भारतामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार करत असूनही भारतात जी उप्तादने विकली त्यात मोठ्या प्रमाणात भेदभाव केल्याचा ठपका नेस्ले या कंपनीवर ठेवण्यात आला आहे. नेस्ले ही बेबीफूड बनवणारी ख्यातनाम कंपनी आहे. नेस्लेच्याच मॅगी या उत्पादनात २०१५ मध्ये प्रमाणाच्या बाहेर MSG म्हणजेच मोनोसोडियम ग्लूटामेट आढळले होते. मात्र नेस्लेनं आता चक्क लहान मुलांच्या आहारातही मोठा फेरफार केला आहे. त्यामुळे हे बेबीफुड खाणा-या लहान मुलांच्या आहारात अतिरिक्त साखरेचा समावेश झाला असून भविष्यात या मुलांना त्याचे अपाय सहन करावे लागणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (Nestlé Company)
२०१५ मध्ये दोन मिनिटात मॅगी ही जाहीरात करणारी नेस्ले कंपनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आहार कंपन्यांवर नजर ठेवणाऱ्या ‘पब्लिक आय‘ या वेबसाइटने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालात नेस्ले कंपनी भारतीयांसोबत करीत असलेल्या मोठ्या धोक्याची माहिती देण्यात आली आहे. नेस्ले कंपनी भारतात विकल्या जाणाऱ्या त्यांच्या बेबी प्रोडक्ट्समध्ये प्रमाणाच्या बाहेर जास्त साखर घालत असल्याचा हा अहवाल आहे.
नेस्ले कंपनी भारतात जी बेबीफुड विकते, त्यापेक्षा कमी साखर युरोप, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या विकसित देशांमध्ये विकल्या जाणा-या उत्पादनात घालत असल्याचा हा अहवाल आहे. वास्तविक नेस्ले भारतामध्ये मोठा व्यापर करते, असे असूनही कंपनी भारतासंदर्भात एवढा भेदभाव करीत असल्याचे स्पष्ट झाल्यावर नेस्लेवर टिका करण्यात येत आहे. आता नेस्लेसंदर्भात हा अहवाल आल्यानंतर भारतातही नेस्ले संदर्भात तपास सुरु करण्यात आला आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. एफएसएसएआय, म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे नेस्लेच्या बेबीफुड उत्पादनाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आळा आहे. यात नेस्लेच्या उत्पादनात दोष आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येऊ शकते. (Nestlé Company)
नेस्लेची स्थापना १९०५ मध्ये जॉर्ज आणि चार्ल्स पेज यांनी केली. स्वित्झर्लंड येथे मुख्यालय असलेली नेस्ले ही जगातील सर्वात मोठी खाद्य कंपनी आहे. नेस्लेच्या उत्पादनांमध्ये बेबी फूड, वैद्यकीय अन्न, बाटलीबंद पाणी, कॉफी आणि चहा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, आइस्क्रीम, पाळीव प्राण्यांचे अन्न आणि स्नॅक्स यांचा समावेश आहे. नेस्लेच्या एकोणतीस ब्रँडची वार्षिक विक्री सुमारे US$१.१ बिलियन पेक्षा जास्त आहे. त्यात नेस्प्रेसो, नेस्कॅफे, किट कॅट, स्मार्टिज, नेस्किक, स्टॉफर्स, व्हायटल आणि मॅगी यांचा समावेश आहे. नेस्ले कंपनीचे ४४७ कारखाने आहेत. नेस्ले जगभरातील १८९ देशांमध्ये कार्यरत असून या कंपनीमध्ये तीस लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.
भारत ही नेस्लेची मोठी बाजारपेठ आहे. नेस्लेची भारतात बेबी फूड उत्पादने, विशेषत: बेबी मिल्क आणि सेरेलॅक, मोठ्याप्रमाणात विकली जात आहेत. यामध्येच साखर जास्त झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नेस्लेनं ही चूक जाणूनबुजून केली आहे का, याचा तपास सुरु झाला आहे. कारण नेस्लेच्या या चुकीमुळे लाखो-करोडो मुलांचे भविष्य अंधारात गेले आहे. कारण या मुलांवर लठ्ठपणा, मधुमेह आणि अन्य आजारांची कायम छाया रहाणार आहे. गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून नेस्ले भारतात अती साखर असलेली उत्पादने विकत आहे, याचाही तपास करण्यात येणार आहे. भारताबाबत ही गंभीर चूक करणा-या नेस्ले कंपनीनं ब्रिटन, युरोप आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये प्रमाणबद्ध साखर असलेली उत्पादने विकत आहे. त्यामुळेच नेस्लेनं भारताबाबत ही चूक जाणूनबुजून केल्याची शंका व्यक्त होत आहे. (Nestlé Company)
भारतासह आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये नेस्लेने जाणूनबुजून साखर जास्त असलेली उत्पादने विकल्याचेही स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय दृष्या हा मोठा गुन्हा आहे. ही साखरयुक्त उत्पादने नियमीत घेणा-या लहान मुलांचीही तपासणी करण्यात येणार आहे. नेस्लेनं आहारासंदर्भात केलेला हा घोटाळा म्हणजे, कंपनीच्या चालकांच्या दुप्पटीपणाचे प्रतिक असल्याची टिका होत आहे. कारण नेस्लेनं यासंदर्भात कुठलीही माहिती त्यांच्या उत्पादनावर दिलेली नाही. नेस्लेच्या उत्पादनावर जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे तपशील उपलब्ध आहेत. परंतु उत्पादनामध्ये असलेल्या साखरेबद्दल माहिती नमूद केलेली नाही. भारतातील नेस्लेच्या सेरेलॅकमध्ये प्रत्येक चमच्यामध्ये ३ ते ४ ग्रॅम साखर असते. हे प्रमाण घातक आहे. तर स्वित्झर्लंड, ब्रिटन, युरोप या देशांमध्ये हे प्रमाण शून्य आहे.(Nestlé Company)
============
हे देखील वाचा : डीडी न्यूजचा नवा भगवा लोगो पाहून विरोधक म्हणाले, “हे तर प्रचार भारती…”
============
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार ३ वर्षांखालील मुलांच्या आहारातील साखरेचे प्रमाण अतिरिक्त झाल्यास त्यांच्यात लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, पांढऱ्या रक्त पेशी कमकुवत होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, दात पोकळी यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. २०२२ मध्ये, नेस्लेने भारतात २०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सेरेलॅक विकले आहे. म्हणजेच नेस्लेनं भारतातील किती लहान मुलांना मधुमेहाची भेट दिली आहे हे स्पष्ट झाले आहे. नेस्लेची सर्वच लहान मुलांसदर्भातील उप्तादने तपासणीची मागणी आता कऱण्यात येत आहे. तसेच ज्या माता आपल्या मुलांना नेस्लेचे बेबीफुड देत आहेत, त्यांनी सावधान व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
सई बने