Home » Donald Trump : एडेन अलेक्झांडर आणि हमास !

Donald Trump : एडेन अलेक्झांडर आणि हमास !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 13 मे रोजी मध्यपूर्वेच्या देशांचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौ-यापूर्वी एडेन अलेक्झांडर या अमेरिकेच्या अवघ्या 21 वर्षीय सैनिकाची चर्चा सुरु झाली आहे. 21 वर्षीय हा एडेन गेली दोन वर्ष हमास या दहशतवादी संघटनेच्या कैदेत आहे. हमास संघटनेनं अमेरिकेच्या तळावर हल्ला करत त्याला ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून एडेन जिवंत आहे, की मेला याची कोणतीही माहिती नव्हती. मात्र गेल्या थॅक्सगिव्हींगच्या दिवशी हमासनं या एडेनचा एक व्हिडिओ शूट करीत त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहचवला. तेव्हापासून एडेनला सोडवण्यासाठी तयारी सुरु झाली. (Donald Trump)

यात अमेरिकेनं हमासबरोबर तुर्कीलाही मध्यस्थ केलं. यासर्वातून एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे, एडेनची लवकरच सुटका होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. डोनाल्ड ट्रम्प 13 मे पासून मध्येपूर्वेच्या देशांमध्ये दौ-यासाठी जातील, त्याआधी एडेन आपल्या घरी परतणार असल्याची माहिती आहे. गाझामध्ये असलेला शेवटचा अमेरिकन बंधन म्हणून एडेनचा उल्लेख करण्यात येतो. त्याला सोडण्यात येणार असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला आहे. मध्यपूर्वेच्या दौ-यावर जाणा-या ट्रम्प यांना खुश कऱण्यासाठी हमासची ही खेळी असल्याचीही चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यपूर्वेच्या देशांचा दौरा चर्चेत आहे. सुरुवातीला इस्रायल न जाता त्यांनी मध्यपूर्वेमधील देशांमध्ये आयोजित केलेल्या या दौ-याबाबत प्रश्न विचारण्यात येत होते. त्यातच हमासला मदत करणा-या कतार या देशातही ट्रम्प जाणार असल्यामुळे इस्रायलची नाराजी झाल्याची बातमी आली होती. (Intenational News)

इस्रायलला बाजुला ठेवत ट्रम्प प्रशासनानं थेट हमासबरोबर चर्चा केली आहे. याच चर्चेनंतर एडेन अलेक्झांडर अमेरिकन सैनिकाच्या सुटकेची घोषणा करण्यात आली आहे. अलेक्झांडरच्या सुटकेनंतर अनेक धोरणात्मक बदलांचे संकेत दिसून येत आहेत. कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर एडेन अलेक्झांडरच्या सुटकेबाबत आशा वाटू लागली. हमासनं या चर्चांना पाठिंबा दिला आणि एडेनची सुटका करण्यास सहमती दिली. हमासचे नेते अल-हय्या यांनी अलेक्झांडरची सुटका करण्याचा उद्देश गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवणे आणि युद्धबंदी करण्याचा प्रयत्न करणे असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अमेरिका आणि हमास यांच्यातील तणावही कमी होणार का, याची चर्चा सुरु झाली. इस्रायलने हमासचा संपूर्ण नायनाट करण्याचा निश्चय केला आहे. यापुढे अमेरिकेची मदत घेत हमास इस्रायलबरोबर अन्य कुठली संधी होणार का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. (Donald Trump)

या चर्चेला पुष्टी मिळाली, कारण हमास ही संघटना आपल्या कुठल्याही बंधंकाना सोडतांना अटी समोर ठेवते. मात्र एडेन अलेक्झांडरच्या सुटकेला सहमती देतांना हमासनं कोणत्याही अटी पुढे केलेल्या नाहीत. अलेक्झांडरच्या सुटकेची तारीख निश्चित नसली तरी, 13 मे पर्यंत तो आपल्या घरी असेल, अशी शक्यता आहे. असे झाल्यास गाझा संघर्षातील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच मुद्द्यावरुन इस्रायलमध्ये राजकारण तापले आहे. कारण अमेरिकेच्या युद्धबंधंकाला हमास कोणत्याही अटीशिवाय सोडत असली तरी अद्याप गाझामध्ये 58 इस्रायली नागरिक बंधक आहेत. त्यांच्या सुटकेबाबत हमासनं काहीही हालचाली केलेल्या नाहीत. एडेन अलेक्झांडर इस्रायली-अमेरिकन असे दुहेरी नागरिकत्व असलेला सैनिक आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने त्याचे अपहरण केले होते. त्याच दिवशी गाझा युद्ध सुरू झाले. 21 वर्षीय एडेनला तेव्हापासून हमानं ओलीस ठेवले होते. एडेन हा हमासचा शेवटचा जिवंत अमेरिकन कैदी असल्याचे म्हटले जाते. (Intenational News)

==============

हे देखील वाचा : War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

INS Vikrant : म्हणून INS विक्रांत समोर पाकिस्तानची तंतरते !

==============

अलेक्झांडरला अमेरिकेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमेरिकेचे मध्य पूर्व राजदूत स्टीव्ह विटकॉफ इस्रायलमध्ये येणार आहेत. असे असले तरी इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने एडेनच्या सुटकेवर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. अलेक्झांडरच्या सुटकेवरील वाटाघाटींमध्ये अमेरिका, कतार, इजिप्त आणि हमासच्या नेत्यांमध्ये थेट चार-पक्षीय चर्चा झाली आहे. हमासचे राजकीय नेते खलील अल-हय्या यांनी कतार, इजिप्त आणि तुर्की यांनी या प्रयत्नात मध्यस्थी केल्याची पुष्टी केली. यापुढेही कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी अशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या अन्य 58 नागरिकांची लवकर सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त कऱण्यात येत आहे. (Donald Trump)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.