगात भारतीय बासमती तांदळाचा खप वाढला आहे. याचा गैरफायदा घेत काहींनी प्लास्टिकपासून तांदूळ (Plastic rice) करायला सुरुवात केली आहे. हातात घेतल्यावर हा तांदूळ अगदी खऱ्या बासमती तांदळासारखा दिसतो. रंगही तोच, सुगंध आणि चव जवळजवळ सारखीच, पण त्याच्या सेवनाने शरीरात अनेक आजार निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता बासमती तांदूळ खरा आहे की बनावट हे जाणून घेणे आणि घरच्याघरी त्याचे परीक्षण करणे गरजेचे आहे.
भेसळयुक्त बासमती तांदूळ कसा ओळखावा यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानेही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. बासमती तांदूळाला सुगंधी तांदूळही म्हणतात. या बासमती तांदळाची शेती भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये मोठ्याप्रमाणात होते. हा तांदूळ अर्धपारदर्शक, लांब, सुगंधी आणि चमकदार असतो. या तांदूळाचे वैशिष्ट म्हणजे, तांदूळ शिजवल्यानंतर तांदळाची लांबी दुप्पट होते. जेवढा जुना बासमती तांदूळ तेवढी तो चांगला समजला जाते. हा भात शिजल्यानंतरही चिकटत नाही, उलट थोडासा फुगतो. हेच बासमती तांदळाचे प्रमुख वैशिष्ट असून त्यावर त्याचा दर्जा ठरवला जातो. आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून याप्रमाणे 2023 पासून ही बासमती तांदळाची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष दर्जा आणि मानकांशी संबंधित नियम करण्यात आले असून या नियमांनुसार तांदळाची चाचणी केली जाणार आहे. या मानकांची पूर्तता न करणाऱ्या तांदळाच्या मालकांवर कारवाई केली जाणार आहे.
========
हे देखील वाचा : पंखांशिवाय 150 किमी उडू शकतो हा पक्षी
========
प्लॅस्टिकचा बासमती तांदूळ (Plastic rice) कसा असतो हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भेसळ करणाऱ्या कंपन्या प्लास्टिकचा बासमती तांदूळ बनवण्यासाठी बटाटे आणि प्लास्टिकचा वापर करतात. हा तांदूळ दिसायला आणि वासाने सामान्य तांदूळासारखा असतो. बनावट बासमती तांदूळ ओळखण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे, त्याची चव. हा तांदूळ धुतल्यावर त्याचे पाणी सामान्य तांदळासारखे पांढरे होत नाही. दुसरीकडे, हा तांदूळ थोडा वेळ भिजवून ठेवल्यास ते रबरासारखा होतो. प्लॅस्टिकचे बासमती तांदूळ (Plastic rice) हे सामान्य भातापेक्षा लांब असतात. या तांदूळाचे टोक पाहूनची तो बनावट आहे, की अस्सल आहे, हे ठरवता येते. ख-या बासमती तांदूळाचे टोक टोकदार असतात. शिवाय त्याचा भात शिजल्यावर तो चिवट किंवा चिकट होत नाही. जगभरात बासमती तांदूळाची वाढती मागणी पाहून प्लास्टिकचा तांदूळ मशिनमध्ये बनवला जातो. हा तांदूळ बटाटा, सलगम, प्लास्टिक आणि राळ यापासून बनवला जातो. हा बासमती पचायला खूप कठीण असतो. तांदळाचे काही दामे चुना आणि पाण्याच्या द्रावणामध्ये घालून ठेवावे. त्यानंतर तांदळाचा रंग बदलला तर तो नकली तांदूळ आहे, हे ओळखता येईल. शिवाय पाण्यामध्ये या तांदळाचे दाणे वर तरंगले तरी हा तांदूळ बनावट आहे, हे ओळखता येते. खाद्यपदार्थात होणारी ही बनावट धोकादायक आहे. ती रोखण्यासाठी प्रत्येकानं सतर्क राहणं गरजेचं आहे.
सई बने