Home » २० लाख रुपये आणि ११ लोकांसह सुरु झाली होती एसर कंपनी

२० लाख रुपये आणि ११ लोकांसह सुरु झाली होती एसर कंपनी

by Team Gajawaja
0 comment
Acer Success Story
Share

एसर जगातील त्या दिग्गज आयटी कंपन्यांमध्ये मोडली जाते ज्यांनी घर ते कार्यालयात आपली ओळख निर्माण केली आहे. ताइवान मधील ही आयटी कंपनी लॅपटॉप-टॅबलेट ते मॉनिटर, क्रोमबुक्स, प्रोजेक्ट, स्मार्ट डिवाइस आणि एक्सेसरिज तयार करतात. भारत, ऑस्ट्रेलिया आणि युरोपासह जगातील १६० देशांमध्ये त्यांचा व्यवसाय हा विस्तारला गेला आहे. सप्टेंबर २०२२ च्या रिपोर्टनुसार एसर पर्सनल कंप्युटर विक्री करण्यासाठीच्या प्रकरणी जगातील पाचवी सर्वाधिक मोठी कंपनी ठरली आहे. एसरच्या नावे १३५० पेटेंट्स आणि २११ ट्रेडमार्क्स रजिस्टर आहेत. तर जाणून घेऊयात या कंपनीच्या यशाच्या प्रवासाबद्दल अधिक. (Acer Success Story)

५ लोकांनी मिळून केली होती स्थापना
ताइवान मधील सिंचु शहरात राहणारे स्टेन शिह, त्यांची पत्नी कॅरोलिन येह आणि पाच लोकांनी मिळून १९७६ मध्ये ऐसर कंपनीची स्थापना केली होती. यापूर्वी याचे नाव मल्टीटेक असे ठेवले होते. ११ लोकांचा स्टाफ आणि २० लाख रुपयांच्या भांडवलाने या कंपनीची सुरुवात केली होती. कंपनीने आपल्या सुरुवातीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सला डिस्ट्रिब्युट करण्याचे काम करायची. या व्यतिरिक्त ऐसर माइक्रोप्रोसेसर टेक्नॉलॉजी मध्ये कंसल्टेंटच्या रुपात सुद्धा काम करु लागली होती.

दरम्यान, याला १९८७ मध्ये एसर असे नाव दिले गेले आणि १९९८ मध्ये कंपनीने प्रोडक्टच्या विविधतेनुसार पाच नवे ग्रुप तयार केले. यामध्ये इंटरनॅशनल सर्विस ग्रुप, इंफॉर्मेशन प्रोडक्ट ग्रुप, पेरिफेरल ग्रुप आणि सेमीकंडक्टर ग्रुपचा समावेश होता. अशा प्रकारे कंपनीने विविध कॅटेगरी संदर्भातील सर्विस आणि प्रोडक्ट्स सादर केले. २००१ मध्ये एसरने प्रोडक्टच्या डिझाइनिंग आणि सेल्सवर लक्ष केंद्रित केले. २००७ मध्ये पॅकार्ड बेलला खरेदी केले आणि युरोप व अमेरिका मध्ये नोटबुक विक्री करणारी दुसरी सर्वाधिक मोठी कंपनी बनली.

पहिलाच सर्वाधिक मोठा तोटा
कंपनीने २०१९ मध्ये प्लेनेट९ नावाच्या ई-स्पोर्ट्स सोशल प्लॅटफॉर्मची घोषणा केली. या प्लॅटफॉर्मचे लक्ष्य युजरला गेम अॅनालिटिक्सला देण्यासह सोशल एक्सपिरियंस वाढवणे होते. आता पर्यंतच्या प्रवासात एसरने काही आव्हानांचा सामना केला. १९८० च्या दशकात कंपनीला काही आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यानंतर काही वेळा प्रोडक्ट्सच्या रॉ मटेरियल्सच्या किंमतीत वाढ झाल्याने विक्रीवर त्याचा परिणाम ही झाला होता. (Acer Success Story)

कंपनीला सर्वात प्रथम मोठा तोटा २००० च्या मध्यात झाला होता. उत्तर अमेरिकेतील मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओची प्राइस वॅल्यूत ५० टक्क्यांनी घट दाखल केली गेली. पुढील १८ वर्षांमध्ये कंपनीत १४ विविध गुंतवणूकी झाल्या. एसरने ६ कंपन्यांना खरेदी केले. यामध्ये काउंटरपॉइंट कंप्युटर्स, आल्टोस कंप्युटर कॉर्पोरेशन, पॅकार्ड बेल आणि ईटेनचा समावेश आहे.

हे देखील वाचा- AI चॅटबॉट तुम्हाला फसवू शकतात, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर वाचा

एसरने प्रत्येक वर्षी कमाई रेकॉर्ड ब्रेक केली. २०२१ मध्ये एसरला ३७ बिलियन डॉलरचे नेट प्रॉफिट झाले. वेळेसह प्रोडक्ट्समध्ये इनोवेशन केले. आता मार्केटमध्ये एसरने आपल्या स्पिनी सीरिज लॅपटॉप, गेमिंग मॉनिटर, क्रोमबुक्स, अल्ट्राथिन लॅपटॉप्स, गेमिंग लॅपटॉप-डेस्कटॉप आणि होलो३६० कॅमेरासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने दावा केला आहे की, सातत्याने इनोवेशन क्षेत्रात काम करत युजर्सला नेहमीच उत्तम प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न केला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.