प्रत्येक महिला सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारचे फेशियल (Facial) करताना आपण पाहिले आहे. आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग राहू नये, चेहरा स्वच्छ, सुंदर दिसावा यासाठी फेशियल केले जाते. आजच्या काळात अनेक प्रकारचे फेशियलचे प्रकार आले आहेत.
अनेक प्रकारचे फेशियल करण्यासाठी बरीच विविध प्रकारची मशीनरी देखील वापरली जाते. अतिशय महागडे आणि काहीवेळेस त्रासदायक असणारे फेशियल करत महिला आपला चेहरा सुंदर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र आपण जर पाहिले तर अनेक सेलिब्रिटी फेशियल करण्यापेक्षा घरच्या घरी एक सोपा आणि लाभदायक उपाय करताना दिसतात. त्यांच्या मुलाखतींमध्ये देखील ते याबद्दल बोलतात. तो उपाय म्हणजे आईस फेशियल(Ice Facial).
आईस फेशियल नाव जरी ऐकायला हे नाव फॅन्सी आणि नवीन वाटले तरी अतिशय साधे फेशियल आहे. नावरूनच अनेकांच्या लक्षात आले असेल की यामध्ये बर्फाचा वापर करून फेशियल केले जाते. सध्या भाषेत सांगायचे झाले तर बर्फाच्या थंड पाण्याने तोंड धुणे असाच काहीसा हा प्रकार आहे. मात्र त्याची एक पद्धत आहे. चाल जाणून घेऊया या आईस फेशियलबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल.
प्रदूषण, वाढते वय, कडक सूर्यप्रकाश आणि इतर कारणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग, मुरुम, पुरळ येऊ शकतात आणि चेहरा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतो. यासाठी आईस फेशियल अतिशय चांगला पर्याय आहे. बर्फ आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगला समजला जातो. पण हे फेशियल करण्यापूर्वी त्याबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. चेहऱ्यावर चमक आणण्यासोबतच बर्फाचे अनेक फायदे आहेत. मात्र हा बर्फ त्वचेसाठी वापरताना खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे.
– आईस फेशियल (Ice Facial) केल्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात. यामुळे त्वचेवरील चमक वाढण्यास मदत मिळते. पोर्स ओपन झाल्यामुळे त्वचेला श्वास घेणे सुलभ होते आणि त्वचेवरील जमा झालेली घाणही निघून जाण्यास मदत मिळते.
– अनेकदा झोप पूर्ण न झाल्याने अथवा सतत तणावात राहिल्याने चेहऱ्यावर सूज येते. कधी कधी झोपेतून उठल्यानंतर डोळ्याखाली पफीनेस जाणवतो. सकाळी उठल्यानंतर आईस फेशियल केल्यास याचा नक्कीच तुम्हाला या समस्यांमध्ये फायदा होईल. आणि चेहराही टवटवीत दिसतो.
– बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते. यामुळे पिंपल्सची समस्याही दूर होते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
– चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर बर्फाने फेशियल करा. खरं तर चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने त्वचेची जळजळ कमी होते. यासह, मुरुम स्वतःच हळूहळू बरे होऊ लागतात. हे आपल्या छिद्रांचा आकार वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
– आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते. त्यामुळे आईस मसाज नियमितपणे करावे. यामुळे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळातही हलकेपणा येतो.
– अनेकदा उन्हात राहिल्याने चेहऱ्याची त्वचा जळते. तसेच सनबर्नसारखी समस्या ही उद्भवते. अशावेळी बर्फाने चेहऱ्यावर मसाज आराम मिळतो.
– आईस फेशियल केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाण्यास मदत मिळथे. तसंच चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचेवर बर्फाच्या थंडपणामुळे त्वचा अधिक तजेलदार होण्यास मदत मिळते. याशिवाय चेहऱ्यावरील उजळपणा वाढण्यासाठी फायदा होतो.
आईस फेशियल कसे करावे?
पद्धत १
आईस फेशियल करण्यासाठी प्रथम एक मोठे किंवा खोल भांडे घ्या ज्यात आपला चेहरा बुडवता येईल असे. आता या भांड्यात थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे घाला. आता थंड पाणी आणि आईस क्यूबने भरलेल्या भांड्यात चेहरा ५ ते ७ सेकंद बुडवून ठेवा आणि नंतर बाहेर काढा.
ही प्रक्रिया ८ ते १० मिनिटांच्या अंतराने कमीत कमी ५ वेळा करा. लक्षात ठेवा, चेहरा २० सेकंदापेक्षा जास्त काळ पाण्यात बुडवू नका. चेहरा पाण्यातून काढून टाकल्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने चेहरा कोरडा करावा. टॉवेलने चेहरा चोळणार नाही याची काळजी घ्या.
पद्धत २
रोज सकाळी चेहऱ्यावर बर्फाचा तुकडा घ्या आणि कापड किंवा प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळा. नंतर हळुवारपणे चेहऱ्यावर वर्तुळाकार म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवा. तुम्ही दररोज २ मिनिटे हे करू शकता.
(डिस्क्लेमर: कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या )