Home » Battisa Temple : गोल फिरणा-या शिवलिंगाचे रहस्य !

Battisa Temple : गोल फिरणा-या शिवलिंगाचे रहस्य !

by Team Gajawaja
0 comment
Battisa Temple
Share

भारतातील पौराणिक मंदिरे किती आहेत, हे मोजता येणार नाही. मात्र या प्रत्येक मंदिराचे स्थापत्यशास्त्र वेगळे आहे. हजारो वर्षापूर्वी उभारण्यात आलेली ही मंदिरे आजही भाविकांना आश्चर्यचकीत करतात. असेच एक अद्भूत आणि विशाल मंदिर छत्तीसगड राज्यात आहे. छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्हा हा आत्तापर्यंत नक्षलवाद्यांसाठी ओळखला जात होता. मात्र आता हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या तावडीतून मोकळा होत आहे. राज्यसरकार आणि केंद्र सरकार जिल्हाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये पर्यटनाचा विकास करण्यावर जोर देण्यात येत आहे. एकेकाळी नगवंशाची राजधानी असलेल्या दंतेवाडामध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. या मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात येणार असून यातून धार्मिक पर्यटन वाढवण्यात येणार आहे. (Battisa Temple)

या सर्व मंदिरांमध्ये प्रमुख मंदिर आहे ते भगवान शंकराला समर्पित असे बतिसा मंदिर. हे मंदिर तब्बल 1100 वर्ष जुने असल्याची माहिती आहे. त्यातूनही विशेष गोष्ट म्हणजे, या मंदिरातील शिवलिंग हे 360° फिरते. गोल फिरणा-या या शिवलिंगाची महती राज्यात सर्वदूर आहे. एवढ्या वर्षानंतरही हे शिवलिंग गोल फिरत असून यामागचे रहस्य जाणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील बरसूर येथे असलेल्या बतिसा मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या मंदिरातील शिवलिंग हे स्वतःभोवती गोल फिरते. अशा स्वरुपाचे हे देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव शिवलिंग असल्याचे मानले जाते. एवढ्या वर्षानंतरही हे शिवलिंग आपल्या अद्भूत अशा कलेनं नवीन आहे असेच वाटते. (Marathi News)

हे मंदिर बस्तरचे नागवंशी राजा सोमेश्वर देव यांची राणी गंगादेवी यांनी बांधले होते. कोणत्याही आवाजाशिवाय किंवा घर्षणाशिवाय फिरणारे हे शिवलिंग कारागिराच्या अद्वितीय कलेचे प्रतीक मानण्यात येते. एकेकाळी हा सर्व भाग नागवंशी राजांचा होता. नागवंशी राजे आपले दैवत म्हणून भगवान शंकराची पूजा करत असत. अशा पूजेच्या वेगवेगळ्या विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या जलहारींसारखे शिवलिंग फिरत असल्याची माहिती स्थानिक देतात. तरीही या मंदिराचा जिर्णोद्धार करतांना या फिरणा-या शिवलिंगाची अधिक माहिती शोधून काढावी अशी मागणीही करण्यात येत आहे. दंतेवाडा, बस्तर येथील नागवंशीय राजे हे शिल्पकलेवर प्रेम करणारे होते. त्यांनी या भागात जी मंदिरे उभारली ती वास्तुकलेचा अजोड नमुना ठरली आहेत. या प्रत्येक मंदिरांची कलाकुसर ही एवढ्या वर्षानंतर अजूनही मनाला मोहवणारी आहे. नागवंश राजा बाणासुरची राजधानी म्हणून बस्तर ओळखळे जाते. (Battisa Temple)

या शहामध्ये बतिसा महादेव मंदिरासारखीच अनेक मंदिरे आहेत. त्यात बतिसा महादेव मंदिर अधिक भव्य आहेत. या मंदिराचे नाव बतिसा पडले कारण मंदिरामध्ये 32 खांब आहेत. या सर्व खांबांवर कलाकुसर केलेली आहे. या बत्तीस खांबांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे खांब आठ ओळींमध्ये आहेत. या बतिसा महादेव मंदिराचे आणखी एक वैशिष्टय् म्हणजे, यामध्ये दोन गर्भगृह आहेत. या दोन गर्भगृहापैकी एकामध्ये सोमेश्वर महादेव आणि दुस-या गर्भगृहामध्ये गंगाधरेश्वर महादेव अशी दोन शिवलिंगे विराजमान आहेत. नागवंशी राजा आणि राणी या दोन्ही वेगवेगळ्या शिवलिंगाची पूजा करत असल्याची माहिती स्थानिक देतात. या संपूर्ण मंदिरामध्ये कोरीव काम केलेले आहेच, शिवाय मंदिरात असलेल्या नंदिच्या मुर्तीवरही रेखिव कोरीव काम केले आहे.सध्या हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाद्वारे सुरक्षित असून आता त्याचा विकास कऱण्यात येत आहे. (Marathi News)

==============

हे देखील वाचा : Martial Eagles : जंगलाच्या राजाचा शिकारी !

Tulshi Mal : तुळशीची माळ म्हणजे काय? ती घालण्याचे फायदे कोणते?

==============

या मंदिराबाबत माहिती देणारा शिलालेखही असून यात फाल्गुन शुक्ल द्वादश, शके 1130 अशी नोंद आहे. तसेच 1209 पर्यंत मंदिराचे बांधकाम सुरु असल्याची माहिती शिलालेखावर आहे. त्याकाळी मंदिराच्या खर्चासाठी आणि देखभालीसाठी केरामरुका गाव दान करण्यात आले होते. या सर्वांत राजाचे जे मंत्री उपस्थित होते, त्यांचीही नावे या शिलालेखात नोंद कऱण्यात आलेली आहेत. याच शिलालेखाचा सध्या पुरातत्व विभागातर्फे अभ्यास करण्यात येत असून त्यातून मंदिराबाबत अन्य काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न कऱण्यात येणार आहे. शिवाय मंदिरातील फिरणा-या शिवलिंगाचा अभ्यासही करण्यात येत आहे. 2003 मध्ये या मंदिराची दुरुस्ती पुरातत्व विभागानं केली आहे. आता या मंदिराचा सर्व परिसर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित कऱण्यात येणार आहे. (Battisa Temple)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.