नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशात नवरात्रौत्सव ९ दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केली जाणार आहे. सर्वत्र देवीच्या ९ रुपयांची नऊ दिवस उपासना केली जाणार आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भव्य रुपात नवरात्रौत्सव साजरी केली जाते. संपूर्ण बंगाल मध्ये नवरात्रौत्सवावेळी पूजेसाठी मंडपात मोठ्या प्रमाणात एकत्रित जमतात. मोठ्या मोठ्या मंडपांमध्ये देवीच्या आकर्षिक मुर्त्यांसह बंगाली लोक देवी दुर्गेची पूजा करतात. (Bengal Durga Puja)
बंगालमध्ये शेकडो वर्षापासून दुर्गा पुजा केली जाते. असे म्हटले जाते की, बंगालमुळेच दुसऱ्या देशात सुद्धा दुर्गा पूजा करण्याची प्रथा सुरु झाली आहे. आज सुद्धा पश्चिम बंगाल सारखी दुर्गा पुजा कुठेही केली जात नाही. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गा पुजा आयोजित करण्यासंदर्भात काही कथा आहेत. पहिल्यांदाच दुर्गा पुजा कशी झाली, कोणी आयोजित केली होती या संदर्भात काही किस्से आहेत.
प्लासीच्या युद्धानंतर पहिल्यांदा आयोजन
एक कथा अशी सुद्धा आहे की, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पुजेचे आयोजन १७५७ च्या प्लासीच्या युद्धानंतर सुरु केली हती. असे म्हटले जाते की, प्लासीच्या युद्धात इंग्रजांनी विजयाचा आनंद मानत देवाला धन्यवाद देण्यासाठी पहिल्यांदाच दुर्गा पुजेचे आयोजन केले होते.प्लासीच्या युद्धात बंगालचे शासक नवाब सिराजुद्दौलाचा पराभव झाला होता.
बंगालमध्ये मुर्शिदाबादच्या दक्षिणेला २२ किमी दूर गंगा किनाऱ्यावर प्लासी नावाचे ठिकाण आहेत. येथेच २३ जून १७५७ मध्ये नवाबचे सैन्य आणि इंग्रजांच्या मध्ये युद्ध झाले होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्वात लढले आणि नवाब सिराजुद्दोला पराभूत केले. दरम्यान युद्धापूर्वीच कटाच्या माध्यमातून रॉबर्ट क्लाइवने नवाबचे काही प्रमुख दरबारी आणि शहरातील श्रीमंत शेठ लोकांना आपल्यासोबत केले होते.
असे म्हटले जाते की, युद्धाच्या विजयानंतर रॉबर्ट क्लाइवला देवाला धन्यवाद द्यायचे होते. मात्र युद्धादरम्यान नवाब सिराजुद्दोलाने परिसरातील सर्व चर्च नेस्तनाबूद केली होती. त्यावेळी इंग्रजांचा राजा नव कृष्णदेव समोर आले होते. त्यांनी रॉबर्ट क्लाइवच्या समोर भव्य दुर्गा पुजा करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. या प्रस्तावावर रॉबर्ट क्लाइव सुद्धा तयार झाला आणि त्याच वर्षी पहिल्यांदाच कोलकातामध्ये भव्य दुर्गा पुजेचे आयोजन झाले होते.
हे देखील वाचा- राजा विक्रमादित्यने ११ वेळा शीर कापून देवीच्या चरणावर ठेवले होते, जाणून घ्या ‘या’ अनोख्या मंदिराची कथा
काही झाली पहिल्यांदाच दुर्गा पुजा
संपूर्ण कोलकाता मध्ये शानदार पद्धतीने सजावट करण्यात आली होती. कोलकाता मधील शोभा बाजार मध्ये पुरातन बाडीमध्ये दुर्गा पुजेचे आयोजन झाले होते. यामध्ये कृष्णनगर मधील महान चित्रकार आणि मुर्तिकारांना बोलावण्यात आले होते. भव्य मुर्त्या तयार करण्यात आल्या होत्या. वर्मा आणि श्रीलंकेतून नृत्यांगनेला सुद्धा बोलावण्यात आले होते. रॉबर्ट क्लाइवने हत्तीवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला होता. हे आयोजन पाहण्यासाठी दूरदूरवरुन लोक कोलकाता येथे आले होते.
या संदर्भात इंग्रजांचे एक चित्र सुद्धा मिळते. ज्यामध्ये कोलकाता मध्ये झालेली पहिली दुर्गा पुजेबद्दल दिसून येते. राजा नव कृष्णदेव यांच्या महालात सुद्धा एक पेटिंग सुद्धा लावण्यात आली. यामध्ये कोलकाताच्या दुर्गा पुजेबद्दल दाखवले गेले होते. या पेटिंगच्या आधारावरच पहिल्यांदा दुर्गा पुजेची कथा असल्याचे सांगितले जाते.
१७५७ मधील दुर्गा पुजेचे आयोजन पाहून बडे श्रीमंत जमीनदार सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यानंतरच्या वर्षात जेव्हा बंगालमद्ये जमीनदारी प्रथा लागू झाली तेव्हा परिसरातील श्रीमंत जमीनदार आपले व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी प्रत्येक वर्षी भव्य दुर्गा पुजेचे आयोजन करु लागले. अशा प्रकारे पूजा पाहण्यासाठी दूरदूरवरुन गावातून लोक यायचे. हळूहळू दुर्गा पुजा लोकप्रिय होत सर्व ठिकाणी होऊ लागली.(Bengal Durga Puja)
आणखी काही कथा सुद्धा आहेत
पहिल्यांदा दुर्गा पुजेचे आयोजनासंदर्भात काही दुसऱ्या कथा सुद्धा आहेत. असे म्हटले जाते की, पहिल्यांदा नवव्या शतकात बंगालमधील एका तरुणाने याची सुरुवात केली होती. बंगाल मधील रघुनंदन भट्टाचार्य नावाच्या एका विद्वानांच्या पहिल्यांदा दुर्गा पुजेच्या आयोजनासंदर्भात उल्लेख केलेला दिसतो.
आणखी एका कथेनुसार बंगाल मध्ये पहिल्यांदा दुर्गा पुजेचे आयोजन कुल्लक भट्ट नावाच्या पंडितांच्या निर्देशनाने ताहिरपुरातील एक जमीनदार नारायण यांनी केले होत. हा कार्यक्रम संपूर्णपणे पारिवारिक होता. असे म्हटले जाते की, बंगालमध्ये पाल आणि सेनवंशियांनी दुर्गा पुजेला प्रोत्साहन दिले.
असे सांगितले जाते की, १७५७ नंतर १७९० मध्ये राजा, सामंत आणि जमीनदारांनी पहिल्यांदा बंगालच्या नदिया जनपदाच्या गुप्ती पाढामध्ये सार्वजनिक दुर्गा पुजेचे आयोजन केले होते. त्यानंतर दुर्गा पुजा सामान्य जनजीवनात सुद्धा लोकप्रिय होत गेली आणि ती भव्य पद्धतीने साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.