Home » अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण

by Correspondent
0 comment
Share

आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोना शिरल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेता सुबोध भावेने यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.

‘मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शानं उपचार सुरू आहे. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा’ असं ट्वीट अभिनेता सुबोध भावेनं केलं आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1300342083169837057?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1300342083169837057%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fentertainment%2Factor-subodh-bhave-and-his-wife-and-child-tested-corona-positive-mhkk-476238.html

सुबोध भावे सध्या गोरेगावातल्या आपल्या घरी असून ते सुखरूप आहेत. डॉक्टरही त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असून आवश्यक सर्व औषधोपचार तो घेतो आहे. त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही माहीती दिली. सुबोधच्या आधी त्याच्या पत्नीला मंजिरीला कोरोनाचं निदान झालं. सुबोध आपल्या कुटुंबासह गणपतीसाठी पुण्यात गेला होता. तिथून आल्यानंतर त्याच्या पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यानंतर सुबोधही कोरोना पॉझिटिव्ह निघाला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.