Exams for study abroad- प्रत्येक वर्षाला भारतातून जवळजवळ तीन लाख विद्यार्थी हे पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करतात. शिक्षण क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी परदेशात सुद्धा शिक्षणाच्या बहुतांश संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. त्याचसोबत परदेशात शिक्षण घेतल्यानंतर तेथेच नोकरी मिळवणे ही विद्यार्थ्यांना सोप्पे होते. मात्र शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर तत्पूर्वी तुम्हाला काही परीक्षा द्याव्या लागतात. त्या योग्यतांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला काही स्टँडर्डाइज्ड टेस्ट आणि लँग्वेज टेस्ट मध्ये पास होणे अत्यंत अनिवार्य आहे. या परिक्षांमध्ये तुमचा स्कोर हा तुम्हाला परदेशात शिक्षण घेण्यासाठी संधी देते. त्याचसोबत या टेस्ट तुम्हाला स्कॉलरशिप आणि फेलोशिपच्या रुपात आर्थिक मदत मिळवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात. तर परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तर पुढील काही परीक्षा देणे अनिवार्य असते. जाणून घेऊयात त्याबद्दलच अधिक.
टेस्ट ऑफ इंग्लिस एज ए फॉरेन लँग्वेज (TOEFL)
या टेस्टमधील तुमचा स्कोर हा अमेरिकेसह जगातील १३० देशांच्या संस्थांमध्ये मान्य आहे. खरंत टॉफेल टेस्टचा स्कोर २ वर्षांसाठी मान्य असतो. परंतु बहुतांश संस्थांना नवे स्कोर्स मागतात. ही चाचणी मुख्य रुपात इंग्लिश रिडिंग, लिसनिंग, राइटिंग आणि स्पिकिंग संदर्भात असते. त्यामुळे जगभरातील बहुतांश देशांमध्ये परीक्षा सेंटरच्या माध्यमातून इंटरनेट आधारित ही चाचणी घेतली जाते. ही टेस्ट वर्षात ६ वेळा घेतली जाते. परंतु त्याचा पीक टाइम हा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यानचा असतो. या चाचणीसाठी तुम्हाला २-३ महिन्याआधीच रजिस्ट्रेशन करावे लागते.
इंटरनॅशल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम (IELTS)
या टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजीत तुम्ही किती तरबेज आहात ते पाहिले जाते. याचे आयोजन ब्रिटिश काउंसिल, कॅब्रिज युनिव्हर्सिटी, ईएसओएल आणि आईडीपी एज्युकेशन, ऑस्ट्रेलिया द्वारे संयुक्त रुपात केले जाते. या टेस्टमधील स्कोर रिपोर्ट ऑस्ट्रेलिया., ब्रिटेन, आर्यलँन्ड, न्युझिलँन्ड, दक्षिण अफ्रिका मधील शैक्षिक संस्थांच्या व्यतिरिक्त काही अमेरिकन संस्थांमध्ये सुद्धा मान्य आहे.
हे देखील वाचा- परदेशात इंटर्नशिप करण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या कसा कराल अर्ज
ग्रॅज्युएट मॅनेजमेंट टेस्ट (GMAT)
जर तुम्ही जगातील टॉप बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर ग्रॅज्युएट मॅनेटमेंट टेस्टच्या माध्यमातून तुम्ही हे स्वप्न साकार करु शकतात. जगातील जवळजवळ १९०० असे टॉप बिझनेस स्कूल आहेत जेथे या टेस्टच्या स्कोरचा रिपोर्ट मान्य आहे. या परिक्षेतील स्कोर हा ५ वर्षांसाठी मान्य असतो.(Exams for study abroad)
स्कॉलिस्टिक एप्टीट्युड टेस्ट (SAT)
ही टेस्ट युएससह जगातील अन्य १७० देशांमध्ये मान्य आहे. ईटीएस द्वारे आयोजित करण्यात येणारी ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याकडे दोन ऑप्शन असतात. त्यामध्ये पेपर-पेन्सिल आणि कंप्युटर. या टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची समजून घेण्याची क्षमता, गणित, वर्बल रीजनिंगची परख केली जाते.
टेस्ट ऑफ इंग्लिश फॉर इंटरनॅशनल कम्युनिकेशन (TOEIC)
या टेस्टसाठी तुमचे इंग्रजी कसे आहे ते पाहिले जाते. जगभराचील १५० देशांच्या १,१४,००० पेक्षा अधिक संस्थांकडून TOEIC टेस्टला मान्यता दिली जाते. या परिक्षेचे आयोजन सुद्धा ईटीएस द्वारे केले जाते. यामध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंट, फाइनांन्स, बजेटिंग, कॉर्पोरेट प्रॉपर्टी, आईटी, पर्सनल, टेक्निकल प्रकरण, हेल्थ व बिझनेस ट्रॅव्हल संबंधित प्रश्न विचारले जातात.