Home » राम मंदिरात पुन्हा सुरू झालीय ‘ही’ VVIP सुविधा, असा तयार करता येईल ऑनलाइन आणि ऑफलाइन पास

राम मंदिरात पुन्हा सुरू झालीय ‘ही’ VVIP सुविधा, असा तयार करता येईल ऑनलाइन आणि ऑफलाइन पास

अयोध्या राम मंदिरातील व्हीव्हीआयपींच्या दर्शनाची सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या ट्र्स्टने रामनवमीला होणारी गर्दी पाहता 18 एप्रिल पर्यंत व्हीआयपी दर्शनासाठी बंदी घातली होती. पण आता पासच्या माध्यमातून रामललांचे दर्शन घेता येणार आहे.

by Team Gajawaja
0 comment
Ram Mandir
Share

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. रामनवमीमुळे मंदिरातील व्हीव्हीआयपी दर्शनाची सुविधा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा व्हीव्हीआयपी सुविधा सुरु झाली आहे. खरंतर, राम मंदिराच्या ट्रस्टने रामनवमीला होणारी गर्दी पाहता 18 एप्रिल पर्यंत व्हीव्हीायपी दर्शन आणि पासच्या माध्यमातून होणाऱ्या दर्शनावर बंदी घालण्यात आली होती.

15 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत ज्यांनी आधीच दर्शनासाठी स्लॉट बुक केले होते त्यांचे पासही रद्द करण्यात आले होते. पण आता पासच्या माध्यमातून दर्शन आणि आरतीसाठी उपस्थिती लावता येणार आहे. ट्रस्टने विशेष दर्शन आणि सुगम दर्शन अशा दोन नव्या श्रेणी तयार केल्या आहेत. या श्रेणीमध्ये दर्शनाची सुविधा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अशा दोन तासांचे सहा वेगवेगळे स्लॉट उपलब्ध आहेत. (Ayodhya Ram Mandir)

असा काढा ऑनलाइन आणि ऑफलाइन पास
सुगम आणि विशेष दर्शनासाठी प्रत्येक स्लॉटसाठी 100 पास जारी केले जातात. त्यापैकी 20 पास ऑनलाइन तयार केले जातात. तर 80 पास ट्रस्टच्या माध्यमातून तयार केले जाता. एका दिवशी एकूण 600 पास जारी केले जातात. याशिवाय रामललांची मंगला, भोग आणि शयन आरतीसाठी उपस्थितीत राहण्यासाठीच्या पासचीही सुविधा आहे. यासाठीही प्रत्येक आरतीसाठी उपस्थितीत राहण्यासाठी 100 पास जारी केले जातात. यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पास तयार केले जातात. ऑफलाइन पद्धतीने पास तयार करण्यासाठी ट्रस्टच्या कार्यालयात जावे लागणार आहे. तर ऑनलाइन पाससाठी तुम्हाला मंदिराची अधिकृत वेबसाइट https://srjbtkshetra.org/ येथे भेट द्यावी लागेल.


आणखी वाचा :
दुबईचा पाऊस की रईसीची हौस…
खरी सिल्व्हर ज्वेलरी अशी ओखळा, फसवणूकीपासून रहाल दूर
भक्तांना रामलल्लांच्या सूर्याभिषेकाची प्रतीक्षा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.