बँक खाते (Bank Account) असणे सध्या फार अत्यावश्यक झाले आहे. तसेच आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा लाभार्थ्याला त्याचे पैसे थेट खात्यात पाठवले जातात.तसेच बँक खाते सुरु करण्यासाठी फार काही करावे लागत नसल्याने आज जवळजवळ सर्वांचे एक तरी बँक खाते असते. अशातच आता प्रश्न उपस्थितीत राहत आहे की, एकापेक्षा अधिक बँक खाते असणे फायदेशीर आहे का? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.
सध्याच्या काळात एक बचत खाते असावे. मात्र एका पेक्षा अधिक बँक खाती सुरु केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. वेल्थ क्रिएटर्स फाइनेंशियल अॅडवायजर्सचे को-फाउंडर विनित अय्यर यांनी असे म्हटले की, एका व्यक्तीजवळ तीन पेक्षा अधिक बँक खाती नसावीत. तर आता ३ बँक खाती असतील तर काय फायदा होतो हे पाहूयात.
उत्तम आर्थिक गुंतवणूक
लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनुसार एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता यांचे असे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीचे काही आर्थिक लक्ष्य असतात. जसे की, मुलांचे शिक्षण, आपत्कालीन फंड आणि महिन्याभराचा खर्च. या आर्थिक लक्ष्यांसाठी जर तुमची वेगवेगळी खाती असतील तर तुम्ही नक्कीच बचतीवर लक्ष ठेवू शकता. तसेच आर्थिक लक्ष्य संतुलित राहण्यास ही सोप्पे होईल.
आर्थिक संकट येणार नाही
विविध आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बँक अकाउंट (Bank Account) असल्याने तुम्ही मुख्य अकाउंटमधून निर्धारित वेळी त्या अकाउंट्समध्ये पैसे ट्रांन्सफर करु शकतात. याचा असा फायदा होईल की, तुम्हाला कळे तुमच्याकडे खर्च केल्यानंतर किती पैसे बचत करता येतील. यामुळे खर्च करताना सुद्धा कोणतेही टेंन्शन येणार नाही आणि महत्वाच्या कार्यांसाठी सुद्धा पैसे तुमच्याकडे असतील.
हे देखील वाचा- महागाई मंदी आणि व्याज दरांमुळे भारताच्या विकासाचा वेग मंदावणार?
पैसे काढण्यास सोप्पे
डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढण्याची सीमा ठरवलेली असते. काही वेळा आपत्कालीन स्थितीत अधिक पैसे काढावे लागतात. अशातच जर तुमच्याकडे अधिक खाते असतील तर कार्ड सुद्धा तितकीच असतील. याचा फायदा असा होईल की, तुम्ही अधिक पैसे एकत्रित काढू शकता.
पैसे राहतात सुरक्षित
चार्टर्ड अकाउंटेट राजेंद्र वधवा यांचे असे म्हणणे आहे की, बँक डुबल्यास प्रत्येक खातेधारकाला सरकारला ५ लाखांची मदत करते. मात्र तुमच्याकडे अधिक बचत खाती असतील तर पैसे बुडण्याची रिस्क सुद्धा कमी होते.