यरुशमलच्या अल-अक्सा मस्जिदमध्ये नुकत्याच इज्राइली पोलिसांकडून पॅलिस्टिनी नागरिकांवर हल्ला करण्यात आला. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याचे सांगितले जात आहे. टीयर गॅस आणि स्टोन ग्रेनेडचा हल्ला त्यांनी केला. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पॅलेस्टिनी आणि इज्राइली पोलिसांमध्ये झालेला संघर्ष दिसून येत आहे.(Al Aqsa Mosque)
मशिदीतील पॅलेस्टिनी आंदोलक फटाके, काठ्या आणि दगडांनी सज्ज होते आणि त्यांनी मशिदीत स्वत:ला अडवले होते, असा दावा इस्रायली पोलिसांनी केला आहे. तर पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट सोसाइटीचे असे म्हणणे आहे की, मस्जिमध्ये जखमींसंबंधित काही रिपोर्ट मिळाले. त्यांच्या संख्येचे अनुमान लावता येत नाहीय कारण इज्राइली सैन्य जखमींना वैद्यकिय सेवा पुरवण्यासाठी अडथळे निर्माण करत होते.
हे पहिल्यांदाच असे झालेले नाही जेव्हा अल-अक्सा मस्जिद हे इज्राइल आणि पॅलेस्टिन यांच्यामध्ये वादाचे कारण बनले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सुद्धा पॅलेस्टिनी आणि इज्राइल सुरक्षारक्षकांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षामागील नक्की कारण काय हे पाहूयात.
पूर्व यरुशमल मध्ये यहुदी आणि इस्लामांसाठी सर्वाधिक पवित्र जागा आहे. मात्र यहूद्यांसाठी टेंमल माउंट आणि मुस्लिमांसाठी अल-हराम अल शरीफ नावाने प्रसिद्ध अल-अक्सा मस्जिद आणि डोम ऑफ द रॉक आहे. पण यहूदी धर्मात डोम ऑफ द रॉकला सर्वाधिक पवित्र धर्मिक स्थळ म्हटले आहे. परंतु ते पैगंबर मोहम्मद यांच्या संदर्भातील असल्याने मुस्लिम सुद्धा त्याला फार मानतात. येथे मुस्लिम नमाज अदा करु शकतात. पण नॉन-मुस्लिमांना प्रवेश तर दिला जातो पण इबादत करण्यासाठी बंदी घातली गेली आहे. या परिसराचे मॅनेजेंट भले ही जॉर्डनच्या वक्फ कडून केले जाते पण सुरक्षेसंबंधित सर्व गोष्टींसाठीचे अधिकार इज्राइलकडे आहेत.
१०० वर्ष जुना वाद
पहिल्या महायुद्धात उस्मानिया सल्तनचा पराभव झाला आमि मध्य-पूर्वेत फिलिस्तानीच्या नावे ओळखल्या जाणाऱ्या या हिस्स्यावर ब्रिटेनने ताबा मिळवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने ब्रिटनेला एक जबाबदारी दिली. त्यानुसार पॅलेस्टिनींसाठी एक नॅशनल होम तयार करावे.
यहूद्यांनी दावा केला की, हे त्यांच्या पूर्वजांचे घर आहे. तर पॅलेस्टिनींनी सुद्धा तोच दावा केला. याच गोष्टीवरुन त्या दोघांमध्ये वाद सुरु झाले आणि ते वादाचे कारण ठरले. १९२० ते १९४० दरम्यान २० वर्षांमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नरसंहारापासून बचाव करत मोठ्या संख्येने यहूदी येथे आले. परिणामी ब्रिटिश शासन, अरब आणि यहुद्यांमध्ये हिंसा झाला.(Al Aqsa Mosque)
देशाच्या विभाजनासाठी झाले मतदान
१९४७ मध्ये युहूदी आणि अरब यांच्यामधअये याच वादावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राने पाऊल उचलले. संयुक्त राष्ट्राने दो्न्ही समुदांसाठी वेगवेगळ्या देश निर्माण करण्यासाठी मदतान केले. मतदानानंतर यरुशलमला एक आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचे ठरले गेले. हा निर्णय यहूदी नेत्यांनी स्विकारला पण अरबने फेटाळून लावला. अशातच निर्णय झालाच नाही. ब्रिटिश शासक सुद्धा हा निर्णय लागू करण्यास अयशस्वी ठरले आणि परतले. त्यानंतर ही यहूदी नेत्यांनी इज्राइलच्या निर्माणाची घोषणा केली. हे काही पॅलेस्टिनी लोकांना पसंद पडले नाही आणि युद्ध पेटले. अरब देशांनी सुरक्षाबलावर हल्ला केला.
हे देखील वाचा- ब्रिटीश मंत्र्यांचा धक्कादायक आरोप…
लाखो पॅलेस्टिनी नागरिकांना आपल्या घरातून पळ काढावा लागला किंवा त्यांना जबरदस्तीने घरातून काढले गेले. वर्षापर्यंत चाललेल्या या युद्धाची स्थिती जेव्हा सामान्य झाली तेव्हा येथील बहुतांश हिस्स्यावर इज्राइलने ताबा मिळवला होता. त्यानंतर ज्या जमीनीवर जॉर्डन यांचे वर्चस्व होते त्याला वेस्ट बँक आणि मिस्रचा जेथे ताबा होता ज्याला गाजा असे म्हटले जाते. तर यरुशलमला पश्चिममध्ये इज्राइली सैन्य आणि पूर्वेला जॉर्डनच्या सुरक्षाबलांमध्ये विभागले गेले.